मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Coronavirus 2nd Wave: असा मास्क लावाल तरच होईल फायदा; कुणी, कुठला मास्क वापरायचा, काय आहे योग्य पद्धत?

Coronavirus 2nd Wave: असा मास्क लावाल तरच होईल फायदा; कुणी, कुठला मास्क वापरायचा, काय आहे योग्य पद्धत?

संकटकाळात मास्क एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे काम करतो

संकटकाळात मास्क एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे काम करतो

Corona संकटकाळात मास्क एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे (Safety shield) काम करतो. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर आवश्यक आहे. योग्य क्वॉलिटाचा मास्क कसा ओळखायचा, कुठला मास्क कधी वापरायचा?

दिल्ली, 22 एप्रिल: देशभरात  कोरोना (Coronavirus second wave) प्रादुर्भावाचा आलेख झपाट्याने वाढतो आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात परिस्थिती नियंत्रणाबाहेर (Corona Out of control) जाते की काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कडक लॉकडाउन जारी करण्यात आला आहे. आता प्रत्येकानेच Break the chain साठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. कोरोना टाळण्यासाठी सतत मास्क (which Mask is useful) वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. पण मास्कचा वापर योग्य रीतीने झाला नाही, तर काहीच उपयोग नाही. योग्य ठिकाणी योग्य तो मास्क वापरला (How to use mask) तरच, कोरोनापासून संरक्षण होऊ शकेल. मास्क कशा प्रकारे वापरावा याची माहिती नसेल तर, कोरोनापासून संरक्षण कसं होईल?

 ट्रिपल लेयर मास्क

कोरोनापासून संरणासाठी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करावा. चेहऱ्यावरचा मास्क योग्य पद्धतीने न लावल्यास त्याचा काही उपोग होत नाही. आपलं नाक आणि तोंड पूर्णपणे झाकणारा मास्क लावायला हवा. ट्रिपल लेयर मास्क (Triple Layer Mask) किंवा सर्जिकल मास्क अधिक उपयुक्त आहे.

Corona Vaccination: लसीकरणासाठी घरबसल्या करा रजिस्ट्रेशन, जाणून घ्या सोपी पद्धत

घरगुती वापरासाठी किंवा कमी गर्दीच्या कमी धोक्याच्या ठिकाणी कापडे मास्क चालेल पण आरोग्य कर्मचाऱ्यांनी किंवा कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांनी N95 मास्क लावायला हवा. तिथे साध्या कापडी मास्कचा उपयोग होणार नाही. मास्कने आपलं नाक, तोंड आणि हनुवटी झाकली गेली पाहिजे. आखूड मास्क किंवा नाकावरून खाली घसरणारे मास्क हे केवळ दिखावा म्हणून काम करतील. प्रत्यक्षात अशा पद्धतीने मास्क लावला तर काहीच उपयोग नाही.

कोरोनापासून संरणासाठी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करावा

डबल मास्क प्रोटेक्शन

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता चांगल्या प्रतीचे मास्क वापरायला हवेत. सर्जिकल मास्कचा( Surgical mask) वापर करणं चांगलं. काही जण दोन-दोन मास्क वापरतात. तुम्हीही डबल मास्कचा वापर करत असाल तर, आधी सर्जिकल मास्क लाऊन त्यावर कॉटनचा किंवा कापडी मास्क लावावा. केवळ कॉटनचा मास्क लावल्याने कोरोना विषाणूपासून संरक्षण होऊ शकत नाही. सर्जिकल मास्क लावणंही गरजेचं आहे.

निष्काळजीपणा नको

लोकांना कोरोनाची भीती वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे लोक निष्काळजीपणे वागायला लागले आहेत. दुसरी लाट सुरु झाली आणि त्याची भयाणता आता भिडते आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडायची असेल तर लोकांनी बेपर्वा वागणं सोडायला हवं. मास्क हेच आपलं ‘सेफ्टी शिल्ड’ आहे. आरोग्य कर्मचारी, कोरोना पेशंटच्या संपर्कात येणारे लोक यांनी N95 मास्क लावायलाच हवा.

'माझा भाऊ दुष्ट कोरोनाने टिपला...', पंकजा मुंडेंच्या अंगरक्षक भावाचं निधन

व्हॅक्सिनेशन(Vaccination) नंतरही मास्क लावयाला हवा. मास्क, सॅनिटायझर (Sanitizer) आणि सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) ही त्रिसूत्री पाळायला हवीच.

First published:

Tags: Coronavirus, Mask, Safety, Sanitizer and mask