मुंबई, 07 ऑगस्ट : लठ्ठपणामुळे शरीरात अनेक नवीन समस्या आणि आजार वाढू शकतात, त्यातील एक समस्या म्हणजे उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या. आजकाल बहुतेक लोकांना याचा त्रास होत आहे. कोलेस्ट्रॉल हे रक्तामध्ये आढळणारे एक चिकट द्रव आहे, जे शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे, परंतु योग्य प्रमाणात. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे छातीत दुखणे, हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कोलेस्ट्रॉल वाढल्याचं कोणतंही विशिष्ट लक्षण जाणवत नाही. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी केवळ रक्त तपासणीद्वारे शोधली जाऊ शकते. कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण मुख्यतः चुकीचा आहार आणि खराब जीवनशैली आहे, तर ही समस्या अनुवांशिक देखील असू शकते. मधुमेह, उच्च बीपी आणि एचआयव्ही सारख्या आजारांमुळेही शरीरातील कोलेस्ट्रॉल काही वेळा वाढू शकते. रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होणे म्हणजेच लठ्ठपणा हे अनेकदा उच्च कोलेस्टेरॉलचे कारण असू शकते. कोलेस्टेरॉलचे (High Blood Cholesterol) रिस्क फॅक्टरवर एक नजर टाकुया. उच्च कोलेस्टेरॉलचे रिस्क फॅक्टर - चुकीचा आहार - MayoClinic.org च्या मते, जास्त सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटचे सेवन केल्याने शरीरातील LDL (खराब कोलेस्टेरॉल) वाढते, जे शरीरातील धमन्यांच्या भिंतींवर जमा होते आणि उच्च कोलेस्ट्रॉलचे कारण बनते. लठ्ठपणा - एखाद्या व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स (BMI) 30 पेक्षा जास्त असणे हे लठ्ठपणाचे लक्षण आहे. हा लठ्ठपणा उच्च कोलेस्ट्रॉलचे मुख्य कारण बनतो. सिगारेट आणि दारू - जास्त सिगारेट, अल्कोहोल शरीरातील एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल कमी करते आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढवते, ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत खराब जीवनशैली - आजकाल बहुतेक लोक संगणक किंवा लॅपटॉपवर करतात, अशा स्थितीत व्यायाम आणि योगासने न केल्याने किंवा दिवसभर बसून राहिल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. कोलेस्ट्रॉल टाळण्यासाठी हे उपाय करा - फळे, भाज्या आणि कडधान्यांचा आहाराचा भाग बनवा. सिगारेट, दारू यांसारख्या गोष्टींपासून लांबच राहा. जंक फूड आणि फॅटी फूडचे सेवन कमी करा. तुमच्या जीवनशैलीत नियमित व्यायाम आणि योगाचा समावेश करा. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे जास्त ताण किंवा तणाव घेणे टाळा. लठ्ठपणा कमी करा आणि वजन नियंत्रणात राहण्यासाठी प्रयत्न करा. जॉगिंग आणि चालणे यासारख्या शारीरिक हालचालींवर वाढवा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.