जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Omicron BF.7: भारतात रुग्ण आढळल्यानंतर तज्ज्ञांनी सांगितला खबरदारीचा उपाय

Omicron BF.7: भारतात रुग्ण आढळल्यानंतर तज्ज्ञांनी सांगितला खबरदारीचा उपाय

Omicron BF.7: भारतात रुग्ण आढळल्यानंतर तज्ज्ञांनी सांगितला खबरदारीचा उपाय

Omicron BF.7: कोरोनाचं सावट संपलंय असं वाटत असताना त्याच्या ओमिक्रॉन BF.7 या स्ट्रेनने चिंता वाढवली आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

     मुंबई, 22 डिसेंबर :  कोरोनाचं सावट संपलंय असं वाटत असताना त्याच्या ओमिक्रॉन BF.7 या स्ट्रेनने चिंता वाढवली आहे. या स्ट्रेनने चीनमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. तर, भारतातही याचे तीन रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये ऑक्टोबरच्या सुरुवातीला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर दुसराही रुग्ण तिथेच आढळला आहे. तर, एक रुग्ण ओडिशामध्ये सापडला आहे. देशातील परिस्थिती सामान्य असली तरी ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट खूप वेगाने पसरत असल्याने चिंता वाढली आहे. हा विषाणू येत्या तीन महिन्यांत चीनमधील 60% लोकांना संक्रमित करेल, असं म्हटलं जातंय. विषाणूची संक्रमणक्षमता पाहता भारतातही नवीन कोविड लाट येऊ शकते का? याबद्दल तज्ज्ञांनी त्यांचं मत नोंदवलं आहे. या संदर्भात ‘हिंदुस्थान टाईम्स’ने वृत्त दिलंय. भारतामध्ये काय होणार? गुरुग्राम येथील सी. के. बिर्ला हॉस्पिटल (आर) मधील डिपार्टमेंट ऑफ इंटर्नल मेडिसीनचे डॉ रवींद्र गुप्ता यांनी कोरोनाच्या संभाव्य लाटेबद्दल भाष्य केलं. “कोरोना व्हायरस Covid BF.7 च्या रूपात म्युटेट होतोय, हा ओमिक्रानचाच एक प्रकार आहे. चीनमध्ये यामुळे वेगाने संक्रमण होतंय. लग्न समारंभ, मेळावे पुढे ढकला, कोरोनासंदर्भात IMA कडून मार्गदर्शक सूचना जारी हा प्रकार इतरांना लवकर संक्रमित करतो, तसेच त्याचा इन्युबेशन पीरियड कमी आहे. त्यामुळे लोकांना सहज संसर्ग होत असल्याचं कळतंय. चीनमधील 60% लोकांना पुढील तीन महिन्यांत याची लागण होण्याची होण्याची शक्यता आहे. लोक जगभरात प्रवास करतायत, त्यामुळे येत्या काळात ही एक भयानक परिस्थिती असू शकते. विमान प्रवासामुळे हा आजार जगभर सहज पसरू शकतो,” असं डॉ. गुप्ता म्हणाले. अमेरी हेल्थ, एशियन हॉस्पिटल, फरीदाबाद येथील कन्सल्टंट फिजिशियन आणि संसर्गजन्य रोग विशेषज्ञ प्रमुख डॉ चारूदत्त अरोरा म्हणाले, “अलीकडेच चीन, जपान, हाँगकाँग, ब्राझील आणि यूएस मध्ये कोविड -19 च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याच्या बातम्या येत आहेत. ही चिंतेची बाब आहे. चीनमधील एपिडेमियोलॉजिस्ट एरिक डेंगी यांनी ट्विट करत या व्हेरियंटमुळे पुढील काही महिन्यांत चीनमध्ये लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो” असं म्हटल्याचं अरोरांनी सांगितलं. खोकला नाही, ताप नाही; ही आहेत नव्या कोरोना विषाणूची लक्षणं? संसर्गदर जास्त ‘चीनमध्ये ओमिक्रॉनच्या BF.5.2.1.7 या व्हेरियंटमुळे लाट आली आहे. हा ओमिक्रॉनचा म्युटेट व्हेरियंट असून त्याचा संसर्गदर जास्त आहे. अभ्यासानुसार या व्हेरियंटची R0 व्हॅल्यू अंदाजे 10-18.6 आहे. म्हणजेच कोणतीही संक्रमित व्यक्ती त्याच्या आसपासच्या 10-18.6 लोकांना संक्रमित करू शकते. या विषाणूची लागण खूप लवकर होत असल्याने आरटीपीसीआर टेस्टमध्ये त्याचा शोध घेणं कठीण आहे. ज्यांचं लसीकरण झालं नाहीये, प्रतिकारशक्ती कमकुवत आहे असे वृद्ध नागरिक, मुलं, गरोदर स्त्रिया किंवा एकापेक्षा जास्त आजार असलेल्या रुग्णांचा या संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो,’ असं गुरुग्राममधील मणिपाल हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन कन्सल्टंट डॉ. अमिताभ घोष म्हणाले. Corona update : देशात मास्कसक्ती अटळ? खुद्द पंतप्रधान मोदी घालून आले मास्क ‘ओमिक्रॉनच्या इतर प्रकारांप्रमाणेच BF.7 हाही सबव्हेरियंट असून त्याचा वेगाने प्रसार होतोय. पण त्याचा मृत्यू दर जास्त नाही. भारतात, मृत्यूची आणि रुग्णालयात दाखल होणारी प्रकरणं फारच कमी आहेत. पण ते रुग्णाची प्रतिकारशक्ती आणि आधीपासून असलेल्या कॉमॉरबिडीटीसह विविध घटकांवर अवलंबून असतं,’ असं डॉ. घोष म्हणतात. ओमिक्रॉन BF.7 लक्षणं टताप, खोकला, घसा खवखवणं आणि नाक वाहणं यासारखी लक्षणं सारखीच आहेत. या लाटेमुळे एकट्या चीनमध्ये 10 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना लस घ्यावी, कारण ही गंभीर भयानक परिस्थिती टाळण्यासाठी लसीचा चौथा डोस उपयुक्त ठरू शकतो. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला लक्षणं दिसत नसतील तरीही ती आणखी 10 ते 18 लोकांमध्ये हा विषाणू प्रसारित करू शकते. पुढील काही महिन्यांत काय होईल, हे फक्त वेळच सांगेल, परंतु आपण खबरदारी घेतली पाहिजे. शक्यतो प्रवास टाळला पाहिजे,’ असं डॉ गुप्ता यांनी सांगितलं ‘सर्दी, ताप, थकवा, घसा खवखवणं, डोकेदुखी आणि अंगदुखी ही सामान्य लक्षणं आहेत. खोकला आणि श्वसनासंदर्भातील काही लक्षणंही संक्रमित रूग्णांमध्ये आढळतात. काहींना पोटदुखी, जुलाब आणि ओटीपोटात त्रास, अशीही लक्षणंदेखील दिसून येतात,” असं डॉ. अरोरा यांनी सांगितलं. ‘BF.7 ची लक्षणं ओमिक्रॉनच्या इतर व्हेरियंटसारखी आहे. या व्हेरियंटमधून न्यूमोनिया होण्याचं प्रमाण कमी आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांचं हॉस्पिटलायझेशन होण्याचं प्रमाण कमी आहे. तसेच आतापर्यंत ज्या देशात या व्हेरियंटचे रुग्ण वाढलेत, तिथल्या डेटानुसार मृत्यूदर खूप कमी आहे,’ असं मुंबईतील मसिना हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. तृप्ती गिलाडा म्हणाल्या. लसीची इम्युनिटी किती महिने राहते? ICMR तज्ज्ञांनी सांगितलं कोरोना परत आला तर… कोणती खबरदारी घ्यायची ? डॉ घोष म्हणाले, “स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वच्छता राखणं, मास्क घालणं, हात धुणं आवश्यक आहे. तसंच कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनी जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे. कोणत्या वयोगटावर या व्हेरियंटचा सर्वाधिक परिणाम होतो, याबद्दल स्पष्टता नसली तरी कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना जास्त धोका असतो. आता लोक कोविड आणि त्याच्या प्रकारांना सामोरे जात आहेत, त्यामुळे आपोआपच ते व्हायरसच्या नव्या व्हेरियंटविरोधात प्रतिकारशक्ती विकसित करत आहेत. लस आणि बूस्टर शॉट्सच्या मदतीने, लोक आता विषाणूचा सामना करू शकतात,” असं डॉ. घोष यांनी म्हटलंय.

    News18लोकमत
    News18लोकमत

    ‘कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे. जगभरातील निर्बंध शिथिल झाल्याने आणि सणासुदीच्या हंगामात, मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवणंही महत्त्वाचं आहे. टेस्टिंग वाढवून कम्युनिटी आउटब्रेक रोखण्यासाठी टेस्ट -ट्रॅक-ट्रीट-लसीकरण हे सर्वात महत्त्वाचे धोरण आहे,’ असं डॉ अरोरा यांनी स्पष्ट केलं. घाबरण्याची गरज आहे का? ‘कोविड लाटेची तीव्रता मोजण्यासाठी रुग्णसंख्या हे मानक असू नये, कारण लक्षणं सौम्य असतील. ऑक्सिजनची गरज असलेल्या किंवा हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असलेल्या मध्यम ते गंभीर प्रकरणांची संख्या गृहीत धरली जावी. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य कृती या गंभीर संक्रमणांवर आधारित असायला पाहिजे. कारण प्रत्येक वेळी नवीन म्युटेशन झाल्यास संसर्ग सौम्य असेल. भारताने डेल्टाच्या लाटेत बरेच लोक गमावले आणि जे वाचले त्यांची कोविड विरोधात प्रतिकारशक्ती चांगली आहे. आपली लसीकरणाची स्थितीही चांगली आहे. भारतात रोगप्रतिकारक शक्ती चांगली असलेली लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच ज्यांना BF.7 ची लागण होईल, त्यांची लक्षणं सौम्य असतील. यादरम्यान, आपण सावध राहून त्याचा जीनोमिक अभ्यास करत राहायला हवं आणि करोनाचा प्रत्येक व्हेरियंट कसा दिसतो हे समजून घ्यायला पाहिजे. सध्याची परिस्थिती पाहता जास्त घाबरण्याचं कारण नाही,” असं डॉ. गिल्डा यांनी सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात