मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्याआधी जरूर वाचा आजचं अंकशास्त्र

Numerology : कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्याआधी जरूर वाचा आजचं अंकशास्त्र

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 7 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) घरातून कामासाठी बाहेर पडताना घरातल्या वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. तुमची बुद्धिमत्ता आणि अचूक विश्लेषण यांच्या बळावर तुम्ही आज अचूक निर्णय घ्याल. नव्या संधीला कवेत घेण्यासाठी सज्ज व्हा. शास्रज्ञ, रंगभूमीवरचे कलाकार, सोनार, वकील, सैन्यदलातील अधिकारी, प्रशिक्षक आणि आयटी प्रोफेशनल्सना एक ऑफर मिळेल ती स्वीकारा. चांगलं दिसण्यासाठी चामड्याच्या वस्तू आजचा दिवस कृपया वापरू नका. सूर्याला अर्घ्य देऊन सूर्य मंत्र आणि शनि मंत्राचा जप करा. शुभ रंग : पिवळा शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 दान : गरिबांना पिवळ्या रंगांचं धान्य दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) भागीदारांमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. पैसे सांभाळून खर्च करा. ऑफिसमधील कामाचा वेग वाढवण्यासाठी आणि प्रगतीसाठी आज जबाबदारी घेऊन काम करा. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही गोंधळात आणि संशयात आहात त्यामुळे रोमँटिक भावानांना आवर घाला. धंद्यात दिलेली वचनं सहज पूर्ण कराल. वाद घालू नका आणि मर्जरचे करार करू नका. राजकारणी आणि रिटेलर्सने कोणत्याही कागदपत्रांवर सही करताना काळजी घ्यावी. शुभ रंग : क्रीम शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना पांढरा तांदूळ दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पक्के संबंध आणि सामाजिक संलग्नता यामुळे दिवस चांगला जाणार आहे त्यामुळे आनंदात रहा. कोणत्याही क्षेत्रातील सेल्समनला एखादं डील पूर्ण करून मोठ्ठं टारगेट साधण्यासाठी उत्तम दिवस आहे. एखादं नवं नातं निर्माण होईल. नशीब तुम्हाला साथ देणार आहे पण मित्रमंडळींसोबत असताना दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. सांगितिक वाद्यांचे उद्योजक, फार्मसिस्ट, डॉक्टर्स, संगीतकार, डिझायनर्स, विद्यार्थी, न्यूज अँकर्स, अभिनेते, राजकारणी, गृहिणी, हॉटेलियर्स, लेखक आदींना करिअरच्या विकासाच्या दृष्टीने खास बातमी मिळेल. शुभ रंग : नारिंगी आणि जांभळा शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : स्टेशनरीतील वस्तू अनाथाश्रमाला दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) स्वत: च्या निर्णयांवर ठाम रहा इतरांचं ऐकणं टाळा. राजकारण्यांनी त्यांच्या योजना राबवाव्यात. वैवाहिक आयुष्यातील अनेक अडचणी आज कमी होतील. प्रवास आणि लोकांच्या गाठीभेटींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. सर्व कामं पूर्ण होतील. आश्रमात किराणा माल दान केल्यास शुभ परिणाम जाणवतील. सरकारी ऑर्डर्स घेणारे, मशिनरी, धातू, सॉफ्टवेअर, ब्रोकर्स, आदी बिझनेसमधल्या व्यक्तींनी आज करारावर स्वाक्षरी करणं टाळावं. उत्तम प्रोफेशनल लाइफ अनुभवाल. पालकांना आज त्यांच्या मुलांचा अभिमान वाटेल. शुभ रंग : सी ग्रीन शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : गरजूंना कपडे आणि अन्न दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही प्रयत्न करत असलेल्या कामात नशीबाचे दरवाजे उघडतील. परस्परांतील विश्वासाचा आदर केलात आणि शॉर्टकट टाळलेत तर तुम्हाला आज नक्की यश मिळेल. आज तुमच्या कामाबद्दल कौतुक आणि बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. लवकरच आर्थिक फायदा होणार आहे त्यामुळे आजचा दिवस मालमत्ता, दागिने, वाहनं आणि इतर संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगला आहे. खेळाडू आणि प्रवास करणाऱ्यांना दिवसात खूप चांगली फळं मिळतील. परीक्षेत नशीबाचं फळ मिळण्यासाठी हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला. गणपतीच्या मंदिरात जाऊन त्याचे आशीर्वाद घ्या. शुभ रंग : सी ग्रीन शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : वृद्धाश्रमात केळी दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची सर्जनशीलता उत्तम साथ देणार आहे त्यामुळे प्रोफेशनमधल्या सर्वच क्षेत्रांत तिचा उपयोग करा. तुम्ही प्रोफेशनमध्ये आणि खासगी आयुष्यातही खूप प्रामाणिक आहात असा लौकिक कमावणं कठीण असतं.तुमच्या व्यक्तिमत्त्वातील विश्वासार्हता आणि वचनबद्धता या गुणांचा इतरांना गैरवापर करू देऊ नका. दिवसभर रोमान्स आणि प्रेमाविषयी विचार कराल पण फसवणुकीपासून सावध रहा. तुमच्या ज्ञानामुळे लोकांना तुमच्याबद्दल आदर वाटतो. व्यवसाय किंवा नोकरीत चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास दिशाभूल होईल. हॉटेलियर्स, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी, डॉक्टर्स आदींनी त्यांच्या कौशल्यांचं प्रदर्शन करावं. आजचा दिवस त्यांच्यासाठी लकी आहे. खेळाडूंनी कोचचं मार्गदर्शन घ्यावं ते त्यांना भविष्यात उपयोगी पडेल. शुभ रंग : निळा शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरजूंना दही दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) अध्यात्माच्या माध्यमातून तुमचा सिक्स्थ सेन्स जागृत करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. काही रहस्यांची उकल होऊन प्रश्न सुटतील. थोडं लवचिक होऊन भूतकाळातून आलेली ऑफर स्वीकारा. नेतृत्व गुण आणि विश्लेषण कौशल्य या तुमच्या व्यक्तीमत्वातील जमेच्या बाजू आहेत. ज्ञान आणि चातुर्याने अर्थविषयक निर्णय घ्या. प्रतिमेला धक्का पोहोचू नये म्हणून भांडणं टाळा. प्रेमात परस्पर विश्वास वाढेत त्यामुळे जोडीदाराला एखादं वचन देऊ शकता. कोर्ट, थिएटर, तंत्रज्ञान, सरकारी टेंडर्स, रिअल इस्टेट, शाळा, इंटिरिअर्स ही क्षेत्रं आणि किराणा व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. जोपर्यंत भागीदारी करत नाही तोपर्यंत धंदा उत्तम चालेल. शुभ रंग : नारिंगी आणि हिरवा शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : गरजूंनी पिवळ्या रंगाचं धान्य दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज शनिदेवाची पूजा आणि गायीची सेवा कराच. तुम्ही लहान किंवा मोठ्या ब्रँडच्या कंपनीत काम करत असला तरीही तुमची प्रगती जबरदस्तच होणार आहे. धंद्यात आर्थिक व्यवहार यशस्वी होतील पण भागीदारांना तुमच्याबद्दल शंका येईल. काउन्सिलिंग, कौटुंबिक एकत्रीकरणं, प्रेझेंटेशन्स, सरकारी करार किंवा मुलाखती या पैकी कुठेही जावं लागलं तर जाच. आज कुटुंबाला वेळ द्या. प्रवास टाळा. आज ध्यान करा आणि प्रेमळ व्यक्तीच्या सहवासात रहा. शुभ रंग : गडद निळा शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना हिरव्या रंगाचे कपडे दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही दररोज सकाळी सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायलाच हवं. माणसासारखं वागणं हे नशीबाची दारं उघडण्याचं रहस्य आहे. माध्यमं, क्रीडा, बांधकाम, वैद्यकीय, राजकीय आणि चित्रपटसृष्टी या क्षेत्रातील जातकांना आज प्रसिद्धी मिळेल. शिक्षण आणि क्रिएटिव्ह आर्टमध्ये काम करणाऱ्यांची कामं पूर्ण होतील आणि त्यांना पैसे मिळतील. व्यवसाय किंवा सरकारी नोकरी मिळण्यासाठी सरकारमधील व्यक्तींशी संपर्क करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे कारण पलीकडे कुणीतरी वाट बघतंय. दिवस सुरू करताना पाकिटात लाल रंगाचा रुमाल ठेवा. शुभ रंग : लाल शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9, 6 दान : महिला मदतनीसांना कुंकू दान करा. 7 ऑगस्ट रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : एम. एस. स्वामीनाथन, मालविका मोहनन, सचिन जे. जोशी, सुरेश वाडकर, राजमोहन गांधी, दीपक चहर.
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology

पुढील बातम्या