वाराणसी, 13 मे: काहीही होवो आता कोरोनासमोर (Coronavirus) हार मानणार नाही. कोरोनाला हरवणारचं असा निश्चय करून मोठ्या धीराने अनेकांनी कोरोनाचा सामना केला. कोरोनाचा लढा यशस्वीरित्या जिंकलाही. पण यानंतर कोरोनामुक्त झालेल्यांमसोर दुसऱ्या लढाईचं संकट येऊन ठेपलं आणि ते ब्लॅक फंगसचं (Black Fungus) म्हणजेच म्युकोरमायकोसिसचं. कोरोनातून वाचलेल्या काही जणांचा काळ्या बुरशीने जीव घेतला आहे. जर काही जणांचा जीव वाचवण्यासाठी आपले डोळे गमवावे लागले आहेत. आता तर एका रुग्णाला आपली सर्वात मोठी ओळख म्हणजे आपला चेहराच गमवावा लागला आहे. बिहारच्या वाराणसीत कोरोनामुक्त झालेल्या आणि ब्लॅक फंगसने गाठलेल्या 52 वर्षीय महिलेला आपला जीव वाचवण्यासाठी निम्मा चेहरा काढून टाकावा लागला आहे. बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. तब्बल 6 तास तिच्यावर सर्जरी झाली मिळालेल्या माहितीनुसार ही महिला कोरोनातून बरी झाली होती. कित्येक दिवस तिच्या चेहऱ्यावर सूज आली होती. त्यानंतर तिला बीएचयूमध्ये दाखल करण्यात आलं. या महिलेला डायबेटिज, थायरॉइड आणि हृदयाची समस्याही होती. हे वाचा - कोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात? वैज्ञानिकांनी सांगितलं उत्तर ही शस्त्रक्रिया करणारे ईएनची विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुशील कुमार अग्रवाल यांनी सांगितलं, पहिल्यांदा एखाद्या रुग्णाचा निम्मा चेहरा काढून सर्जरी करण्यात आली. जर तात्काळ ऑपरेशन केलं नसतं तर इन्फेक्शन तिच्या मेंदूपर्यंत गेलं असतं आणि ते तिच्यासाठी जीवघेणं ठरलं असतं. सहा महिन्यांनी जर महिलेचं इन्फेक्शन पूर्णपणे गेलं तर महिलेला सिलिकॉनचा आर्टिफिशिअल चेहरा, जबड्यासह दगडी डोळे लावले जातील. आतापर्यंत ब्लॅक फंगसशी संबंधित 15 ते 20 प्रकरणं पाहायला मिळाली आहे. त्यापैकी या महिलेसह चौघांचं ऑपरेशन करण्यात आलं आहे. त्यापैकी फक्त या महिलेचा निम्मा चेहरा काढण्यात आला तर इतरांना फक्त नाकाच्या ऑपरेशनमार्फत वाचवण्यात आलं आहे. हे चारही रुग्ण बीएचयूच्या आयसीयूमध्ये आहेत. त्यांना अँटीफंगल औषध दिलं जात आहे. हे वाचा - कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे असावं, NTAGI चा सल्ला याआधी महाराष्ट्रात म्युकोरमायकोसिसमुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली होती. तर गुजरातमध्ये बहुतेक रुग्णांचे डोळे काढावे लागले आहेत. हा जीवघेणा असात आजार आहे. जबडा, नाक आणि मेंदूपर्यंत हे इन्फेक्शन पसरतं. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डोळे, जबडा असे अवयवही काढावे लागतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







