मुंबई, 03 ऑक्टोबर : आरोग्यसाठी तेलाचा वापर फायदेशीर मानला जातो. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात तेलकट पदार्थांचा समावेश असतो. शरीरासाठी तेलाचे फायदे आणि तोटे आहेत. आपण वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी सर्वसामान्यपणे सोयाबीन, सूर्यफूल, मोहरी, शेंगदाणा किंवा राईस ब्रान तेलाचा वापर करतो. यापैकी शेंगदाणा तेल हे आरोग्यसाठी विशेष लाभदायक असते. तसेच या तेलामुळे पदार्थांचा स्वाद वाढतो. शेंगदाणा तेलात अनेक पोषक घटक असतात. मात्र उत्तम आरोग्यासाठी या तेलाचा संतुलित वापर करणं आवश्यक आहे. यामुळे अनेक शारीरिक समस्या दूर होतात, असं आहारतज्ज्ञांनी सांगितलं. `हेल्थ शॉट्स डॉट कॉम`नं या विषयीची माहिती दिली आहे. आपल्या देशात अन्न पदार्थ बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ बनवण्यासाठी आपल्याकडे तेलाचा वापर केला जातो. यात शेंगदाणा तेल आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. यामुळे पदार्थदेखील चवदार होतात. सर्वसामान्यपणे शेंगदाणा तेलाचे चार प्रकार आहेत. रिफाईंड शेंगदाणा तेल हे रिफायनिंग करून बनवलं जातं. यामुळे अॅलर्जीचा धोका कमी होतो. कोल्ड प्रेस्ड शेंगदाणा तेल हे शेंगदाणे बारीक करून त्यापासून बनवलं जातं. या तेलात आयोडीन आणि लिओनिक अॅसिड मुबलक असतं. गॉर्मेट पीनट ऑईल हे तेल भाजलेल्या शेंगदाण्यापासून तयार केलेलं असतं. याला शेंगदाण्याचा तीव्र स्वरुपात वास येतो. हेही वाचा - मधुमेहाच्या रुग्णांनी मध खाल्ला तर चालेल का? कसा होतो हेल्थवर परिणाम रिफाईंड तेलाला सौम्य वास असतो. या तेलाचा वापर प्रामुख्याने पदार्थ तळणं, फोडणी देणं किंवा चव येण्याकरता केला जातो. भाजलेल्या शेंगदाण्यापासून तयार केलेलं हे तेल सुगंधित असतं. सर्वसामान्यपणे याचा वापर पदार्थाच्या चव येण्यासाठी केला जातो. भाजलेल्या शेंगदाण्याचे तेल सॅलडवर टाकूनही खाता येतं. इतर कोणत्याही तेलात शेंगदाणा तेल मिक्स करून ते केसांना तसेच त्वचेला लावता येतं. शेंगदाणा तेलाचे आरोग्याच्या दृष्टीनं अनेक फायदे आहेत. त्वचेच्या आरोग्यासाठी या तेलाचा वापर लाभदायक ठरतो. स्किन एजिंग रोखण्यासाठी तुम्ही या तेलाचा वापर करू शकता. या तेलामुळे त्वचेला आर्द्रता मिळते. सूर्याच्या हानीकारक अतिनील किरणांपासून संरक्षण मिळते. शेंगदाणा तेलात व्हिटॅमिन ई मुबलक असते. त्यामुळे अकाली वृद्धत्वाची लक्षणं यामुळे दूर राहतात. इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यासाठी शेंगदाणा तेल फायदेशीर ठरतं. इन्शुलिनच्या प्रतिकारामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा स्थितीत इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारणं गरजेचं असतं. शेंगदाणा तेलातील ऑलिक अॅसिड इन्शुलिन निर्मितीत अडथळा आणणाऱ्या इन्फ्लेमेटरी सायटोकाईन टीएनएफ-अल्फाचा प्रभाव कमी करण्यास मदत करतं. यामुळे डायबेटिस टाइप-2 च्या रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसतात. शेंगदाणा तेलात पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स असतात. पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड ऱ्ह्यमेटाइड आर्थरायटिसससारखे वेदनादायी आजार दूर ठेवण्यास मदत करते. या शिवाय संधिवाताच्या समस्येत शेंगदाणा तेल थेट त्वचेवर लावल्यास रुग्णाला दिलासा मिळू शकतो. हेही वाचा - तुम्ही देखील चहासोबत ब्रेड खाता का? मग सावधान! यामुळे आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान हृदयाच्या आरोग्यात कोलेस्टेरॉलची भूमिका महत्त्वाची असते. कोलेस्टेरॉलची लेव्हल वाढली तर हृदयाशी संबंधित अनेक विकार होऊ शकतात. शेंगदाणा तेलाचं सेवन केल्यास एचडीएल अर्थात चांगल्या कोलेस्टेरॉलची लेव्हल कमी न होता, हानीकारक कोलेस्टेरॉल अर्थात एलडीएलची लेव्हल कमी होते. हृदयाच्या सुरक्षिततेसाठी शेंगदाणा तेलाचा हा गुणधर्म महत्त्वपूर्ण आहे. या तेलात आर्जिनिन, फ्लेवोनोइड्स आणि फॉलेट्ससारखे घटक असतात. या घटकांमुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. शेंगदाणे आणि शेंगदाणा तेलात व्हिटॅमिन ई, नियासिन मुबलक असते. यामुळे मेंदूचे आरोग्य उत्तम राहतं. तसेच गुणधर्मांमुळे अल्झायमर आणि वयापरत्वे निर्माण होणारे मानसिक आजार दूर राहण्यास मदत होते. या तेलात रेझवेराट्रोल असते. यामुळे मज्जासंस्थेचे विकार होण्याचा धोकादेखील कमी होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.