नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : मधुमेह हा असाध्य आजार आहे, जो फक्त निरोगी जीवनशैली आणि आहार व्यवस्थित ठेवूनच नियंत्रित केला जाऊ शकतो. मधुमेहामध्ये साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असेत आणि साखरेची पातळी योग्य ठेवण्यासाठी चांगला पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णांचा असा आहार चार्ट असावा, ज्यामध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त आणि कार्बचे प्रमाण कमी असेल. विशेषतः रात्रीच्या जेवणात कर्बोदकांचे सेवन टाळणे महत्त्वाचे आहे. न्याहारी आणि दुपारच्या जेवणात घेतलेल्या कर्बोदके बर्न होणे सोपे असते, परंतु रात्रीच्या जेवणात कार्बोहायड्रेट घेतल्याने साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेही व्यक्तीने रात्रीच्या जेवणात फायबरचे प्रमाण जास्त घेतले पाहिजे, त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि शरीरातील साखरेचे प्रमाणही कमी होते. जाणून घेऊया डायबिटीज असणाऱ्यांसाठी रात्रीचे जेवण कसे (Dinner For Diabetic Patients) असावे. कमी सोडियम - सर्वसाधारणपणे रात्रीच्या जेवणात कमी सोडियमयुक्त आहार घ्यावा. मेडिकल न्यूज टुडेच्या वृत्तानुसार, मधुमेहाच्या रुग्णांनी रात्रीच्या जेवणात कमी सोडियम म्हणजेच कमी मीठयुक्त अन्न खावे. दिवसभराच्या आहारात सोडियम घेतल्याने शरीरातील सोडियमची कमतरता भरून निघते. त्यामुळे रात्रीच्या जेवणाच्या वेळी कमीत-कमी मीठ किंवा खाऊ नये. खाण्याचे प्रमाण किती? मधुमेहाच्या रुग्णांनी खाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष दिले पाहिजे. रात्रीच्या जेवणात तुम्ही काय आणि किती खात आहात याकडे लक्ष पाहिजे. रात्री जास्त खाणे टाळण्यासाठी प्लेट पद्धत वापरली जाऊ शकते. म्हणजे ताटामध्ये योग्य प्रमाणात एकदाच वाढून घ्यावे, पदार्थ आवडला म्हणून पुन्हा घ्यायचा नाही. तसेच चरबी, फायबर आणि कार्ब यांचा योग्य प्रकारे प्लेटमध्ये समावेश ठेवा. हे वाचा - स्कीन केअरमध्ये या 6 गोष्टींचा अतिवापर ठरेल मारक; त्वचेनुसार अशी घ्या काळजी रात्रीच्या जेवणात या पदार्थांचा समावेश असावा - - बीन्स - अंडी - फळे आणि दुग्धजन्य पदार्थ - पालक आणि ब्रोकोली - साल्सा - मशरूम - टोफू - ग्रील्ड चिकन - दलिया हे वाचा - आत्महत्या करण्यापूर्वी लोकांचे असे असते वर्तन; वेळीच ओळखून करा मदत (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.