मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Sinusitis Problem : साधी सर्दी की सायनसचा त्रास? साइनोसायटिस झालाय हे कसं ओळखावं?

Sinusitis Problem : साधी सर्दी की सायनसचा त्रास? साइनोसायटिस झालाय हे कसं ओळखावं?

काही जणांना वारंवार सर्दी होत असते. तसंच ती बरेच दिवस राहत असते. अशा वेळी सायनसचा (Sinus) त्रास असल्याचं सांगितलं जातं. सायनस म्हणजे नेमकं काय? हा त्रास का होतो ? याविषयी जाणून घेऊ या...

काही जणांना वारंवार सर्दी होत असते. तसंच ती बरेच दिवस राहत असते. अशा वेळी सायनसचा (Sinus) त्रास असल्याचं सांगितलं जातं. सायनस म्हणजे नेमकं काय? हा त्रास का होतो ? याविषयी जाणून घेऊ या...

काही जणांना वारंवार सर्दी होत असते. तसंच ती बरेच दिवस राहत असते. अशा वेळी सायनसचा (Sinus) त्रास असल्याचं सांगितलं जातं. सायनस म्हणजे नेमकं काय? हा त्रास का होतो ? याविषयी जाणून घेऊ या...

मुंबई, 25 जुलै : चेहऱ्याच्या आणि कवटीच्या हाडांत असलेल्या हवेच्या पोकळ्या म्हणजे सायनस. ही सायनसेस दोन्ही डोळ्यांच्या खालच्या बाजूस, डोळ्यांच्या वर कपाळामध्ये, दोन डोळ्यांच्या मधल्या बाजूस आणि नाकाच्या मागे असतात. सायनसमुळे कवटीचं वजन कमी होतं. आवाजाला एक नाद येतो. सायनसचे मॅक्झिलरी, इथेमॉइड, फ्रंटल आणि स्फिनॉइड असे चार प्रकार आहेत. प्रत्येक सायनसचे लहानसे दरवाजे नाकाच्या आत उघडणारे असतात. हे सायनसेस सतत एक प्रकारचा पातळ स्राव म्हणजे ‘म्युकस’तयार करत असतात. सायनसद्वारे तयार झालेला पातळ म्युकस आधी नाकात उतरतो आणि पुढे नाकावाटे घशात उतरतो. ही क्रिया आपल्या प्रत्येकाच्या नकळत सातत्याने घडत असते. काही कारणाने सायनसमध्ये तयार होणाऱ्या स्रावाचं प्रमाण वाढलं, तर तो स्राव नाकातून घशात जाऊ शकत नाही आणि नाकावाटे वाहायला लागतो. यालाच आपण सर्दी म्हणतो.

सायनसेसमध्ये वाजवीपेक्षा अधिक पातळ पाणी बनू लागले आणि ते नाकावाटे वाहू शकत नसल्यामुळे सायनसमध्येच साठून राहिलं, तर तिथे जिवाणू किंवा विषाणू संसर्ग होण्याची शक्यता असते. असा संसर्ग झाल्यानंतर नाकातून वाहणारं पाणी घट्ट होतं आणि पिवळ्या रंगाचा शेंबूड बाहेर पडू लागतो. श्वास घेण्यास त्रास होतो. यालाच सायनुसायटिस सं म्हणतात. आपल्या देशात 134 दशलक्ष नागरिकांना सायनुसायटिसचा त्रास होतो. सायनुसायटिस हा सायनसशी संबंधित सगळ्यात सामान्य आजार मानला जातो.

सायनसच्या त्रासाची लक्षणं आणि नेहमीच्या सर्दीची लक्षणं यांतला फरक ओळखणं कठीण असतं. सर्दी एक-दोन आठवड्यांत बरी झाली नाही, तर सायनसचा त्रास वाढू नये यासाठी तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांकडे जाणं गरजेचं आहे. सर्दीमुळे वाहणारं नाक, बंद नाक, तीव्र डोकेदुखी, खूप ताप, सतत कफ असणं, वास न येणं ही सगळी लक्षणं सायनसची आहेत. यापेक्षा अधिक त्रास होत असेल, तर तीव्र स्वरूपाचा सायनुसायटिस आहे असं म्हटलं जातं. त्रासाच्या तीव्रतेनुसार या आजाराचं अॅक्युट, सबअॅक्युट आणि क्रॉनिक अशा तीन प्रकारांत वर्गीकरण करण्यात येतं.

अॅक्युट सायनुसायटिसमध्ये चेहऱ्यावर जडपणा येणं, चेहरा आणि गाल सुजल्यासारखे दिसणं, पुढच्या बाजूस किंवा खाली वाकल्यावर डोकं आणि गाल दुखणं, वरच्या दातांमध्ये ठणका लागणं अशी लक्षणं दिसतात. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ सायनसचा त्रास कायम असेल तर त्याला वैद्यकीय भाषेत 'क्रॉनिक सायनुसायटिस' (Chronic Sinusitis) म्हणतात. यात सतत चेहऱ्यावर जडपणा राहतो, ताजंतवानं वाटत नाही, नाक बंद झाल्यासारखं वाटतं.

Carrot Health Benefits : तुम्हाला माहिती नसतील असे गाजर खाण्याचे फायदे; फक्त डोळेच नाही संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त

काही जणांना वारंवार आणि खूप दिवस टिकणारी सर्दी होते, त्याला 'रीकरंट सायनुसायटिस' असं म्हणतात. ही सर्दी दर 2-3 महिन्यांनी होते आणि एकदा झाली की ती 8-10 दिवस राहते. याची लक्षणंही अॅक्युट सायनुसायटिससारखीच असतात.

सायनसचा त्रास होण्यामागे नाकाचा पडदा वाकडा असणंही कारणीभूत असू शकतं. नाकाच्या पडद्याला सेप्टम असं म्हणतात. सगळ्याच व्यक्तींमध्ये तो एका बाजूला थोडा वाकलेलाच असतो. अगदी सरळ असा कोणाचाच नसतो. दोन नाकपुड्यांना वेगळं करणारा हा पडदा कार्टिलेज आणि हाडांनी बनलेला असतो. त्यामुळे त्रास होत नसेल तर काळजीचं कारण नसतं.

काही वेळा नैसर्गिकरीत्या किंवा अपघातामुळे नाकाला जास्त बाक असेल तर ज्या बाजूला नाक वाकलं आहे, त्या बाजूने श्वास घेताना अडथळा येतो. नीट श्वास घेता येत नसल्यानं नाकाच्या त्या बाजूला असलेल्या सायनसमध्ये संसर्ग होतो. घोरणं सुरू होतं. नाकातून रक्त येतं. कानाचा पडदा आत ओढला जाणं, कानात पाणी होणं, तात्पुरतं बहिरेपणं येणं अशा समस्याही निर्माण होतात. यावर शस्त्रक्रिया हाच उपचार असतो. नाकाचा जेवढा भाग वाकलेला आहे त्या भागावर सेप्टोप्लास्टी शस्त्रक्रिया केली जाते किंवा सबम्युकस रिसेक्शन म्हणजेच एसएमआर शस्त्रक्रिया केली जाते.

White Discharge : अंगावरून पांढरे पाणी जात आहे? घाबरून जाऊ नका; करून पाहा हे प्राथमिक उपाय

सायनुसायटिसच्या त्रासाशिवाय सायनसचा कर्करोग होण्याची शक्यता असते. नाकातून घाण वास येणारा द्रवपदार्थ बाहेर पडणं, रक्तमिश्रित द्रव येणं ही याची सूचक लक्षणं आहेत. अशी काही लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. ही लक्षणं दिसली म्हणजे कर्करोग असेलच, असं नाही; मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. सायनसचा कर्करोग असल्याचं निदान झालं आणि कर्करोग फक्त सायनसेसपुरता मर्यादित असेल, पसरलेला नसेल तर शस्त्रक्रिया करून यशस्वी उपचार करता येतात. सायनसचा कर्करोग झाल्यास मॅक्झिलेक्टॉमी केली जाते. या शस्त्रक्रियेत टाळू आणि दाढ काढावी लागते. मग त्या जागी खड्डा तयार होतो. पूर्वी वैद्यकीय तंत्रज्ञान खूप प्रगत नसल्यानं हे दिसायला विचित्र दिसत असे. आता मात्र आधुनिक उपचार पद्धतीमुळे चेहरा ठीकठाक दिसेल असा उपाय केला जातो. सायनसचा कर्करोग डोळ्याकडे पसरला तर डोळा काढण्याचीही वेळ येते. अशा वेळी कृत्रिम आयबॉल लावतात.

सायनुसायटिस हा आजार प्रचलित असला तरी त्याचं गंभीर स्वरूप धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे त्याकडे वेळीच लक्ष देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सतत सर्दी होत असेल, ती लवकर बरी होत नसेल आणि अन्य लक्षणं जाणवत असतील तर तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle