हैदराबाद, 22 जून : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM K Chandrashekhar Rao)यांनी सोमवारी लडाखच्या गलवान खोऱ्यात (Galwan Valley) शहीद झालेल्या कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू (Col. Santosh Babu) यांच्या कुटुंबाला पाच कोटी रुपये देऊ केले. तसेच कुटुंबाच्या पाठीशी उभे असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्री जगदीश्वर रेड्डी, वेमुला प्रशांत रेड्डी, मुख्य सचिव सोमेश कुमार, खासदार संतोषकुमार जोगीनापल्ली, विधानपरिषदेचे उपाध्यक्ष नेती विद्या नगर सूर्यपुरी यांनी शहीद कर्नल संतोष यांच्या फोटोला पुष्पांजली वाहिली. नंतर त्यांनी कर्नल संतोषच्या पत्नी संतोषी, आई मंजुळा, वडील उपेंद्र, बहीण श्रुती यांची भेट घेतली. आणि कर्नल संतोषची मुले अभिज्ञान, अनिरुद्ध यांच्याशी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांनी संतोषी यांना गट -1 अधिकारी म्हणून नियुक्त करणारे पत्र दिले. तसेच हैद्राबादच्या बंजारा हिल्समधील 711 चौरस यार्डातील भूखंड वाटप करण्याचे कागदपत्र संतोषीला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी संतोषीला चार कोटींचा धनादेश आणि कर्नल संतोषच्या पालकांना एक कोटी रुपयांचा धनादेश दिला. देशाच्या सुरक्षेसाठी कर्नल संतोष यांचे बहुमूल्य जीवन अर्पण केल्याबद्दल केसीआरने त्यांचे कौतुक केले.
19 शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये देणार केसीआर
मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले की, संपूर्ण देश जवानांच्या पाठीशी उभा आहे. उर्वरित 19 शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणाही राव यांनी केली आहे.
हे वाचा-चिनी मीडियामध्ये पंतप्रधान मोदींचं का केलं जातंय कौतुक? राहुल गांधींनी सवाल