मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: नव्या कामाची सुरुवात करण्याचा आजचा दिवस; 'या' राशींना होणार लाभ

Daily Horoscope: नव्या कामाची सुरुवात करण्याचा आजचा दिवस; 'या' राशींना होणार लाभ

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी आणि मागची देणी भागवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. काही सौम्य संसर्ग होण्याची किंवा डोकेदुखीची शक्यता आहे. वादविवादाच्या प्रसंगी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. भविष्यासाठी आपल्या क्षमतेच्या बाहेरची वचनं देऊ नका.

LUCKY SIGN - A garden

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

आजच्या दिवसाची ऊर्जा शक्तिशाली आणि अनुकूल आहे. त्यामुळे एखाद्या नव्या कामाची सुरुवात तुमच्याकडून होऊ शकेल. तुमच्याकडे कोणी कर्जाची मागणी केली, तर नम्रपणे नकार देऊ शकता. चालणं किंवा अन्य कोणत्याही शारीरिक कृतींची/व्यायामाची शिफारस केली जात आहे.

LUCKY SIGN - A feather

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

तुम्ही आतून खूप मजबूत, कणखर असलात, तरी अन्य व्यक्ती आज तुमची भावनिक बाजू कदाचित अनुभवू शकतील. संतुलन साधण्यासाठी वाटाघाटीच्या काही डावपेचांची गरज भासेल. एखादा सहकारी मदत मागण्याची शक्यता आहे. तो खरा गरजू असेल.

LUCKY SIGN - Pebbles

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी पुनर्भेट होण्याची शक्यता आहे. बाहेर एखादी अपॉइंटमेंट असली, तर त्याला वातावरणाची साथ मिळणार नाही. तुम्ही एखाद्या कारणासाठी/कामासाठी मदत करणार असलात, तर तुम्हाला आता संधी दिसू शकेल.

LUCKY SIGN - A paper

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

अचानक, न सांगता पाहुणे येण्याची शक्यता आहे. आजचा दिवस गोड खाण्याचा आहे. काही प्रलंबित देणी असल्यास ती पूर्ण होतील. तुमच्या सपोर्ट स्टाफमधली व्यक्ती एखादी तक्रार मांडण्याची शक्यता आहे. ती प्राधान्याने सोडवावी.

LUCKY SIGN - A string of pearls

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

कामाच्या ठिकाणचं वातावरण आज अनुकूल असेल. दीर्घ काळ प्रलंबित राहिलेले संवाद आज पूर्ण करण्याचा निर्णय घेऊ शकता. घरी आणि ऑफिसमध्येही कागदपत्रं पूर्ण ठेवा आणि योग्य ठिकाणी ठेवा. तुम्हाला पुरेशी झोप न झाल्याचं जाणवेल.

LUCKY SIGN - Sharp fragrance

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

Caring असणं म्हणजे दुबळं असणं नव्हे. तुमचे सबळ मुद्दे पुढे मांडा. एखादी नवी रेसिपी ट्राय करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

LUCKY SIGN - A red cord

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

दुःस्वप्नं म्हणजे वाईट स्वप्नं हा केवळ सबकॉन्शस माइंड अर्थात मनाच्या भीतीचा खेळ असतो. ती गांभीर्याने घेऊ नका. एखादी विरुद्धलिंगी व्यक्ती तुमचं लक्ष वेधून घेऊ शकेल. आज एखाद्या जुन्या मित्राला कॉल करा.

LUCKY SIGN - A red brick wall

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला मिस केलं जात असण्याची शक्यता आहे. ती व्यक्ती तुमच्याबद्दल विचार करत आहे. तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी आज वेळ काढा. आज संध्याकाळी बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे. रूटीन मेडिकल चेकअप केल्यास उपयुक्त ठरेल.

LUCKY SIGN - A neon highlighter

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

आजच्या दिवसावर जुन्या आठवणींचं राज्य असेल. रिअ‍ॅलिटी चेक उपयुक्त ठरेल. आई-वडिलांकडे लक्ष द्या. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यावं, अशी त्यांची इच्छा असेल. जुन्या दृष्टिकोनासाठी नवं एखादं नियोजन करावं.

LUCKY SIGN - A glass bottle

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुमची भीती आता नियंत्रणात आहे. आता आणखी वाईट स्वप्नं नाहीत. काळ बदलला आहे. गेल्या काही महिन्यांत तुम्ही जे काही मिळवलं आहे, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. तुमच्याकडे एखादी अतिरिक्त जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - An old banyan tree

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

तुम्ही तुमच्या कुटुंबाला भावनिक पाठिंबा देणारी यंत्रणा आहात. त्यांना तुमच्याकडून अधिक वेळ दिला जाण्याची गरज आहे. एखादं नवं काँट्रॅक्ट मिळण्याची, त्यावर सह्या होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आजचा दिवस नेहमीपेक्षा बराच व्यग्र असेल. सरकारी अधिकाऱ्यांना अडथळ्यांचा अनुभव येऊ शकतो.

LUCKY SIGN - Three birds together

First published:

Tags: Astrology and horoscope