मराठी बातम्या /बातम्या /heatlh /वजन घटवण्याच्या या मार्गाचा प्रजनन क्षमतेवर परिणाम; संशोधनात समोर आली धक्कादायक बाब

वजन घटवण्याच्या या मार्गाचा प्रजनन क्षमतेवर परिणाम; संशोधनात समोर आली धक्कादायक बाब

वजन कमी करण्यासाठी सर्व वयोगटातील लोक नवनवीन पद्धतींचा अवलंब करत आहेत. विशेषत: महिला वजन कमी करण्याच्या बाबतीत खूप गंभीर दिसतात.

वजन कमी करण्यासाठी सर्व वयोगटातील लोक नवनवीन पद्धतींचा अवलंब करत आहेत. विशेषत: महिला वजन कमी करण्याच्या बाबतीत खूप गंभीर दिसतात.

वजन कमी करण्यासाठी सर्व वयोगटातील लोक नवनवीन पद्धतींचा अवलंब करत आहेत. विशेषत: महिला वजन कमी करण्याच्या बाबतीत खूप गंभीर दिसतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 03 नोव्हेंबर : आजच्या युगात वजन कमी करण्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी सर्व वयोगटातील लोक नवनवीन पद्धतींचा अवलंब करत आहेत. विशेषत: महिला वजन कमी करण्याच्या बाबतीत खूप गंभीर दिसतात. आजकाल इंटरमिटंट फास्टिंग हा वजन कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग मानला जात आहे आणि लोक त्याद्वारे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

काही तज्ञ इंटरमिटंट फास्टिंग करणे योग्य मानतात, तर अनेक तज्ञ याला आरोग्यासाठी हानिकारक म्हणतात. आता याबाबत एक नवीन संशोधन समोर आले आहे, ज्यामध्ये इंटरमिटंट फास्टिंग केल्याने महिलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे सांगण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊया इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय? आणि त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो.

विराट कोहलीसारखं डाएट फॉलो करायचंय? 'या' पदार्थांचा करा आहारामध्ये समावेश

इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय?

इंटरमिटंट फास्टिंग हे वजन कमी करण्याचे तंत्र आहे, जे आजकाल खूप प्रचलित आहे. इंटरमिटंट फास्टिंग करणे हे एका प्रकारचे डाएट आहे. ज्यामध्ये लोक दिवसभरात ठराविक वेळी अन्न खातात, उर्वरित वेळ उपवास करतात. इंटरमिटंट फास्टिंग करताना, एक डाएट प्लॅन तयार केला जातो, ज्यामध्ये सर्वात प्रचलित 16:8 पॅटर्न असतो. या पद्धतीनुसार, एखादी व्यक्ती फक्त दिवसाच्या 8 तासांमध्ये अन्न आणि इतर पोषक तत्वे घेऊ शकते, तर उर्वरित 16 तास फक्त पाणी पिऊन उपवास करावा लागतो. काही लोक दिवसातून फक्त 4 तास खातात आणि 20 तास उपवास करतात. याला 20:4 फास्टिंग विंडो म्हणतात.

काय म्हणते नवीन संशोधन?

एएनआयच्या मते, अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, इंटरमिटंट फास्टिंग केल्याने महिलांच्या प्रजनन संप्रेरकांवर परिणाम होतो. युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय शिकागो (UIC) च्या प्रोफेसर क्रिस्टा वराडी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात आले आहे. रजोनिवृत्तीपूर्वी आणि रजोनिवृत्तीनंतर जास्त वजन असलेल्या महिलांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला होता.

या सर्व महिलांनी सुमारे 8 आठवडे इंटरमिटंट फास्टिंग केला आणि त्याच्या आधारावर संशोधकांनी संशोधनाचे निष्कर्ष तयार केले. या महिलांच्या DHEA हार्मोनच्या पातळीत 14% घट झाल्याचे आढळून आले. हे अंडाशयाचे कार्य सुधारते. सोप्या भाषेत सांगायचे तर, इंटरमिटंट फास्टिंग केल्याने महिलांच्या पुनरुत्पादक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.

वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग करणे प्रभावी आहे का?

एम्सच्या माजी मुख्य आहारतज्ज्ञ रेखा शर्मा सांगतात की, आत्तापर्यंतच्या अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की, इंटरमिटंट फास्टिंग करून वजन कमी करता येते आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. उपवास आणि सकस आहार याद्वारे वजन कमी होते, परंतु प्रत्येकाने ही पद्धत अवलंबू नये. शक्यतो लोकांनी वजन कमी करण्यासाठी व्यायाम, सकस आहार यासारख्या आरोग्यदायी पद्धतींचा अवलंब करावा.

हृदयाच्या आरोग्यासाठी आहारात `या` मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश हवाच

जर एखाद्याला आजारपणाने किंवा इतर कोणत्याही समस्येने ग्रासले असेल, तर त्याने इंटरमिटंट फास्टिंग करण्यापूर्वी त्याची आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हे डाएट करावे. इंटरमिटंट फास्टिंग करणे काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते.

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Weight loss tips