मुंबई, 17 ऑक्टोबर : महिलांना आपल्या उत्तम आरोग्यासाठी स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण महिलांचे शरीर आधीच खूप गुंतागुंतीचे आणि नाजूक असते. त्यात जर शरीरात काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर महिलांसाठी ते अवघड दुखणे बनते. महिलांच्या प्रजनन प्रक्रियेशी निगडित असलेला एक अवयव म्हणजे ओव्हरी यांचीही खूप काळजी घ्यावी लागते. लैंगिक आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. महिलांच्या ओव्हरीशी निगडित एक समस्या पॉलीसिस्टिक ओव्हरीज सिंड्रोम म्हणजेच PCOS 10 पैकी 1 महिलांवर परिणाम करते. आई होण्याच्या वयातील महिलांमध्ये हे सर्वात सामान्य हार्मोनल असंतुलन आहे. चेहऱ्यावरील नको असलेले केस, पुरळ, केस पातळ होणे, आळस, मूड बदलणे, वजन वाढणे असे अनेक त्रास यामुळे होतात.
मात्र या सर्व समस्या रोखल्या जाऊ शकतात. जर तुम्ही काही खास खाद्यपदार्थांचा समावेश तुमच्या आहारात केला तर. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल माहिती देणार आहोत जे तुमच्या ओव्हरीज हेल्दी ठेवण्यासाठी तुमची मदत करतील. sepalikafertility या इंस्टाग्राम पेजवर याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
PCOS समस्या टाळण्यासाठी आहार कसा असावा?ओव्हरीजच्या चांगल्या आरोग्यासाठी हे घटक असतात महत्वाचे - व्हिटॅमिन ए : हे व्हिटॅमिन अंडाशयांना म्हणजेच ओव्हरीला मियोसिस सुरू करण्यास मदत करते. अंडी तयार करण्याच्या प्रक्रियेत पेशींची वाढ होण्यासाठी ही मियोसिसची प्रक्रिया असते. - व्हिटॅमिन सी : हे व्हिटॅमिन बीजकोशांच्या विकासास आणि मुक्त रॅडिकल्सवर हल्ला करण्यास मदत करते जे ओव्हेरियन पेशींना नुकसान करतात.
- ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् : हे ओव्हेरियन पेशींच्या पडद्याचे आरोग्य राखणे आणि गर्भाशयात रोपण म्हणजेच इम्प्लांटेशन करण्यात मदत करते. पोट वाढण्याच्या चिंतेने गरोदर महिलेने उचललं असं पाऊल; पाहूनच सर्वांना बसला धक्का - लेनियम : ओव्हेरियन आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स तयार करणारे एन्झाईम सक्रिय करते.