Home /News /heatlh /

डिलिव्हरीसाठी Hospital मध्ये जाताना 'या' वस्तू बॅगेत हव्याच; जाणून घ्या माहिती

डिलिव्हरीसाठी Hospital मध्ये जाताना 'या' वस्तू बॅगेत हव्याच; जाणून घ्या माहिती

हॉस्पिटल मध्ये जाताना काही खास तयारी करावी लागते.

हॉस्पिटल मध्ये जाताना काही खास तयारी करावी लागते.

डिलीव्हरीसाठी हॉस्पिटल (Hospital) मध्ये जाताना काही खास तयारी करावी लागते. ही तयारी डिलिव्हरी डेट जवळ येण्याआधीच करायल हवी.

    दिल्ली,17 मे: आई होण्याचा अनुभव आयुष्यातला कधीही न विसरणारा अनुभव असतो. 9 महिन्यांच्या गर्भधारणेत (Pregnancy) महिला आपल्या बाळासाठी स्वप्न सजवत असते. काही क्षणांनंतर बाळाचा हात हातात येणार या विचाराने ती सुखावलेली असते. कित्येक महिने पाहिलेली वाट आणि डिलीव्हरी (Delivery) चा थकवा बाळाला पाहताच निघुन जातो. हा अनुभव घेण्यासाठी महिलेला प्रसुती वेदना (Labor pains) सहन कराव्या लागतात. डिलीव्हरीसाठी हॉस्पिटल (Hospital) मध्ये जाताना काही खास तयारी करावी लागते. ही तयारी डिलिव्हरी डेट जवळ येण्याआधीच करायल हवी. हॉस्पिटलमध्ये कोणतं सामान न्यायचं आहे. याचा विचार करुन पॅकिंग (Packing) करुन ठेवावं लागत. पण, कधीकधी नेमकं हॉस्पिटलमध्ये काय सामान न्यावं याचीच माहिती महिलांना नसते. त्यामुळे ऐनवेळी धावाधाव होऊ शकते. (मोठी बातमी! उपचारासाठी, लसीकरणासाठी Aadhaar card अनिवार्य नाही,UIDAI कडून दिलासा) बाळासाठी कपडे. बाळ जन्मल्यानंतर घातले जाणारे कपडे आरामदायक आणि सुती असावेत. ज्यामुळे त्याला कोणताही त्रास होत नाही. यासाठी बाळाचे लंगोट, झबलं, टोपडं आणि दुपटी स्वच्छ धुवून निर्जंतूक करून सुकवा आणि बॅगेत भरून ठेवा. बाळाला घरी घेऊन येताना त्याला गुंडाळण्यासाठी बेबी ब्लॅंकेट बॅगेत ठेवणं फायद्याचं ठरू शकेल. डायपर किंवा वाईप्स बाळाला डायपर आणि वाईप लागू शकतात. त्यासाठी ऐनवेळेची धावपळ टाळण्यासाठी आधीच  बॅग मध्ये ठेवा. नवजात बाळाला दिवसभरात कमीत कमी दहा ते बारा वेळा डायपर बदलावे लागतात. यासाठी नवजात बाळासाठी असलेले डायपर तुमच्या बॅगेत ठेवा. बाळाची त्वचा ही संवेदनशील असते. म्हणूनच त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. बाळाला स्वच्छ करण्यासाठी निर्जंतूक असलेल्या बेबी वाईप्स वापर जरूर करा. (50 रूपये पगार ते टाटा स्टीलचा अध्यक्ष; जाणून घ्या रूसी मोदी यांचा थक्क प्रवास) टॉयलेटरीज हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मॅटर्निटी बॅगेत टॉवेल, हेअर ब्रश,  टुथपेस्ट, टुथब्रश, फेसवॉश, बॉडीवॉश, शॅम्पू, कंडिश्नर,टिश्यू पेपर्स, छोटे नॅपकीन, रूमाल अशा गोष्टी आधीच ठेवा. प्रसूतीनंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याची आवश्यता असेल तर, या वस्तूंचा उपयोग होतो. बॅगेत स्लीपर ठेवायला विसरु नका. सॅनिटरी पॅड्स डिलीव्हरीनंतर काही दिवस ब्लिडींग होतं. ज्यासाठी आधीच तयारीत असणं गरजेचं आहे. हॉस्पिटलमध्येही सॅनिटरी पॅड्स दिले जातात पण, ते आरामदायक असतीलचं असं नाही. त्यामुळे नेहमी वापरत असलेले सॅनिटरी पॅड्स जवळ ठेवावेत. (सांभाळून करा खर्च; कोरोना काळात आर्थिक नियोजनसाठी या सूत्रांचा करा वापर) अंडरवेअर सी-सेक्शन डिलिव्हरी दरम्यान टाके येतात. अशा परिस्थितीत नेहमी घातले जाणारे अंडरवेयर उपयोगी पडतीलच असं नाही. त्यामुळे आरामदायक अंडरवेयर तयार ठेवा. हॉस्पिटलमध्ये जाण्याआधी बॅगमध्ये ठेवा जेणेकरून ऑपरेशननंतर घातला येतील. त्याबरोबर बॅगेत नर्सिंग ब्रा ठेवायला विसरु नका. बाळाला स्तनपान कराताना त्याचा उपयोग होतो. मोकळे कपडे ऑपरेशननंतर डॉक्टर सुद्धा सैल-फिटिंगचे कपडे घालण्याचा सल्ला देतात म्हणूनच, पोटाच्या भागात सैल असलेले कपडे किंवा गाऊन आधीच बॅगेत ठेवावा. टाके पडलेल्या भागाला त्रास होणार नाही आणि कंफर्टेबल वाटेल असा गाऊन असावा. कॉम्प्रेशन बेल्ट टाके सुरक्षित राहण्यासाठी कॉम्प्रेशन बेल्ट लावण्याचा सल्ला दिला जातो. कॉम्प्रेशन बेल्टनेटाके पडल्यावरही सहजपणे हालचाल करता येते. सूजही कमी होते आणि पाठीच्या स्नायूंना देखील आधार मिळतो. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाण्याआधी कॉम्प्रेशन बेल्ट बॅगेत ठेवावा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Mother, Prepreparation

    पुढील बातम्या