मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Lockdown मध्ये घरात राहून पोट सुटलंय? डोंट वरी! फक्त ही 5 फळं कमी करतील तुमचं Belly fat

Lockdown मध्ये घरात राहून पोट सुटलंय? डोंट वरी! फक्त ही 5 फळं कमी करतील तुमचं Belly fat

कारण याचा उलटा परिणाम शरीरावर होऊ शकतो. फ्रूट सॅलड बनवताना जर संत्र किंवा लिंबू वापरणार असाल तर त्यासोबत पपई मुळीच वापरू नका.

कारण याचा उलटा परिणाम शरीरावर होऊ शकतो. फ्रूट सॅलड बनवताना जर संत्र किंवा लिंबू वापरणार असाल तर त्यासोबत पपई मुळीच वापरू नका.

Fruits To Reduce Belly Fat: पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही खास फळं उपयुक्त असतात.

मुंबई, 29 एप्रिल : महिला असो वा पुरुष सगळ्यांनाच पोट सुटण्याची समस्या असते. कोरोना (Corona) काळात तर, वर्क फ्रॉम होम (Work From Home) असल्याने तासनतास एकाच जागी बसून काम केल्यामुळे अनेक त्रास वाढायला लागले आहेत. शरीरात चरबी (Belly Fat) वाढल्याने पोट सुटण्याची समस्या वाढलेली आहे. वजन वाढल्याने पोटही सुटतं.

सगळ्यांनाच वाटतं की आपलं वजन कमी होऊन, शरीरातली चरबी कमी व्हावी. पोट कमी झालं तर आपलं शरीर सुडौल दिसतं. यासाठी जीम आणि इतर व्यायाम काय काय नाही आपण करत. पण तुम्हाला माहिती आहे का, शरीरातली चरबी कमी करण्यासाठी फळांचा फायदा होऊ शकतो. फळांत जास्त प्रमाणात पोषक तत्व असतात. फळांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय इतर पदार्थांपेक्षा फळांचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. चरबी कमी करण्यात फायदेशीर ठरणाऱ्या 5 फळांची माहिती जाणून घेऊयात.

हे वाचा - Lockdown: घरी बसून मुलांवर येतोय मानसिक तणाव? हे उपाय ठरतील फायदेशीर

ही 5 फळं पोटाची चरबी कमी करण्यात उपयोगी

कलिंगड

कलिंगड शरीरातील पाण्याची कमतरता दूर करतं. उन्हाळ्यात कलिंगड शरीराला हायड्रेट ठेवतं. याशिवाय ते त्वचेसाठीही फायदेशीर आहे. कलिंगड खाल्ल्याने वजन कमी होतं आणि ओटीपोटावरची चरबी कमी करण्यास मदत होते.

अननस

चरबी आणि वाढतं वजन कमी करण्यासाठी अननस खायला हवा. उन्हाळ्यात शरीर निरोगी राहण्यासाठी अननसाचा आहारात समावेश असवा. त्यात भरपूर फायबर आणि कमी कॅलरी असतात,ज्यामुळे पोट बराच वेळ पोट भरुन राहतं.

हे वाचा - शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास पॅनिक होऊ नका! घरीच करा 4 पद्धतींचा अवलंब

स्ट्रॉबेरी

पोटाची चरबी कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी खूप फायदेशीर ठरू शकते. स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरी कमी असतात. स्ट्रॉबेरी सेवन केल्याने पचन व्यवस्था सुधारते तर, टाइप 2 मधुमेह नियंत्रित करण्यास मदत होते. वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरीचं सेवन करावं.

सफरचंद

शरीराला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी सफरचंद खाणं आवश्यक आहे. सफरचंदांमध्ये फायबर,फ्लेव्होनॉइड्स आणि बीटा कॅरोटीनचं प्रमाण जास्त असतं, यामुळे पचन सुधारते तसंच वजन कमी होतं आणि ओटीपोटावरची चरबी कमी होते.

हे वाचा - साध्या सर्दी-तापाचा विषाणू करू शकतो कोरोनाव्हायरसचा खात्मा?

संत्रं

संत्री हा व्हिटॅमिन ‘सी’चा चांगला स्रोत मानला जातो. संत्र्यामध्ये फॅटचं प्रमाण झीरो असतं, कमी कॅलरी आणि अँटीऑक्सिडेंट वजन कमी करण्यास मदत करतात. याशिवाय संत्र्याचं नियमित सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती देखील बळकट होते.

First published:

Tags: Fat, Fitness, Health, Health Tips, Lifestyle