जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / पोट वाढण्याच्या चिंतेने गरोदर महिलेने उचललं असं पाऊल; पाहूनच सर्वांना बसला धक्का

पोट वाढण्याच्या चिंतेने गरोदर महिलेने उचललं असं पाऊल; पाहूनच सर्वांना बसला धक्का

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

प्रेग्नन्सीचा आनंद होता पण बेबी बम्प दिसेल याची चिंता तिला होती. म्हणून तिने जे केलं त्याचा परिणाम पाहून सर्वजण चक्रावले.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

लंडन, 29 सप्टेंबर : प्रेग्नन्सी म्हटलं की महिलांंमध्ये बरेच शारीरिक बदल दिसून येतात. पोट, छातीचा आकार वाढू लागतो. काही महिलांचं वजन इतकं वाढतं की त्या लठ्ठही होतात. त्यामुळे प्रेग्नंट झाल्याचा आनंद महिलांना असतोच पण त्यासोबतच आता आपलं पोट मोठं होणार, आपलं वजन वाढणार याची चिंताही त्यांना सतावत असते. अशाच चिंतेतून एका महिलेने प्रेग्नन्सीतही पोट वाढू नये, म्हणून गरोदरपणाच्या कालावधीत ती खूप धावली, इतकंच नव्हे तर तिने जिममध्ये जाऊन एक्सरसाइझ केली. त्यानंतर तिचं जे झालं ते पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. ब्रिटनच्या एसेक्समधील असलेली डानी लेव्ही सध्या तिचा होणारा नवरा मारबेलासोबत स्पेनमध्ये राहते. प्रेग्न्सीच्या सातव्या आठड्यात तिला आपण प्रेग्नंट असल्याचं समजलं. लॉस एंजिलन्सहून ती घरी जात होती. तेव्हा अचानक तिची तब्येत बिघडली. तिने घरी जाऊन स्वतःची प्रेग्नन्सी टेस्ट केली. तेव्हा तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली. आपण प्रेग्नंट असल्याचं समजताच तिला आनंद झाला. पण सोबतच ती घाबरलीसुद्धा. आता आपलं बेबी बम्प दिसू लागेल, याची भीती तिला वाटू लागली.

News18लोकमत
News18लोकमत

डानी एक फिटनेस स्पेशालिस्ट आहे. त्यामुळे पोट वाढू नये, म्हणून प्रेग्नंट असतानाही ती जिममध्ये घाम गाळू लागली. जिममध्ये ती एक्सरसाइझ करते. प्रेग्नन्सीच्या इतक्या कालावधीनंतरही ती दर आठवड्याला तीन ते चार वेळा 40 मिनिटं धावते. डाएटचीही काळजी घेते. हे वाचा -  ज्या मुलाला दिला जन्म, त्याच मुलाच्या बाळाची आई होणार महिला सोशल मीडियावरही ती आपले प्रेग्नन्सीतील जिममधील एक्सरसाइझजे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत अपडेट देत असते. तिचे हे फोटो, व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

जाहिरात

आता हा फोटो पाहा. ज्यात तिचे 6 पॅक अॅब्ज दिसत आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल हा फोटो तिने काढला तेव्हा ती सहा महिन्यांची प्रेग्नंट आहे. पण तिचं बेबी बम्प बिलकुल दिसत नाही आहे. तिला पाहून ती प्रेग्नंट आहे असं वाटतच नाही. आता हे कसं शक्य आहे, याची माहितीही तिने या पोस्टमध्ये दिली आहे. हे वाचा -  Abortion Day : कधी करू शकतो गर्भपात; अबॉर्शनसाठी कोणती पद्धत असते सुरक्षित? डानी सांगते, बऱ्याचदा आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पण जर आपलं शरीरा आनंदी नसेल तर आपला मेंदूही कधीच आनंदी होऊ शकत नाही. बाळाच्या जन्माच्या एक आठवडाआधीपर्यंत आपण एक्सरसाइझ करणार असल्याचं डानी म्हणाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात