नवी दिल्ली, 22 डिसेंबर : कोरोनामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. चीनच्या शेजारील देशांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने भारतातही दक्षता घेण्यास सांगितले जात आहे. यासोबतच मुखपट्ट्या (मास्क) घालण्याचा सल्ला दिला जातोय, सर्व लोकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस घेण्यास सांगितले जात आहे, जेणेकरून रोगाचे गांभीर्य टाळता येईल. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर दीर्घकाळ प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी बूस्टर डोस सुरू करण्यात आला. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशातील केवळ 27 टक्के लोकांनीच कोरोनासाठी लसीचा बूस्टर डोस घेतला आहे.
चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर आता भारतासमोर मोठा प्रश्न आहे की, जर संसर्ग भारतात वाढला तर ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत ते लोक यापासून सुरक्षित राहतील का? त्यांच्यामध्ये लसीची प्रतिकारशक्ती अजूनही शिल्लक आहे का? अनेक संशोधन आणि अभ्यासांमध्ये असे म्हटले गेले आहे की, लसीचा प्रभाव सुमारे एक वर्ष टिकतो, त्यामुळे भारतात 2021 पासून सुरू झालेल्या लसीकरणाला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यामुळे लसीचा परिणाम शरीरात अजूनही शिल्लक आहे की नाही?
याविषयी News18 ने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) विशेष वैज्ञानिक आणि ICMR चे माजी अतिरिक्त संचालक डॉ. समीरन पांडा यांच्याशी या प्रश्नांवर तपशीलवार चर्चा केली. ते म्हणाले की, भारतात कोरोना लसीकरण जानेवारी 2021 मध्ये सुरू झाले होते, परंतु येथे टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात आले. सर्वप्रथम, ही लस हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंटलाइन कामगारांना देण्यात आली, नंतर कॉमोरबिड वयस्क लोकांना, नंतर 45 ते 60 वर्षे वयोगटातील कॉमोरबिड आणि नंतर ही लस सामान्य लोकांना देण्यात आली. या सगळ्या प्रक्रियेला अनेक महिने लागले.
अशा स्थितीत सामान्य तरुणांना लसीचा पहिला डोस देण्याआधी सुमारे 6 महिने उलटून गेले होते. यानंतर, लसीचा दुसरा डोस लागू केला गेला, दुसऱ्या डोसमधील अंतर अनेक वेळा बदललं गेलं, दुसरा डोस बहुतेक 2 ते 3 महिन्यांच्या अंतराने दिला गेला. दुसरीकडे, ज्यांना पहिल्यांदा लसीचे दोन डोस मिळाले, त्यांनाही यावर्षी बूस्टर डोस देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत, प्रतिकारशक्ती एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ टिकते की नाही असा प्रश्न असल्यास, ती भारतातील लोकांमध्ये आहे, कारण लसीकरणाला दीड वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलेला नाही.
तथापि, कोरोनाबाबत प्रतिकारशक्ती दोन प्रकारे तयार होते, पहिली लसीद्वारे आणि दुसरी संक्रमणाद्वारे. भारतात लसीकरण जवळजवळ 100 टक्के झाले आहे आणि ओमिक्रॉनचा संसर्ग देखील झाला आहे, त्यामुळे लोकांमध्ये हायब्रीड किंवा सुपर इम्युनिटी असू शकते.
हे वाचा - कोरोनाबाबत सर्वात मोठी अपडेट; भारतात आढळला कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण
दुसरीकडे, जेव्हा लस घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा मानवी स्वभाव आहे की, आपल्यासमोर काही धोका असल्यास आपण सतर्क होतो, अशा परिस्थितीत चीनमधून कोरोनाच्या बातम्या येत आहेत आणि भारतातही कोरोनाचे 4 चायनीज व्हेरिएंटची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे बूस्टर डोस घेण्याचा आकडा भारतातही वाढेल आणि शरीरात कोरोनाशी लढण्याची शक्ती मजबूत होईल. हा श्वासोच्छवासाचा विषाणूजन्य संसर्ग आहे, जो कधीही होऊ शकतो, त्यामुळे हे लक्षात घेऊन लोकांनी बूस्टर डोस घ्यावा.
कोरोना चीनमधून आला का?
डॉ. पांडा म्हणतात की तो केवळ चीनमध्येच नाही तर जपान, ब्राझील आणि कोरियामध्येही पसरत आहे, त्यामुळे तो भारतातही येऊ शकतो, हे नाकारता येणार नाही, पण हे आवश्यक नाही की केवळ चिनी प्रकारच भारतात येईल आणि त्याचा चीनमध्ये जसा परिणाम होत आहे, तसाच परिणाम इथेही होईल. चीनमध्ये भारताप्रमाणे लसीकरण झालेले नाही किंवा संसर्गापासून प्रतिकारशक्तीही निर्माण झालेली नाही, तर भारतात संकरित प्रतिकारशक्ती आहे.
हे वाचा - भारतातही कोरोनाची भीती? लॉकडाऊन नाही पण हे नियम पुन्हा लागू होऊ शकतात
हा कोरोनाचा एक पूर्णपणे नवीन प्रकार असल्याने, ज्याचा नुकताच शोध लागला आहे. त्यामुळे दरवर्षी त्याच्या लसीचा डोस घेण्याचा सल्ला दिला जात आहे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग झाला तरी तो गंभीर अवस्थेत जाऊ नये.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हे करा
डॉ. समीरन सांगतात की, सरकार कोरोनाबाबत वेळोवेळी सल्लाही जारी करते. सध्या भारतात फारसा धोका नाही, परंतु अशा परिस्थितीत लोकांनी मुखपट्ट्या वापरणे आवश्यक आहे. आता बाहेर पडताना पुन्हा मुखपट्ट्या घालणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona updates, Corona vaccination