मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Dementia: स्मृतिभ्रंशावर औषधं घ्याच, पण त्याबरोबर करा हे उपाय, होईल फायदा

Dementia: स्मृतिभ्रंशावर औषधं घ्याच, पण त्याबरोबर करा हे उपाय, होईल फायदा

डिमेन्शिया लक्षणं हळूहळू दिसायला लागतात.

डिमेन्शिया लक्षणं हळूहळू दिसायला लागतात.

डिमेन्शिया मेंदुच्या क्षमतेचा ऱ्हास (Decreased Brain Capacity) करतो. डिमेन्शियामुळेच स्मरण शक्ती कमी होते. डिमेन्शिया या आजारांमध्ये मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना हळूहळू इजा होऊन मेंदूची झीज (Brain Damage) होते.

दिल्ली, 14 मे : डिमेन्शिया (Dementia) किंवा स्मृतिभ्रंश हा वाढत्या वयानुसार येणारा आजार आहे. 50 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये हा आजार वाढताना आढळून येतो आहे. तर, 75 वर्षांपुढील 25 ते 30 टक्के लोकांमध्ये डिमेन्शिया होण्याचं प्रमाण जास्त आहे. बदलती जीवनशैली (Changing lifestyle), आजार, मानसिक आघात यामुळे डिमेन्शिया होऊ शकतो. डिमेन्शिया हा शब्द आता सगळ्यांना ओळखीचा वाटायला लागला आहे. डिमेन्शियाला आपण स्मृतिभ्रंश किंवा विसरण्याचा आजार म्हणून सुद्धा ओळखतो.

डिमेन्शिया म्हणजे काय?

वृद्धांमध्ये आढळणाऱ्या या व्याधींमुळे स्मृती (Memory) पुसट होत जाते. त्यामुळे आपला मेंदू (Brain) नियंत्रणात राहत नाही. या आजारामुळे आजारी व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर, विचारशक्तीवर, वागण्यात, स्वभावात आणि त्यामुळे स्वावलंबनावर परिणाम होत जातो. डिमेन्शिया मेंदूच्या क्षमतेचा ऱ्हास (Decreased Brain Capacity) करतो. डिमेन्शियामुळेच स्मरण शक्ती कमी होते. डिमेन्शिया या आजारांमध्ये मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना हळूहळू इजा होऊन मेंदूची झीज (Brain Damage) होते.

(कोरोना लशीच्या दोन डोसमधलं अंतर फायदेशीर; मृत्यूदर होणार कमी? काय सांगत संशोधन?)

डिमेन्शियाची लक्षणं

प्रत्येक व्यक्तीमध्ये डिमेन्शियाची लक्षणं वेगळी असतात. डिमेन्शिया लक्षणं हळूहळू दिसायला लागतात. त्यामुळे डिमेन्शिया आहे हे लक्षात येत नाही. अशा व्यक्ती एखादी गोष्ट लगेच विसरतात, तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहतात. स्थळ, काळ, वेळ यांचं भान राहत नाही. पूर्वी काय घडलं हे आठवत नाही. चेहऱ्यांची ओळख पटत नाही. विचार करण्याची क्षमता कमी होते. संभाषणात अडथळे येतात, शब्द आठवत नाहीत. रस्ताही विसरतात. त्यामुळे या व्यक्ती हरवण्याच्या घटनाही घडू लागतात. राग येणं, चिडचिडेपणा, उदास राहणं ही देखील डायमेन्शियाची लक्षणं आहेत. कधीकधी हा आजार इतका बळावतो की, शारीरिक गतीविधींवर नियंत्रण राहत नाही.

(कोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा')

एका अभ्यासानुसार डिमेन्शिया आजार होण्याचं प्रमाण वाढायला लागलं आहे. 2010 साली प्रसिद्ध झालेला डिमेन्शिया इंडिया रिपोर्ट (Dementia India Report) नुसार भारतात डिमेन्शिया आजाराचे रुग्ण लाखोंच्या घरात आहेत. तिथेच 2030 सालापर्यंत जगभरात रुग्ण वाढण्याची भितीही व्यक्त करण्यात आली आहे.

डिमेन्शियावरील उपाय

डिमेन्शिया हा आजार वयानुसार होणारा आजार आहे. या आजाराला पूर्ण बरं करणारी औषधं सध्या उपलब्ध नाहीत. जगात डिमेन्शिया या आजारावर संशोधन सुरु आहे. तात्पूरत्या औषधांनी थोडी लक्षणं कमी होतात पण, पूर्ण बरं वाटत नाही.

(Corona काळात गुळण्या करण्याचे फायदे आणि तोटे; ऐका डॉक्टरांचा सल्ला)

गाणे गायला सुरुवात करा

एका संशोधनानुसार डिमेन्शिया आजाराने ग्रासलेली व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत, मित्र परिवारासोबत गाणं गाते, क्वॉलिटी टाईम स्पेंड करते तेव्हा चांगला परिणाम दिसायला लागतो. त्यांना मानसिक आधाराची गरज असते, त्यांच्या आजुबाजूचं वातावरण चांगलं ठेवलं तर, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. द न्यूयार्क अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार गाणं आणि मानवी भावना यांचा संबंध असतो. गाण्याचा प्रभाव मेंदूमधील स्मृती साठवणाऱ्या भागावर पडतो. गाणं म्हणण्या (Singing) व्यतिरीक्त आणखीनही काही उपाय आहेत.

डान्स करावा

गाणं गायला आवडत नसलेल्या व्यक्तींनी झेपेल असा डान्स करावा. ‘डान्स बॉडी’  च्या फाउंडर कटिया प्राइसे (Katia Price) यांच्यानुसार डान्सने हार्ट बीट वाढतात. त्याने मेंदूचं कार्य सुधारतं. न्यूरोप्लास्टिकसिटी मजबूत होते. त्यामुळे डिमेन्शियाच्या रुग्णांनी डान्स करावा.

(कोरोना लशीच्या 2 डोसमधील अंतर वाढलं; आता इतक्या दिवसांनी घ्यावा लागणार दुसरा डोस)

फायबर आणि हेल्दी फॅटयुक्त जेवण

ब्रेन हेल्थ एक्सपर्ट मॅक्स लगावेर (Brain Health Expert Max Lagaver)यांच्या नुसार मेंदूला पोषण देणाऱ्या घटकांचा आहारात समावेश करावा. फायबर, हेल्दी पॅट, ड्रायफ्रुट, मशरुम आणि मांस हे घटक आहारात असावेत. मात्र, साखर आणि प्रोसेस्ट फूडचा वापर कमी करावा.

अनवाणी पायांनी चालणं

पिडियाट्रीक एमिली स्प्लिशल (Pediatric Emily Splissel) यांच्या मते आपली नर्व्हस सिस्टीम पायांसी जोडलेली असते. त्यामुळे पायात चप्पल किंवा सॉक्स न घातला एक्ससाईज करावे. त्यामुळे नर्वस सिस्टीम ऍक्टीव्ह होतं.

First published:

Tags: Brain, Health Tips