
कोरोना संक्रमाणाच्या काळात व्हॅक्सिनेशन हाच एकमेव विश्वसनीय उपाय वाटत असला तरी, कोरोनाच्या 2 डोसमध्ये गॅप झाल्यास पहिल्या डोसचा परिणाम कमी होतो का ? अशी शंका विचारली जात आहे.

कोरोना व्हॅक्सिनेशन बद्दल एक नवा अभ्यास समोर आला आहे. या अभ्यासानुसार कोरोना वॅक्सिनच्या दुसऱ्या डोस मधील गॅप वाढवला तर, कोरोनामुळे मृत्यूची शक्यता कमी होते. त्यामुळे वृद्ध व्यक्तींना दिलासा मिळालाय.

कोरोना व्हॅक्सिनेशन तयार करणाऱ्या फायझर कंपनीने या संदर्भात कोणताही क्लिनिकल दावा केलेला नसला तरी, इग्लंडच्या संशोधकांच्या मते दोन डोस मधला गॅप 12 आठवड्यांचा केल्यास फायदा होतो. इग्लंडमध्ये पहिल्या डोस नंतर मृत्यूचं प्रमाण 80 टक्के कमी झालं आहे.

ऑक्सफर्ड युनिवर्सीटीच्या अभ्यासानुसार एखाद्या व्यक्तीने दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी घेतल्यास त्याचा परिणाम दितो, डोके दुखी, सर्दी, थकवा अशी काही लक्षणं दिसायला लगातात. स्टडीनुसार एखाद्याला पहिला डोस फाइजर व्हॅक्सिन (Pfizer Vaccine) आणि नंतर दूसरा डोस एस्ट्रॉजेनेका (AstraZeneca) व्हॅक्सिनचा दिला तर, त्यांना त्रास होतो.

फाइजर आणि एस्ट्रॉजेनेका व्हॅक्सिनेशन ब्रिटेनमध्ये सुरु आहे. याशिवाय ‘मिक्स ऍन्ड मॅच' व्हॅक्सिन बनवण्यासाठी नोवावॅक्स (Novavax) आणि मॉडर्ना (Moderna) व्हॅक्सिनचीही ट्रायल सुरु आहे. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी चे प्रोफेसर मॅथ्यू स्नॅप या रिसर्चचं नेतृत्व करत आहेत. त्यांनी पुढच्या महिन्यात ‘मिक्स ऍन्ड मॅच' व्हॅक्सिनचे रिझल्ट मिळण्याचा दावा केला आहे.




