मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Cholesterol चांगलं की वाईट कसं ठरतं? बॅड कोलेस्टेरॉल वाढलं तर काय करायचं?

Cholesterol चांगलं की वाईट कसं ठरतं? बॅड कोलेस्टेरॉल वाढलं तर काय करायचं?

संबंधित रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेऊन लिपीड प्रोफाईल अर्थात कोलेस्टेरॉलची पातळी तपासली जाते. कोलेस्टेरॉलच्या पातळीवरून हृदयविकाराची स्थिती लक्षात येते.

संबंधित रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेऊन लिपीड प्रोफाईल अर्थात कोलेस्टेरॉलची पातळी तपासली जाते. कोलेस्टेरॉलच्या पातळीवरून हृदयविकाराची स्थिती लक्षात येते.

संबंधित रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेऊन लिपीड प्रोफाईल अर्थात कोलेस्टेरॉलची पातळी तपासली जाते. कोलेस्टेरॉलच्या पातळीवरून हृदयविकाराची स्थिती लक्षात येते.

मुंबई, 29 जुलै : हृदयविकार (Heart Disease) आणि कोलेस्टेरॉल (Cholesterol) या जणू एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हृदयविकार असलेल्या रुग्णांमध्ये कोलेस्टेरॉल हा घटक महत्त्वाचा ठरतो. संबंधित रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेऊन लिपीड प्रोफाईल अर्थात कोलेस्टेरॉलची पातळी तपासली जाते. कोलेस्टेरॉलच्या पातळीवरून हृदयविकाराची स्थिती लक्षात येते. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन अर्थात गुड कोलेस्टेरॉल (Good Cholesterol) आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन अर्थात बॅड कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) हे कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत.

हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजेच एचडीएलची (HDL) पातळी वाढलेली असणं हे हृदयविकाराच्या रुग्णासाठी फायदेशीर असतं. कारण यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. परंतु, या तुलनेत लो डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजेच एलडीएलची (LDL) पातळी वाढलेली असेल, तर तो हृदयविकाराच्या रुग्णांनी धोक्याचा इशारा समजावा आणि तातडीनं डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू करावेत.

एलडीएल अर्थात बॅड कोलेस्टेरॉल म्हणजे काय?

लो डेन्सिटी लिपोप्रोटीन अर्थात एलडीएल हे वाईट कोलेस्टेरॉल समजलं जातं. हे कोलेस्टेरॉल तुमच्या रक्तवाहिन्यांच्या वॉलमध्ये (Wall) जमा होतं. त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची (Heart Attack) किंवा स्ट्रोकची शक्यता वाढते. तसं पाहता कोलेस्टेरॉल धोकादायक नसतं. कारण शरीरातल्या मज्जातंतूंचं संरक्षण करण्यासाठी आणि निरोगी पेशी तसंच हार्मोन्ससाठी कोलेस्टेरॉलची गरज असते. काही प्रकारचं कोलेस्टेरॉल तुम्ही खात असलेल्या अन्नातून तयार होतं, तर काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची निर्मिती लिव्हर (Liver) करतं.

एलडीएल म्हणजे कोलेस्टेरॉलच्या केंद्रानजीक लिपोप्रोटीनच्या बाहेरील कडांपासून बनलेले द्रवरूप थेंब असतात. त्यामुळे एलडीएलला लो डेन्सिटी लिपोप्रोटीन असं म्हणतात. मानवी शरीरात एलडीएलचं प्रमाण एचडीएलच्या तुलनेत अधिक असतं. एचडीएल हे एलडीएलला लिव्हरपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं आणि तेथून ते शरीराबाहेर फेकलं जातं. त्यामुळे एचडीएल हे गुड कोलेस्टेरॉल मानलं जातं.

हेही वाचा - Mild Heart Attack : हृदयविकाराचा झटका कधी येतो? 'ही'आहेत हृदय विकाराच्या सौम्य झटक्याची लक्षणं

एलडीएल हे धोकादायक कसं?

एखाद्या रुग्णाच्या रक्त नमुना तपासणीत एलडीएलची पातळी जास्त असल्याचं दिसून आलं, तर संबंधित रुग्णाच्या रक्तात एलडीएल प्रमाणापेक्षा अधिक आहे, असं मानलं जातं. हे अतिरिक्त एलडीएल अन्य फॅटी पदार्थाच्या मदतीनं एक पदार्थ तयार करतं. त्यास प्लाक (Plaque) असं म्हटलं जातं. हे प्लाक धमन्यांमध्ये साठून राहू लागतं. यामुळे एथेरोस्क्लेरोसिस होतो. हृदयाच्या धमन्यांमध्ये प्लाक प्रमाणापेक्षा जास्त साठून राहिल्यास कोरोनरी आर्टरी डिसीज (Coronary Artery Disease) होतो. कारण प्लाकमुळं धमन्या कठीण होतात. तसंच आकुंचन पावतात. परिणामी हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यानं हृदयाला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे छातीमध्ये वेदना (Angina) किंवा दाह सुरू होतो. रक्तप्रवाह पूर्णतः ब्लॉक झाला तर प्रसंगी हृदयविकाराचा झटका येतो.

रक्तातल्या एलडीएलची पातळी किती असावी?

रक्तातल्या एलडीएलची पातळी जितकी जास्त असते, तितका कोरोनरी आर्टरी डिसीज व अन्य समस्या निर्माण होण्याचा धोका अधिक असतो. सर्वसामान्यपणे एलडीएलची 100 मिलिग्रॅम/डेसिलीटर पातळी चांगली समजली जाते. एलडीएलची 100 ते 129 मिलिग्रॅम/डेसिलीटर पातळी ठीक, 130 ते 159 मिलिग्रॅम/डेसिलीटर ही उच्च पातळीच्या तुलनेत किंचित कमी, 160 ते 189 मिलिग्रॅम/डेसिलीटर ही पातळी उच्च, तर 190 मिलिग्रॅम/डेसिलीटर किंवा त्यापेक्षा अधिक पातळी ही अतिउच्च समजली जाते.

एलडीएलची तपासणी केव्हा करावी?

वयाच्या 20व्या वर्षी प्रत्येकानं कोलेस्टेरॉलची तपासणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर 4 ते 6 वर्षांच्या अंतरानं ही तपासणी करावी. वयाच्या 40 वर्षांनंतर बहुतांश डॉक्टर ही तपासणी करण्याचा सल्ला देतात. 45 ते 65 वर्षं वयोगटातल्या पुरुषांनी आणि 55 ते 65 वर्षं वयोगटातल्या महिलांनी दर 1 किंवा 2 वर्षांनी कोलेस्टेरॉल तपासणी करावी.

हेही वाचा - Sinusitis Problem : साधी सर्दी की सायनसचा त्रास? साइनोसायटिस झालाय हे कसं ओळखावं?

एलडीएलची पातळी जास्त असल्यास हे विकार होतात

एलडीएलची पातळी प्रमाणापेक्षा अधिक असेल, तर कोरोनरी आर्टरी डिसीज, पेरिफेरल आर्टरी डिसीज, एथेरोस्क्लेरोसिस (Atherosclerosis), हृदयविकार, छातीत वेदना किंवा दाह, हृदयविकाराचा झटका, अचानक हृदयक्रिया बंद पडणं (Cardiac Arrest), स्ट्रोक हे आजार होऊ शकतात. त्यामुळे लिपिड प्रोफाइलच्या तपासणीत एलडीएलची पातळी जास्त दिसून आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं तातडीनं उपचार सुरू करणं गरजेचं आहे.

एलडीएल पातळी वाढण्यासाठी पूरक घटक

रक्तातील एलडीएल पातळी अर्थात बॅड कोलेस्टेरॉल वाढण्यासाठी काही घटक कारणीभूत असतात. हाय कोलेस्टेरॉलची कौटुंबिक पार्श्वभूमी, लठ्ठपणा, अतिरिक्त वजन, डायबेटिस टाइप-2 ही एलडीएल पातळी वाढण्यामागची महत्त्वाची कारणं आहेत. याव्यतिरिक्त धूम्रपान, आहारात सॅच्युरेटेड, ट्रान्स फॅटयुक्त पदार्थांचा समावेश, व्यायामाचा किंवा पुरेशा शारीरिक हालचालींचा अभाव, प्रमाणापेक्षा अधिक मद्यपान यांमुळेदेखील एलडीएल पातळी वाढते आणि हृदयविकार होऊ शकतो. त्याचप्रमाणे अन्य आजारांवरच्या औषधांच्या सेवनामुळेदेखील एलडीएल पातळी वाढल्याचं दिसून येतं. स्टेरॉइड्स, उच्च रक्तदाबासाठीची औषधं, तसंच एचआयव्ही–एड्सवरच्या (HIV-AIDS) औषधांचा यात समावेश आहे.

एलडीएल पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना

रक्तातली एलडीएल पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. तसंच पुरेसा व्यायाम करणं, शारीरिक हालचाली वाढवणं, हृदयाला पूरक आहार घेणं, आहारात फळे, भाजीपाला, फॅट कमी असलेले दुग्धजन्य पदार्थ, सीफूड यांचा समावेश करणं, धूम्रपान सोडणं आणि अल्कोहोल सेवन न करणं किंवा कमी करणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle