मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Triphala Churna: मधुमेह, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलवर कंट्रोल, त्रिफळाचे फायदे, पण....

Triphala Churna: मधुमेह, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलवर कंट्रोल, त्रिफळाचे फायदे, पण....

त्रिफळा पावडर, कॅप्सूल आणि रस अर्क स्वरूपात बाजारात सहज उपलब्ध आहे. त्रिफळा चूर्णाचे अनेक फायदे असले तरी ते खाण्यापूर्वी खबरदारी घेतली नाही तर त्याचे नुकसानही होऊ (Triphala Churna side Effects) शकते.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 07 ऑगस्ट : त्रिफळाचे नाव सर्वांनी ऐकले असेल. अनेक प्रकारच्या आजारादरम्यानही तुम्ही त्रिफळा घेतला असेल. त्रिफळा शतकानुशतके आयुर्वेदिक आणि हर्बल उपाय म्हणून वापरला जात आहे. आवळा, बिभिताकी आणि हरिताकी या तीन फळांचे मिश्रण करून त्रिफळा तयार केला जातो. आयुर्वेदानुसार त्रिफळा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. त्रिफळा खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. त्रिफळा पावडर, कॅप्सूल आणि रस अर्क स्वरूपात बाजारात सहज उपलब्ध आहे. त्रिफळा चूर्णाचे अनेक फायदे असले तरी ते खाण्यापूर्वी खबरदारी घेतली नाही तर त्याचे नुकसानही होऊ (Triphala Churna side Effects) शकते. त्रिफळा चूर्णाचे दुष्परिणाम - लो ब्लड शुगर लेवल - स्टाइलक्रेसच्या मते, त्रिफळामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आहेत. जे रुग्ण आधीच मधुमेहाची औषधे घेत आहेत, त्यांच्यामध्ये त्रिफळा खाल्ल्याने हायपोग्लायसेमिया होऊ शकतो, ज्यामुळे रक्तातील साखर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. आपण मधुमेहाचे रुग्ण असाल तर त्रिफळा चूर्ण खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. औषधांचा कमी परिणाम - त्रिफळा विविध औषधांचा प्रभाव कमी करू शकतो, त्यामुळे यकृताचे नुकसानही होऊ शकते. औषधांसोबत त्रिफळा घेणे टाळावे. याशिवाय त्यामुळे मूड खराब होणे, एनर्जीची कमतरता आणि झोपेची समस्या देखील उद्भवू शकते. हे वाचा - वजन वाढणं आणि कोलेस्ट्रॉलचा असा आहे संबंध; रिस्क फॅक्टर ओळखून उपाय सुरूच करा गरोदरपणात अडचणी येतात - गरोदरपणात त्रिफळा चूर्णाचे सेवन केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे गर्भपात होऊ शकतो. त्रिफळा चूर्ण घेण्यापूर्वी महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्रिफळा चूर्ण सेवन करण्यापूर्वी त्याचे योग्य प्रमाण जाणून घेणे आवश्यक आहे. हे वाचा - Numerology : कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्याआधी जरूर वाचा आजचं अंकशास्त्र (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या