Home /News /money /

दरमहा 50 रुपये पगारावर काम करणारे रूसी मोदी असे बनले टाटा स्टीलचे अध्यक्ष

दरमहा 50 रुपये पगारावर काम करणारे रूसी मोदी असे बनले टाटा स्टीलचे अध्यक्ष

1998च्या सार्वत्रिक निवडणुकीत रूसी मोदी यांनी जमशेदपूरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.

    नवी दिल्ली, 16 मे: भारतीय उद्योगातील एक लखलखता तारा असणारे टाटा स्टीलचे (Tata Steel) माजी व्यवस्थापकीय संचालक रूसी मोदी यांनी सात वर्षापूर्वी कोलकाता (Kolkata) येथे अखेरचा श्वास घेतला. एकेकाळी रूसी मोदी (Russi Mody) म्हणजे टाटा स्टील (पूर्वीची टाटा आयर्न आणि स्टील कंपनी, टिस्को) असं समीकरण होतं. टिस्कोमध्ये (टाटा स्टील) 50 रुपये पगारावर फोरमन म्हणून कारकीर्दीची सुरुवात करणारे रुस्तमजी होमुसजी मोदी अर्थात रूसी मोदी हे एक दिवस याच कंपनीच्या सर्वोच्च पदावर बसतील असं कुणाला स्वप्नातही वाटले नसेल. पण ही टाटांची संस्कृती आहे. एकेकाळी 16 अंड्यांचे ऑम्लेट खाणारे रुसी मोदी आपल्या मर्जीनुसार जगण्यासाठी प्रसिद्ध होते. भारतातील ते एक प्रसिद्ध कॉर्पोरेट हिरो होते. तोंडात चांदीचा चमचा घेऊन रूसी मोदींचा जन्म झाला. त्यांचे वडील सर होमी मोदी बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि उत्तरप्रदेशचे राज्यपाल होते. ते विधानसभेचे सदस्यही होते. रूसी मोदींनी लंडनमधील हॅरो स्कूल आणिऑक्सफोर्डमधील क्राइस्ट चर्च कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. माझ्या मुलाला सर्वात कमी पातळीची नोकरी द्या मोठ्या घराण्यातील मुलांना सहजतेने नोकरी मिळते. त्यांची थेट संचालक मंडळावर वर्णी लागते; पण रुसी मोदींचे वडील वेगळ्याच मातीचे बनलेले होते. त्यामुळे त्यांनी जेआरडी टाटांकडे (JRD Tata) त्यांना नोकरीसाठी पाठवले. तेव्हा जेआरडींना त्यांना सर्वांत खालच्या स्तरावरची नोकरी देण्यास सांगितलं. त्यानुसार त्यांना फोरमनची नोकरी देण्यात आली. पुढे रूसी मोदी अभिमानाने सांगत की, मी फोरमनपासून सुरुवात करून चेअरमन बनलो आहे. दररोज 50 पैसे वेतन मिळत असे : 1939मध्ये रुसी मोदींनी शिकाऊ कर्मचारी म्हणून टिस्कोमध्ये काम सुरू केले. तेव्हा त्यांना दररोज 50 पैसे वेतन मिळायचे. नंतर फोरमन म्हणून कायम झाल्यानंतर 50 रुपये पगार मिळू लागला. मेहनत आणि समर्पित वृत्ती याच्या जोरावर 1993मध्ये रुसी मोदी यांची टिस्कोचे अध्यक्ष (आताचीटाटा स्टील) म्हणून निवड झाली. Dogecoin ची कमाल! 33 वर्षीय तरुणाने अवघ्या 4 महिन्यात कमावले कोट्यवधी 1918मध्ये मुंबईत जन्म: रुसी मोदींचा जन्म 1918 मध्ये मुंबईत (Mumbai) झाला होता. त्यांचे भाऊ पिलू मोदी लोकसभेचे सदस्य होते आणि लहान भाऊ काली मोदी यांनी डायनर्स क्लबची स्थापना केली होती. रुसी मोदींनी सिल्लू मुगासेठशी लग्न केलं होतं. त्यांना मूलबाळ झालं नाही. रुसींना जेआरडींचा उत्तराधिकारी मानलं जात असे: अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या रूसी मोदी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कंपनीच्या उच्चपदावर पोहोचले. याचमुळे त्यांना एकेकाळी जेआरडी टाटायांचा उत्तराधिकारी म्हटलं जात असे. रुसी मोदी यांना टिस्कोच्या अध्यक्षपदावर बसवता यावं यासाठी 1984मध्ये जेआरडी टाटांनी राजीनामा दिला होता. यावरून जेआरडी टाटांचा मोदींवर किती विश्वास होता हे लक्षात येते. रुसी मोदीबडे व्यावसायिक नेतृत्व बनले : 1970च्या दशकात रूसी मोदी यांच्या व्यतिरिक्त, टाटा केमिकल्सचे दरबारी सेठ, इंडियन हॉटेल्सचे अजित केरकर हे टाटा समूहाच्या साम्राज्यातील शक्तिशाली केंद्रस्थानं बनले होते. परंतु रतन टाटांनी टाटा समूहाची सत्ता ताब्यात घेताच या सर्वांचे स्वातंत्र्य काढून घेण्यात आले. जेआरडी टाटांच्या युगात या लोकांना काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. हळूहळू त्यांचे पंख कापून त्यांच्यावर नियंत्रण आणलं जाऊ लागलं. पण त्यावेळी कारकिर्द संपत आल्यानं बहुतेकांनी टाटा समूह सोडून दिला; पण रुसी मोदींनी याला जोरदार विरोध करत टिकून राहण्याचा प्रयत्न केला. 1992मध्ये भारताची आर्थिक धोरणं बदलत होती, उदारीकरणाचा स्वीकार झाल्यानं भारतीय बाजारपेठ संपूर्ण जगासाठी खुली होत होती. अशा परिस्थितीत टिस्को समोरही जागतिक आव्हानं उभी राहिली. जागतिक बाजारपेठेत कंपनीला आपलं स्थान निर्माण करायचे होते. जुनं तंत्रज्ञान, गरजेपेक्षा जास्त कर्मचारी यामुळे कंपनी जागतिक स्पर्धेत टिकू शकत नव्हती. कंपनी पुन्हा रुळावर आणण्यासाठी बदल आवश्यक होता. टाटा समूहानं रूसी मोदी यांना बाहेरचा रस्ता दाखवला : 1992मध्ये जेआरडी टाटा हयात होते आणि रुसी मोदी हे देशातील एक प्रख्यात व्यवस्थापक मानले जात होते. मनुष्यबळ आणि व्यवस्थापनातील त्यांचे कौशल्य असामान्य होतं. ते टिस्कोचे चेअरमन होते आणि ही कंपनी नवीन मापदंड निर्माण करत होती. पण 1992 मध्ये टाटा समूहाची जबाबदारी रतन टाटा यांच्या खांद्यावर पडली. त्यावेळी रतन टाटा समवेत जे. जे. इराणी टाटा समूहाचे प्रभारी होते. त्यावेळी टिस्को (टाटा स्टील) ही टाटा समूहाची सर्वात महत्त्वाची कंपनी होती आणि जेआरडीची इच्छा होती की ती रतन टाटा यांना द्यावी. पण अडथळा होता रूसी मोदी यांचा. टाटा समूहाने रुसी मोदी यांचे अधिकार काढून घेतले आणि त्यांना कोणतेही अधिकार नसलेल्या अध्यक्ष पदावर पदोन्नती दिली. एकाच फटक्यात शिखरावर असणारे मोदी जमिनीवर आले. रतन टाटा यांच्या देखरेखीखाली कंपनीची पुनर्रचना करण्यात आली आणि आता टाटा स्टील एक जागतिक ब्रँड झाला आहे, हे सर्वांनाच माहित आहे. सुरुवातीला रुसी मोदींनी हे बदल स्वीकारले नाहीत आणि त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यांना जोकर देखील म्हटलं. मात्र नंतर त्यांनी उत्तराधिकारींनी उत्कृष्ट काम केल्याचं कबूल केलं. ही कंपनी केवळ टोस्टर विकते 25000 रुपयांना, आता लाँच करणार 5G फोन; विचार करा किती असेल किंमत टिस्कोने भारतीय स्टील उद्योगाचे नेतृत्व केलं : दोन दशकांहून अधिक काळ व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या रूसी मोदी यांनी टाटा स्टीलचा पाया अतिशय मजबूत रचला होता,त्यावरच पुढे यशाची नवी कमान निर्माण झाली. बोर्डरूममधील संघर्ष निर्माण होईपर्यंत मोदींनी त्यांच्या इच्छेनुसार कंपनी चालविली. आपल्या कार्यकाळात त्यांनी टिस्को वाढवलीच नाही तर व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात समन्वय स्थापन केला. भारतीय स्टील उद्योगातील एकआघाडीची कंपनी म्हणून टिस्कोचं स्थान निर्माण केलं. कॉर्पोरेट इंडियाला मनुष्यबळ विकासाचा मूलमंत्रही त्यांनी दिला. बिहार आणि बंगालच्या सीमेवर वसलेल्या जमशेदपूरमध्ये सुरुवातीपासूनच राजकीय पार्श्वभूमी होतीच, तरीही कोणताही संप किंवा बंद न होताही कंपनी चालविली जात होती. बिहार आणि बंगालमध्ये संप, बंदमुळे कंपन्या बंद पडत असताना टिस्को विना अडचण सुरू होती. मोरारजी देसाई यांच्या विरोधात रूसी मोदी मजुरांसह रस्त्यावर उतरले: 1979मध्ये जेव्हा जनता पार्टी सरकारचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी टिस्कोचे राष्ट्रीयकरण करण्याची धमकी दिली तेव्हा रूसी मोदी यांनी जमशेदपूरच्या रस्त्यावर कंपनीच्या कामगारांसह आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी भारत सरकारचा या कंपनीत 47 टक्के हिस्सा होता. रतन टाटा योग्य निवड असल्याचं नंतर मान्य केलं : टिस्कोच्या उत्तराधिकारीपदाची लढाई गमावली तेव्हा कंपनीच्या सर्वोच्च पदावरील रूसी मोदी यांचे काही दिवसच शिल्लक राहिलेत असं मानलं जात होतं; पण कधीही हार मानायची नाही अशी वृत्ती असलेल्या रूसी मोदी यांनी अधिकारासाठीची आपली लढाई सुरूच ठेवली. ते लंडनमध्ये असताना कंपनीच्या संचालक मंडळानं त्यांना पदावरून काढून टाकले. कालांतरा नंतन टाटा आणि रुसी मोदी यांच्यातील कटुता कमी होत गेली आणि रुसी मोदी यांनीही टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून रतन टाटायांची निवड योग्य असल्याचे मान्य केले. एअर इंडियामध्येही काम केले: टिस्कोमधून बाहेर पडल्यानंतर रुसी मोदी यांनी एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. जमशेदपूरमधून अपक्ष उमेदवार म्हणूनही त्यांनी निवडणूक लढविली. टिस्कोमधून बाहेर पडल्यानंतर त्यांचे समर्थक असलेल्या आदित्य कश्यप यांना टिस्कोमध्ये उच्च पदावर बसवण्याचे प्रयत्न केले; पण रतन टाटा यांनी जे जे इराणी यांना प्राधान्य दिले. नंतर आदित्य कश्यप यांच्या समवेत मोदी यांनी एका बिझिनेस हाउसची स्थापनाही केली; पण आदित्य कश्यप यांच्या अकाली निधनानंतर ते बंद पडलं. आईन्स्टाईन बरोबर वाजविला होता पियानो: जेव्हा रुसी मोदी इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिकत होते, तेव्हा थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांना भेटण्याची संधी मिळाली. या वेळी संगीताचे शौकीन असणाऱ्या रुसी मोदी यांनी आईन्स्टाईनबरोबर पियानोही वाजवला. रूसी यांचा मॅनेजमेंट फंडामाणसाला मशीन मानू नका: रूसी मोदी नेहमी म्हणायचे, माणसाला यंत्र समजू नका. त्याला यंत्रासारखे वागवणे थांबवा. तो माणूस आहे, त्याच्यात भावना आहेत. त्याच्यात आणि आपल्यात सारख्याच भावना आहेत. आणखी एक गोष्ट ते नेहमी सांगायचे ते म्हणजे, कधीही सैनिकांना मारू नका. एक सैनिक जनरल होऊ शकतो; परंतु एक जनरल कधीही सैनिक बनू शकत नाही. बिस्मार्क आणि गॅरी बाल्डी अशी त्यांच्या कुत्र्यांची नावं होती : बिस्मार्क आणि गॅरी बाल्डी हे जर्मनी आणि इटलीला एकत्र आणणारे नायक मानले जात. त्यांचा रूसी मोदी यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी आपल्या लाडक्या कुत्र्यांची नावं बिस्मार्क आणि गॅरी बाल्डी ठेवली होती. जमशेदपूरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढली: 1998च्या सार्वत्रिक निवडणुकीत रूसी मोदी यांनी जमशेदपूरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. भाजपाच्या आभा महतो यांच्याशी त्यांची स्पर्धा होती. मोदींनी जोरदार प्रचार केला, बराच पैसाही खर्च केला मात्र महातो यांच्याकडून 97 हजार 433 मतांनी त्यांचा पराभव झाला.
    First published:

    Tags: Tata group

    पुढील बातम्या