मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्यांसोबत तुम्ही चुकीचे वागत नाही ना? या 7 गोष्टी ध्यानात ठेवा

ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्यांसोबत तुम्ही चुकीचे वागत नाही ना? या 7 गोष्टी ध्यानात ठेवा

काही पुरुष कर्मचारी असे असतात, ज्यांना महिला सहकर्मचाऱ्यांशी बोलण्याची योग्य पद्धत नसते. तुम्ही वरिष्ठ असोत किंवा कनिष्ठ, महिला सहकाऱ्याला आदराने वागवले पाहिजे.

काही पुरुष कर्मचारी असे असतात, ज्यांना महिला सहकर्मचाऱ्यांशी बोलण्याची योग्य पद्धत नसते. तुम्ही वरिष्ठ असोत किंवा कनिष्ठ, महिला सहकाऱ्याला आदराने वागवले पाहिजे.

काही पुरुष कर्मचारी असे असतात, ज्यांना महिला सहकर्मचाऱ्यांशी बोलण्याची योग्य पद्धत नसते. तुम्ही वरिष्ठ असोत किंवा कनिष्ठ, महिला सहकाऱ्याला आदराने वागवले पाहिजे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : कामाच्या ठिकाणी महिलांची उपस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. आज महिला स्वावलंबी होत आहेत. त्यांना त्यांच्या करिअरला नवी दिशा द्यायची आहे, त्यामुळे ती प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे. मात्र, अनेक कार्यालयांमध्ये स्त्री-पुरुष कर्मचाऱ्यांना समान वागणूक दिली जात नसल्याने बहुतांश महिला कर्मचाऱ्यांनीही लैंगिक समानतेची मागणी केली आहे. बरं, स्त्री-पुरुष समानता बाजूला ठेवून प्रत्येक परुष सहकर्मचाऱ्याला कार्यालयात महिला कर्मचाऱ्याशी कसे वागले पाहिजे, याचे भानही असायला हवे.

ऑफिसमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे लोक असतात. प्रत्येकाचा स्वभाव, बोलण्याची पद्धत, उठण्या-बसण्याची पद्धत एकमेकांपेक्षा खूप वेगळी असते. स्त्री-पुरुष दोघेही एका टीममध्ये, अगदी ऑफिसमध्येही एकत्र काम करत असल्याने, संभाषणाची शैली, शब्दांची निवडही काळजीपूर्वक करावी, विशेषतः जेव्हा तुम्ही महिला सहकर्मचाऱ्यांसोबत काम करता. प्रत्येक कंपनी, कार्यालयाचा एक नियम असतो, जो प्रत्येकाने पाळला पाहिजे. कॉलेजप्रमाणे इथे दोस्ताना, मौज-मस्तीची वागणूक बरोबर वाटत नाही. काही पुरुष कर्मचारी असे असतात, ज्यांना महिला सहकर्मचाऱ्यांशी बोलण्याची योग्य पद्धत नसते. तुम्ही वरिष्ठ असोत किंवा कनिष्ठ, महिला सहकाऱ्याला आदराने वागवले पाहिजे. त्यांच्याशी कमी आवाजात बोला, त्यांचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्या. मात्र, कधी-कधी नकळत काही चुका होतात. अशा परिस्थितीत काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्यांशी कसे वागावे -

काही लोक असे असतात की, जेव्हा एखादा नवीन कर्मचारी विशेषत: महिला कार्यालयात येते, तेव्हा तिच्याकडे पुन्हा-पुन्हा कटाक्ष नजरेने बघत राहतात. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर ही सवय सोडून द्या. यामुळे त्या महिला कर्मचाऱ्यावर तुमची छाप चुकीची पडू शकते आणि ती भविष्यात तुमच्याशी बोलणे टाळेल. ती तुमच्याबद्दल चुकीचा विचार करू शकते, म्हणजे तुम्ही चांगली व्यक्ती नाही. कोणत्याही महिला सहकाऱ्याशी पूर्ण आत्मविश्वासाने बोला. काम करत राहा, इकडे तिकडे बोलण्यात वेळ वाया घालवू नका.

तुम्ही ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये ग्रुपमध्ये बसला असाल तर बॉईज गँगमध्ये होणाऱ्या कमेंट्स करणे टाळा. स्त्रियांबद्दल बेकार कमेंट देऊ नका, द्विअर्थी विनोद सांगणे टाळा, उद्धटपणे बोलू नका. यामुळे महिला सहकाऱ्यांना अस्वस्थ वाटू शकते.

जर तुम्हाला महिला सहकाऱ्याकडून सन्मान मिळवायचा असेल तर तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि इकडचे-तिकडचे बोलून तुमचा आणि दुसऱ्याचा वेळ वाया घालवू नका. तुम्हाला कामाशी संबंधित काही समजावून सांगायचे असेल तर योग्य अंतर ठेवा आणि शांतपणे बोला. विनोद करताना जबरदस्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका.

तुम्ही तुमच्या पुरुष सहकार्‍याला जशी वागणूक देता, तशीच स्त्री सहकार्‍यालाही त्याच आदरानं वागवा. सामान्य वर्तनासह चांगले नातेसंबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, तुमच्याकडून झालेल्या छोट्याशा चुकीची तक्रार वरपर्यंत पोहोचली तर नोकरीही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अंतर राखून राहणे चांगले.

हे वाचा - झोपेच्या गोळ्यांची सवय हानिकारक; शरीरावर असा होतो गंभीर परिणाम

जर तुम्ही ज्येष्ठ असाल तर सर्व वेळ ओरडून बोलणे, दरारा दाखवून बोलणे किंवा कोणतेही काम करून घेणे आवश्यक नाही. महिला सहकाऱ्याशी नेहमी शांत स्वभावाने बोलण्याचा प्रयत्न करा, चेहऱ्यावर हास्य ठेवा. यामुळे तुम्ही त्यांच्यामध्ये सकारात्मक छाप सोडू शकाल.

महिला सहकर्मचाऱ्याची स्तुती करण्यात काही गैर नाही, पण स्तुती करण्याची शैली सभ्य असली पाहिजे. आपली स्तुस्ती ऐकायला कोणाला आवडत नाही? मात्र, ठराविकच स्त्रीची प्रशंसा करणे टाळा. यामुळे ऑफिसमधील संपूर्ण महिला कर्मचाऱ्यासमोर तुमची छाप खराब होऊ शकते.

हे वाचा - Daily Horoscope: नव्या कामाची सुरुवात करण्याचा आजचा दिवस; 'या' राशींना होणार लाभ

एखादी महिला सहकारी किंवा पुरुष सहकारी तिला त्रास देताना दिसल्यास गप्प बसू नका, तर तिला मदत करण्याचा प्रयत्न करा.

First published:

Tags: Professional, Relation