जाहिरात
मराठी बातम्या / देश / सीमा पार करणाऱ्या चिनी सैनिकांची भारतीय जवानांनी केली धुलाई, VIDEO व्हायरल

सीमा पार करणाऱ्या चिनी सैनिकांची भारतीय जवानांनी केली धुलाई, VIDEO व्हायरल

सीमा पार करणाऱ्या चिनी सैनिकांची भारतीय जवानांनी केली धुलाई, VIDEO व्हायरल

सीमा पार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या पीएलएच्या जवानांची भारतीय जवानांनी जोरदार धुलाई केली आणि त्यांना परत जाण्यासाठी भाग पाडलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 जून : भारत आणि चीनमधील नियंत्रण रेषेवरील संघर्ष आणि पूर्व लडाखमध्ये हिंसाचारानंतर एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दोन्ही देशांमधले सैनिक धक्काबुक्की करताना दिसत आहेत. सीमा पार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या पीएलएच्या जवानांची भारतीय जवानांनी जोरदार धुलाई केली आणि त्यांना परत जाण्यासाठी भाग पाडलं. मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेमका कोणत्या तारखेचा आहे हे समजू शकलेलं नाही. पण अलीकडेच हा व्हिडिओ शूट केल्याची माहिती समोर येत आहे. कारण सर्व सैनिकांनी मास्क वापरलं आहे. हा व्हिडिओ सिक्कीममधील नाकुलाचा असल्याचा दावा केला जात आहे. तर या 5 मिनिटांच्या व्हिडिओची वेळ व ठिकाणाची कोणतीही पुष्टी लष्कराकडून अद्याप करण्यात आलेली नाही. दरम्यान, हा व्हिडिओ 9 मेच्या चकमकीचा नाही आहे. त्यावेळी भारत आणि चीनमधील 150 सैनिक आपसात भिडले होते आणि यात 11 सैनिक जखमी झाले. या व्हिडिओमध्ये सुमारे 25 भारतीय आणि चिनी सैनिक दिसत आहेत. एकमेकांमध्ये धक्काबुक्की सुरू असल्याचं दिसत आहे. काही चिनी सैनिकांनी हात उचलण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर भारतीयांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला.

जाहिरात

भारतीय आणि चिनी सैनिकांमधील चकमकीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या महिन्यात सैनिकांमधील हिंसक भांडणं दाखवणारा एक व्हिडिओदेखील समोर आला होता, परंतु हा व्हिडिओ खरा नसल्याचं सैन्यानं म्हटलं होतं. संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात