मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Mild Heart Attack : हृदयविकाराचा झटका कधी येतो? 'ही'आहेत हृदय विकाराच्या सौम्य झटक्याची लक्षणं

Mild Heart Attack : हृदयविकाराचा झटका कधी येतो? 'ही'आहेत हृदय विकाराच्या सौम्य झटक्याची लक्षणं

काही वर्षांपूर्वी सर्वसाधारणपणे प्रौढ किंवा वयस्क व्यक्तींमध्ये हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होत. परंतु आता अल्पवयीन व्यक्ती किंवा तरूणांमध्येही हृदय विकार दिसून येतो.

काही वर्षांपूर्वी सर्वसाधारणपणे प्रौढ किंवा वयस्क व्यक्तींमध्ये हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होत. परंतु आता अल्पवयीन व्यक्ती किंवा तरूणांमध्येही हृदय विकार दिसून येतो.

काही वर्षांपूर्वी सर्वसाधारणपणे प्रौढ किंवा वयस्क व्यक्तींमध्ये हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होत. परंतु आता अल्पवयीन व्यक्ती किंवा तरूणांमध्येही हृदय विकार दिसून येतो.

मुंबई, 29 जुलै : हृदय हा शरीरातील महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे. शरीराचं संपूर्ण कामकाज हे हृदयावर अवलंबून असतं. त्यामुळे हृदय विकाराचा झटका म्हणजे हार्ट अॅटॅक (Heart Attack) जीवघेणा ठरू शकतो. सध्याच्या काळात वाढते ताण-तणाव, सुसंवादाचा अभाव, बैठे कामकाज, लठ्ठपणा, अनुवंशिकता, चुकीचा आणि अनियमित आहार तसेच व्यायामाचा अभाव यामुळे हृदय विकार असलेल्यांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी सर्वसाधारणपणे प्रौढ किंवा वयस्क व्यक्तींमध्ये हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होत. परंतु आता अल्पवयीन व्यक्ती किंवा तरूणांमध्येही हृदय विकार दिसून येतो.

वैद्यकीय दृष्टीकोनातून धमन्यांकडून हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही किंवा रक्त पुरवठा प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो तेव्हा संबंधित रुग्णाला हार्ट अटॅक म्हणजेच मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन (Myocardial Infarction) येतो. धमन्यांमध्ये दिर्घकाळापर्यंत अडथळा निर्माण झाला आणि हृदयाला होणारा रक्त पुरवठा विस्कळीत झाला तर रुग्णाचं मोठया प्रमाणात शारीरिक नुकसान होण्याची किंवा प्रसंगी मृत्यू होण्याची शक्यता असते.

Diabetes Prevention : डायबिटीज होऊ नये म्हणून काय करावं? मधुमेह टाळण्यासाठी हे आहेत उपाय

हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वसामान्यपणे दोन प्रकार असतात. एक म्हणजे तीव्र स्वरुपाचा झटका आणि दुसरा म्हणजे सौम्य स्वरुपाचा झटका होय. हृदयविकाराच्या सौम्य झटक्याला (Mini Attack) नॉन -एसटी इलेव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन (NSTEMI) असंही म्हणतात. कोरोनरी आर्टेरिजमध्ये तात्पुरत्या स्वरुपात अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकाराचा सौम्य झटका येतो. सौम्य स्ट्रोकप्रमाणेच हृदय विकाराच्या सौम्य झटक्याची लक्षणं ही अल्पकालीन आणि सौम्य असू शकतात. तीव्र लक्षणं (Symptoms) नसणं आणि हृदय विकाराच्या झटक्यानंतर संबंधित रुग्णाला सामान्य वाटू लागणं या दोन कारणांमुळे याला सायलेंट हार्ट अॅटॅक (Silent Heart Attack) असंही म्हणतात. कोरोनरी हार्ट डिसीज मुळे (Coronary Heart Disease) धमन्या ब्लॉकेज होतात. कोरोनरी हार्ट डिसीज साठी उच्च रक्तदाब, डायबेटिस, धुम्रपान, पोषक आहाराचा अभाव, लठ्ठपणा किंवा अतिरिक्त वजन, ताण हे रिस्क फॅक्टर असतात.

हृदय विकाराच्या सौम्य झटक्याचे निदान करण्यासाठी डॉक्टर संबंधित रुग्णाच्या काही तपासण्या करतात. यात इलेक्ट्रोकार्डिओग्राम, इकोकार्डिओग्राम, छातीचा एक्स-रे, सीटी स्कॅन, पेट स्कॅन, एमआरआय, एसपीईसीटी, स्ट्रेस टेस्ट, हॉल्टर मॉनिटर, एमयुजीए स्कॅन, एमपीआय टेस्ट, टिल्ट टेबल टेस्ट, टीईई टेस्ट तसेच रक्त तपासणीत सी रिअक्टिव्ह प्रोटीन, कोलेस्ट्रॉल, सिरॅमिडस, बीएनपी या तपासण्यांचा समावेश असतो. या तपासण्यांच्या माध्यमातून हृदयविकाराची तीव्रता लक्षात येते. हृदय विकाराच्या सौम्य झटक्याची लक्षणं नेमकं कोणती असतात ते सविस्तरपणे जाणून घेऊया.

ही आहेत हृदय विकाराच्या सौम्य झटक्याची लक्षणे

- छातीत दुखणे किंवा छातीच्या मध्यभागी जडपणा जाणवणे. अशा प्रकारची अस्वस्थता काही मिनिटं जाणवते. काही वेळानं ती जाऊन पुन्हा येऊ शकते.

- घशात वेदना होणं. हे लक्षण काहीसं संभ्रमात टाकणारं असतं. कारण अपचन अथवा पित्त वाढल्यास अशा स्वरुपाचा त्रास होऊ शकतो.

- थकवा येणं.

- छातीत दुखत असताना किंवा अस्वस्थता जाणवत असताना तसेच या स्थितीनंतर श्वास घेण्यास त्रास होणं.

- पाठीचा वरचा भाग, जबडा, मान किंवा पोटात वेदना होणं.

- डोकं हलकं वाटणं किंवा मळमळ होणं.

- शरीर थंड पडल्यासारखं वाटणं.

- उलटी होणं.

- छातीत जळजळ होणं.

- हृदयाचे ठोके असमान आणि जलद होणं.

- चक्कर येणं.

- महिलांमध्ये पोटाच्या वरील भागात वेदना होणं आणि अधिक प्रमाणात थकवा जाणवणं.

Sinusitis Problem : साधी सर्दी की सायनसचा त्रास? साइनोसायटिस झालाय हे कसं ओळखावं?

हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर रुग्णाच्या शारीरिक स्थितीनुसार डॉक्टर उपचारांची दिशा ठरवतात. त्यात प्रामुख्यानं औषधं, ऑक्सिजन पुरवठा यांचा समावेश असतो. आजाराची तीव्रता अधिक असल्यास बलून अन्जिप्लास्टी, स्टेंटनिंग, सीएबीजी यांसारख्या शस्त्रक्रिया करण्याची गरज देखील भासू शकते.

हृदय विकाराचा सौम्य किंवा तीव्र झटका येऊ नये तसेच हृदय विकार होऊ नये, यासाठी काही विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. यात प्रामुख्यानं दररोज व्यायाम करणं, वजन नियंत्रणात ठेवणं, एलडीएल आणि कोलेस्ट्रॉल पातळी सातत्यानं तपासून त्यानुसार आहाराचं नियोजन करणं या बाबींचा समावेश असतो. या व्यतिरिक्त तंबाखू सेवन, धूम्रपान यासारख्या व्यसनांपासून दूर राहणं, आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणं, सोडीयम, साखर आणि गोड पदार्थ कमी प्रमाणात सेवन करणं आवश्यक आहे. तसेच ताण-तणाव अधिक असल्यास स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी योगा, मेडिटेशन आदी गोष्टी सुरू कराव्यात. ताण-तणाव जितका नियंत्रणात राहिल तितका हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

एकूणच हृदयविकाराच्या सौम्य झटक्याशी संबंधित लक्षणांबाबत प्रत्येकानं जागरूक असणं गरजेचं आहे. कोणतंही लक्षण दिसून आल्यास तातडीनं वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे. नियमित आरोग्य तपासणी, रक्तदाब तपासणी, कोलेस्ट्रॉल तपासणी करणं हितावह ठरतं. सध्याची जीवनशैली अयोग्य असल्यास भविष्यातील धोके लक्षात घेऊन त्यात तातडीनं बदल करणं महत्त्वाचं आहे. यामुळे हृदय विकार आणि हृदय विकाराचा सौम्य किंवा तीव्र झटक्याला दूर ठेवणं शक्य होतं. तसेच कोणतीही लक्षणं दिसल्यास त्यावर घरगुती किंवा मनानं उपचार करणं टाळावं. वेळीच वैद्यकीय सल्ला आणि उपचार घेण्यास प्राधान्य द्यावं.

First published:

Tags: Health Tips, Heart Attack, Lifestyle