जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Kale Day : पालकासारखी दिसणारी ही केल भाजी आरोग्यासाठी किती फायदेशीर?

Kale Day : पालकासारखी दिसणारी ही केल भाजी आरोग्यासाठी किती फायदेशीर?

Kale Day : पालकासारखी दिसणारी ही केल भाजी आरोग्यासाठी किती फायदेशीर?

ही एक हिरवी, पालेभाजी आहे ज्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. ही संपूर्ण शरीरासाठी आरोग्यदायक आहे. केल अनेक प्रकारे आहारात समाविष्ट केले जाऊ शकते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 ऑक्टोबर : दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या बुधवारी केल डे साजरा केला जातो. केल ही भाजी अगदी सामान्य दिसत असली तरीदेखील तिचे अनेक आरोग्य फायदे आहेत. ही एक हिरवी, पालेभाजी आहे ज्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. ही संपूर्ण शरीरासाठी आरोग्यदायक आहे. केल अनेक प्रकारे आहारात समाविष्ट केले जाऊ शकते आणि आपण ते कच्चे किंवा शिजवून दोन्ही प्रकारे खाऊ शकता. WebMD नुसार, केल हे एक सुपरफूड आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे शरीरातील रक्त आणि हाडे तयार होण्यासोबतच आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. त्यात अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, फोलेट आणि मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन बी देखील असते. केल मोतीबिंदूची समस्या दूर ठेवण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि कर्करोगापासून बचाव करण्यासदेखील मदत करू शकते.

Benefits of Dry-fruits : उत्तम आरोग्यासाठी अक्रोड खाणं कधीही चांगलं; फायदे वाचून तुम्हीही रोज खायला सुरूवात कराल

या 5 मार्गांनी करा आहारात सामील सॅलड केल तुम्ही सॅलडमध्ये घालूनदेखील खाऊ शकता. यासाठी केल बारीक चिरून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची आणि 1 चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घाला. तुम्ही त्यात ऑलिव्ह ऑईल, मूग किंवा हरभरादेखील घालू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

सूप केलचे सूप खूप चविष्ट आणि आरोग्यदायी असते. हे बनवण्यासाठी केल, 1 मोठा टोमॅटो, 2-3 बीन्स, 1 तुकडा दालचिनी, अर्धा चमचा जिरे आणि मीठ उकळवा. नंतर ते चांगले घेऊन फेटून गाळून घ्या. चिप्स किंवा पकोडे जर तुम्हाला स्नॅक बनवायचा असेल तर एका भांड्यात बेसन पीठ, थोडी लसूण पेस्ट, अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईल, मीठ आणि कोथिंबीर टाकून एकत्र करा आणि या पेस्टमध्ये केलची पाने घाला. आता तुम्ही ते तळून किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता. स्मूदी केल स्मूदी बनवण्यासाठी एक कप बदामाचे दूध घ्या आणि त्यात 1 मूठभर केळीची पानं घाला. आता त्यात 1 टीस्पून मध, अर्धा केळी, 1 टीस्पून अननस आणि 1 टीस्पून पीनट बटर घालून मिक्स करा. जर मिश्रण जास्त घट्ट झाले असेल तर त्यात आणखी थोडे बदामाचे दूध घालून ते पातळ करू शकता.

जेवणात करा शेंगदाणा तेलाचा समावेश; ‘हे’ होतील फायदे

पराठा केल बारीक चिरून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारीक करा. आता त्यात मल्टीग्रेन पीठ मिक्स करून पराठा बनवा. गरमागरम पराठे पीनट बटरबरोबर सर्व्ह करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात