बिजिंग, 11 फेब्रुवारी: पूर्व लद्दाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याशी झालेल्या चकमकीत कमीतकमी 45 चिनी सैनिक ठार झाले आहेत, रशियन वृत्तसंस्था TASS ने बुधवारी (10 फेब्रुवारी) असा दावा केला आहे आहे. 15 जून, 2020 रोजी भारतीय आणि चिनी लष्करात मोठी चकमक झाली होती त्यामध्ये चिनी सैनिक मारले गेल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. भारत आणि चीन दोन्ही देशातील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या नवव्या चर्चेच्या फेरीबाबतच्या अहवालात Tass ने याबाबत माहिती दिली आहे. या अहवालानुसार या चकमकीत भारतीय सैन्यातील 20 सैनिक देखील मारले गेले.
गेल्या वर्षी मे महिन्यात भारत (India) आणि चीन (China) या दोन देशातील सैन्य आमने सामने आले होते. गलवान खोऱ्यात (Galwan Valley) दोन्ही देशातील सैन्यांत झडप (Conflict between army troops) झाली होती. यामध्ये भारताच्या 20 जवानांना आपला जीव गमवावा (Death) लागला होता. भारतीय सैन्यानेही चीनला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. या संघर्षानंतर दोन्ही देशात तणावाचं वातावरण तयार झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील याचे पडसाद उमटले होते.
(हे वाचा-इथेही भारताने चीनला पाजलं पाणी! वाचा नेमका काय आहे प्रकार?)
मे आणि जून 2020 पासून भारत आणि चीनमधील तणाव वाढत असल्याची चिन्ह होते. दरम्यान चीनच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी या वृत्तास दुजोरा दिला आहे की, पेंगाँग त्सो सरोवराजवळ असणाऱ्या भारत-चीन सीमेवरुन चीन आणि भारतीय लष्कराने त्यांच्या तुकड्या मागे घेण्यास सुरवात केली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
लष्कराच्या कमांडर स्तरावर झालेल्या चर्चेच्या 9 व्या फेरीवेळी झालेल्या करारांनुसार दोन्ही बाजूंनी सीमेवरून सैन्यांनी नियोजित माघार घेण्यास सुरवात केली, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
(हे वाचा-Explainer: म्यानमारमधल्या लष्करी उठावामागे खरंच चीनचा हात आहे का?)
मे आणि जून 2020 मध्ये या भागात चिनी आणि भारतीय सैन्यात चकमक झाली होती. त्यात दोन्ही सैन्यातील काही तैनात सैनिक मारले गेले होते. या घटनांनंतर भारत आणि चीन दोन्ही देशांनी या भागात तैनात लष्करी जवानांची संख्या वाढवली होती. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की नवी दिल्ली आणि बिजिंगकडून साधारणत: 50,000 सैनिक वाढवण्यात आले होते.