मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /'माझा भाऊ दुष्ट कोरोनाने टिपला...', पंकजा मुंडेंच्या अंगरक्षक भावाचं निधन

'माझा भाऊ दुष्ट कोरोनाने टिपला...', पंकजा मुंडेंच्या अंगरक्षक भावाचं निधन

कोरोनामुळे अनेकांच्या जवळच्या व्यक्तींचे निधन  (Corona Death) झाल्याच्या घटना आपण रोजच ऐकत आहोत. पंकजा मुंडे यांनी देखील एक भावुक पोस्ट शेअर करत त्यांच्या अंगरक्षक भावचं निधन झाल्याची माहिती दिली आहे

कोरोनामुळे अनेकांच्या जवळच्या व्यक्तींचे निधन (Corona Death) झाल्याच्या घटना आपण रोजच ऐकत आहोत. पंकजा मुंडे यांनी देखील एक भावुक पोस्ट शेअर करत त्यांच्या अंगरक्षक भावचं निधन झाल्याची माहिती दिली आहे

कोरोनामुळे अनेकांच्या जवळच्या व्यक्तींचे निधन (Corona Death) झाल्याच्या घटना आपण रोजच ऐकत आहोत. पंकजा मुंडे यांनी देखील एक भावुक पोस्ट शेअर करत त्यांच्या अंगरक्षक भावचं निधन झाल्याची माहिती दिली आहे

बीड, 22 एप्रिल: कोरोनामुळे अनेकांच्या जवळच्या व्यक्तींचे निधन (Corona Death) झाल्याच्या घटना आपण रोजच ऐकत आहोत. पंकजा मुंडे यांनी देखील एक भावुक पोस्ट शेअर करत त्यांच्या अंगरक्षक भावचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनामुळे मोठा फटका मुंडे कुटुंबाला बसला आहे. गोविंद मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी भावुक पोस्ट शेअर करत याबाबात माहिती दिली आहे. त्यांच्याबरोबर एक व्हिडीओ शेअर करत पंकजा मुंडे यांनी लिहिलं आहे की, 'गोविंद.. एक जागा कायम रिकामी झाली..' या व्हिडीओमध्ये त्यांनी गोविंद यांच्याबरोबच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

आणखी एक ट्वीट करत पंकजा मुंडेनी असं म्हटलं आहे की, '>माझा वाघ भाऊ हो ..माझा बॉडी गार्ड गोविंद या दुष्ट Corona ने टिपला..' गोविंद मुंडे यांना ओळखणाऱ्या अनेकांनी पंकजा मुंडेंच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती बिकट बनत चालली आहे. अनेकांच्या जवळच्या व्यक्ती मृत्यूमुखी पडत आहेत किंवा मरणाच्या दारात उभ्या आहेत. अनेक नेतेमंडळी, सेलिब्रिटींना कोरोनानं ग्रासलं आहे. सामान्यांची अवस्था तर चहुबाजूंनी मार पडत असल्यासारखी झाली आहे.

सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी (CPM General Secretary Sitaram Yechury) यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी यांचे देखील गुरुवारी सकाळी कोव्हिडमुळे निधन झाले. गुरुग्राममधील एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्यावर होली फॅमिली रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.

(हे वाचा-राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात हतबल? आम्ही पाया पडायलाही तयार- टोपे)

आशिष एक पत्रकार होते, ते दिल्लीतील एका प्रसिद्ध वृत्तपत्रासाठी सीनिअर कॉपी एडिटर म्हणून काम करत होते. वयाच्या 34 व्या वर्षी कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. मित्र परिवारात आणि कुटुंबीयांमध्ये त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सीताराम येचुरी यांनी देखील याबाबत ट्वीट केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona hotspot, Corona patient, Corona spread, Pankaj munde