COVISHIELD कोरोना लशीच्या 2 डोसमधील अंतर वाढलं; आता इतक्या दिवसांनंतर घ्यावा लागणार दुसरा डोस

COVISHIELD कोरोना लशीच्या 2 डोसमधील अंतर वाढलं; आता इतक्या दिवसांनंतर घ्यावा लागणार दुसरा डोस

सध्या कोरोना लशीच्या डोन डोसमधील (gap between the first and second doses of corona vaccine) अंतर हे 4 ते 6 आठवडे आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मे : कोरोना लशीचे (Corona vaccine) दोन डोस घेणं अनिवार्य आहेत. कोरोनाच्या दोन डोसमध्ये (gap between the first and second doses) किमान 28 दिवसांचं म्हणजे 4 आठवड्यांचं अंतर असतं. पण आता हे अंतर वाढवण्यात आलं आहे. आता कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 4 नाही तर  12 ते 16 आठवड्यांपर्यंत तुम्हाला कोरोना लशीचा दुसरा डोस घेता येईल. पण हा नियम फक्त कोविशिल्ड (Covishiled) कोरोना लशीसाठीच लागू असेल.

सीरम इ्नस्टि्यूटच्या कोविशिल्ड कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवावं अशी शिफारस सरकारच्या नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोव्हिड 19 (NEGVAC) या समितीने केली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शिफारस मान्य केली आहे.

त्यानुसार कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांनी वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आलं आहे. याचा अर्थ पहिला डोस घेतल्यानंतर एका महिन्याने नव्हे तर 3 ते 4 महिन्यांदरम्यान तुम्ही कधीही दुसरा डोस घेऊ शकता.

हे वाचा - 2 ते 18 वयोगटासाठी उपलब्ध होणार लस? भारत बायोटेकला मिळाली महत्त्वाची मंजुरी

दरम्यान कोरोना लशीचा दुसरा डोस घ्यायला उशीर झाला तर त्याचा प्रभाव कमी होतो का? किंवा मग पहिला डोस पुन्हा घ्यावा लागतो का, असे प्रश्न उपस्थित झाले.

लसीकरणानंतर काही जणांना साइड इफेक्ट्स (Side Effects) जाणवतात. अशा व्यक्तींचा अभ्यास आणि त्यांना मदत करण्यासाठी एक राष्ट्रीय समिती तयार करण्यात आली आहे. त्या समितीचे एक सदस्य डॉ. एन. के. अरोरा यांनी याबद्दल 'टाइम्स ऑफ इंडिया'ला माहिती दिली.

'लशीचा पहिला डोस घेतलेल्या अनेक व्यक्तींचा दुसरा डोस लांबणीवर पडला आहे, याची आम्हाला कल्पना आहे. मात्र त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. कोविशिल्ड (Covishield) किंवा कोव्हॅक्सिन (Covaxin) या लशींच्या दोन डोसमध्ये (लशीनुसार) 4 ते 6 आठवड्यांचं अंतर असणं अपेक्षित असतं. मात्र ते 8 ते 10 आठवड्यांपर्यंत लांबलं, तरी काहीही फरक पडत नाही. एवढ्या अंतराने दुसरा डोस घेतला, तरी तो प्रभावीच ठरतो. दोन डोसमधलं अंतर वाढलं तरी पुन्हा पहिला डोस घेणं गरजेचं नाही,' असं डॉ. अरोरा यांनी सांगितलं.

हे वाचा - भारत बायोटेकमध्ये खळबळ, व्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीतील 50 कर्मचारी पॉझिटिव्ह

इंटरनॅशनल पेडिअॅट्रिक असोसिएशनचे कार्यकारी संचालक आणि गुजरात कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. नवीन ठाकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं, 'लस कोणतीही असली, तरी दोन डोसमधला कालावधी जास्त असलेलं बऱ्याच जणांसाठी श्रेयस्कर ठरतं. कोव्हॅक्सिनच्या बाबतीत आतापर्यंत प्रसिद्ध झालेली माहिती असं सांगते, की चार ते सहा आठवड्यांचं अंतर दोन डोसमध्ये असावं. पण त्यापेक्षा जास्त कालावधी कदाचित अधिक प्रभावी ठरू शकतो. थोडक्यात सांगायचं तर, उशीर झाला म्हणून कोणीही दुसरा डोस घ्यायचं टाळू नये. उशीर झाला तरी पहिला डोस पुन्हा घ्यावा लागत नाही.'

Published by: Priya Lad
First published: May 13, 2021, 4:56 PM IST

ताज्या बातम्या