जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / गॅंगरीनमुळे हात-पाय कापण्याची येेऊ शकते वेळ! Diabetes पेशंटला असतो जास्त धोका

गॅंगरीनमुळे हात-पाय कापण्याची येेऊ शकते वेळ! Diabetes पेशंटला असतो जास्त धोका

गँगरीनचा धोका

गँगरीनचा धोका

या संदर्भात फोर्टिस हॉस्पिटलचे डायबिटीज एँड एंड्रोक्रिनॉलॉजी (Diabetes And Endocrinology) डिपार्टमेंटचे प्रमुख डॉक्टर राकेश कुमार प्रसाद यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. जाणून घेऊयात गँगरीन म्हणजे काय? आणि कशी काळजी घ्यावी.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 डिसेंबर : गॅंगरीन हा शब्द कदाचित सगळ्यांना माहिती नसेल, पण गॅंगरीन किती प्राणघातक ठरू शकतं, याची माहिती तुम्हाला नसेल तर, जाणून घ्या. गॅंगरीन या आजाराचा संबंध एका गंभीर आजाराशी आहे. एखादी जखम झाल्यास गँगरीनचा धोका डायबेटीज पेशंटला जास्त असतो. बर्‍याच वेळा धूम्रपान करणार्‍यांनादेखील याचा त्रास होऊ शकतो. या संदर्भात फोर्टिस हॉस्पिटलचे डायबिटीज एँड एंड्रोक्रिनॉलॉजी (Diabetes And Endocrinology) डिपार्टमेंटचे प्रमुख डॉक्टर राकेश कुमार प्रसाद (Dr.Rakesh Kumar Prasad) यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. जाणून घेऊयात गँगरीन म्हणजे काय? डॉ. राकेश यांच्या मते, गॅंगरीन हा एक आजार आहे. जो एखाद्या विशिष्ट अवयवामध्येच होतो. तेव्हा त्या अवयवातील ब्लड सर्क्युलेशन पूर्णपणे थांबून जातं. ब्लड सर्क्युलेशन थांबल्यामुळे तो अवयव निकामी होतो. जखमांमुळे गँगरीन होतं. पण, शुगर पेशंटला याचा धोका जास्त असतो. हात-पायाला गॅँगरीन होणं ही सामान्य बाब आहे. अनियंत्रित डायबेटीज हे देखील याचं कारण आहे. जेव्हा, बराच काळ शुगर अनियंत्रित राहते तेव्हा, शरीराच्या कोणत्याही भागावर गॅंगरीन होऊ शकतं. म्हणजेच विशिष्ट अवयवाच्या रक्तवाहिन्या हळूहळू ब्लॉक होऊ लागतात. गॅंगरीन हात, पाय किंवा शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकते. अगदी शरीराच्या आत आतड्यात किंवा इतर अवयवाला होऊ शकतं. हातात किंवा पायात ब्लड सर्कुलेशन कमी झालं तर, त्याला पेरिफेरल वॅस्कुलर डिसीज म्हणतात.

News18लोकमत
News18लोकमत

डॉक्टर राकेश यांच्या सल्ल्यानुसार शुगरच्या रुग्णांनी वेळोवेळी आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात रहावं आणि शुगर टेस्टही नियमीत करावी. डायबेटीजच्या पेशंटची शुगर कंट्रोलमध्ये असायला हवी. ब्लड शुगर लेव्हल वाढली तर, रेडिओलॉजिस्ट डॉप्लर टेस्टद्वारे रक्तप्रवाहांचं निरीक्षण करतात. पायाला चालताना त्रास होत असेल तर, डॉपलर टेस्ट करावी. हे वाचा -  ‘हे’ आजार असलेल्या लोकांनी प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं ठरेल धोक्याचं पण, डाबेटीज नसलेल्या लोकांनाही गँगरीन होऊ शकतं. स्मोकिंगची सवय असलेल्या लोकांनाही गँगरीनचा त्रास होतो. खरंतर, स्मोकिंग करणाऱ्या लोकांच्या धमन्या आकुंचन होण्यास सुरुवात झालेली असते. कधीकधी काही खास प्रकारच्या डिसऑर्डरमुळे रक्ताच्या गुठळ्या व्हायला लागतात. ट्रॉमा सिच्युएशनमध्ये जखम झाल्यावरही ब्लड फ्लो थांबतो. हे वाचा -  फक्त एक कप दुधाने दूर होतील टाचांवरील भेगा, रात्रीच्यावेळी असा करा वापर डॉक्टर राकेश म्हणतात की, गँगरीन जास्त प्रमाणात असेल तर, तो विशिष्ट भाग तोडून टाकावा लागतो. गॅंगरीनचे दोन प्रकार आहेत - ड्राय आणि वेट. ड्रायमध्ये कोणतंही इनफेक्शन होत नाही. पण, वेट इन्फेक्शनमध्ये डॉक्टर कधीकधी हात किंवा पायातील नसा उघडून उपचार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्याचा उपयोग न झाल्यास गँगरीन झालेला अवयव कापून टाकण्याचीही वेळ येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात