मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

या रक्तगटाच्या लोकांना तरुण वयात पक्षाघाताचा धोका जास्त; अभ्यासातून समोर आली बाब

या रक्तगटाच्या लोकांना तरुण वयात पक्षाघाताचा धोका जास्त; अभ्यासातून समोर आली बाब

रक्त घट्ट होण्याचा धोका टाळण्यासाठी, त्याची लक्षणं आणि कारणं जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. रक्त घट्ट होण्याची लक्षणं आणि कारणं कोणती आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.

रक्त घट्ट होण्याचा धोका टाळण्यासाठी, त्याची लक्षणं आणि कारणं जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. रक्त घट्ट होण्याची लक्षणं आणि कारणं कोणती आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.

बहुतेक प्रकरणांमध्ये स्ट्रोकमुळे शरीराचा अर्धा भाग अर्धांगवायूग्रस्त होतो. काही प्रकरणांमध्ये यामुळे व्यक्तीचा मृत्यूही होतो. स्ट्रोकच्या 4-5 तासांत उपचार सुरू केले तर व्यक्ती पूर्ववत होऊ शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 04 सप्टेंबर : अलिकडे तरुणांमध्येही पक्षाघाताचा धोका झपाट्याने वाढत आहे. पक्षाघात म्हणजे स्ट्रोक ही एक वैद्यकीय आणीबाणीची स्थिती असते, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मेंदूला रक्तपुरवठा होण्यामध्ये अचानक व्यत्यय येतो. रक्तपुरवठा खंडित होतो, तेव्हा मेंदूच्या पेशी खराब होतात. बहुतेक प्रकरणांमध्ये स्ट्रोकमुळे शरीराचा अर्धा भाग अर्धांगवायूग्रस्त होतो. काही प्रकरणांमध्ये यामुळे व्यक्तीचा मृत्यूही होतो. स्ट्रोकच्या 4-5 तासांत उपचार सुरू केले तर व्यक्ती पूर्ववत होऊ शकते. हृदयरोग किंवा मधुमेह असलेल्या लोकांना पक्षाघाताचा धोका जास्त असतो. आता एक नवीन अभ्यास समोर आला आहे, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की ए रक्तगट असलेल्या लोकांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो. अभ्यासात अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. याबद्दल सविस्तर (Stroke Risk Factors) जाणून घ्या.

रक्तगट आणि स्ट्रोक यांच्यातील संबंध -

मेडिकल न्यूज टुडेच्या मते, अलीकडील अभ्यासात असे म्हटले आहे की, A रक्तगट असलेल्या लोकांना O रक्तगटाच्या तुलनेत वयाच्या 60 वर्षापूर्वी स्ट्रोक येण्याचा धोका जास्त असतो. A रक्तगट असलेल्या लोकांना रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका जास्त असतो, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. अभ्यासात असेही म्हटले आहे की, असे लोक त्यांचा रक्तदाब आणि हृदयाचे आरोग्य सुधारून हा धोका कमी करू शकतात. हे असे दोन रक्त गट आहेत, जे स्ट्रोकशी जास्त संबंधित आहेत. याचा अर्थ असा नाही की, इतर रक्तगट असलेल्या लोकांना स्ट्रोक होत नाही. कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला हा त्रास होऊ शकतो.

या रक्तगटाचे बहुतेक रुग्ण?

या अभ्यासात आणखी एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे, ती म्हणजे पक्षाघाताचा झटका बसलेल्या लोकांमध्ये बी रक्तगटाचे लोक आहेत. मात्र, त्यांच्या रक्तगटामुळे त्याला पक्षाघात झाला असे नाही. याची अनेक कारणे असू शकतात, जी व्यक्तीच्या आरोग्य स्थितीवर अवलंबून असतात. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की येथे सर्व गोष्टी इस्केमिक स्ट्रोकच्या (ischemic stroke) प्रकरणांवर लागू होतात. लहान वयात हा सर्वात सामान्य स्ट्रोक मानला जातो.

हे वाचा - बद्धकोष्ठतेमुळे राहता त्रस्त? रात्री दुधासोबत प्या हा पदार्थ, त्रास होईल दूर

स्ट्रोकचा धोका कसा कमी करायचा -

स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी, उच्च रक्तदाब, मधुमेह मेलिटस, उच्च कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय धूम्रपान पूर्णपणे सोडून द्या. लठ्ठपणा कमी केल्याने पक्षाघाताचा धोका कमी होतो. याशिवाय तुम्ही निरोगी आहार घेऊ शकता आणि नियमित व्यायाम करा. जीवनशैलीत आवश्यक बदल करूनही हा धोका अनेक पटींनी कमी करता येतो. कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, डॉक्टरांशी संपर्क करणे आवश्यक आहे. नेहमी लक्षात ठेवा की, स्ट्रोक/ झटका आल्यानंतर पहिल्या काही तासांत उपचार मिळाले तर व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते.

हे वाचा - फिजिकल रिलेशन हे Cervical cancer चं मोठं कारण; दरवर्षी 67 हजार महिलांचा मृत्यू

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी वैदयकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

First published:

Tags: Health, Health Tips