Home /News /heatlh /

फक्त गाजर खाणं पुरेसं नाही; डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे पदार्थसुद्धा खायला हवेत

फक्त गाजर खाणं पुरेसं नाही; डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे पदार्थसुद्धा खायला हवेत

तुम्ही काय खाता यावर तुमच्या डोळ्यांचं आरोग्य अवलंबून आहे.

तुम्ही काय खाता यावर तुमच्या डोळ्यांचं आरोग्य अवलंबून आहे.

डोळ्यांची योग्य (Eye health) निगा राखण्यासाठी आपल्या आहारात पोषकतत्वांनी भरपूर असे अन्नपदार्थ असणं आवश्यक आहे.

    मुंबई, 11 सप्टेंबर : अनेक लोकांना लहानपणी किंवा तरूण असतानाच डोळ्यांचा त्रास (Eye problems) सुरू होतो. त्यामुळे त्यांना लगेच चश्मा (Glasses) लागतो. आता ही अडचण फक्त उतारवयात आलेल्या लोकांचीच नाही तर लहान आणि तरुण मुलांचीही आहे. त्यामुळे आता मागच्या काही वर्षांपासून डोळ्यांचा आजार (Eye disease) हा अनेकांना होऊ लागला आहे आणि हा त्रास जवळपास सर्वाच वयोगटातील लोकांना होत आहे. डोळ्यांची योग्य निगा (Eye health) राखण्यासाठी आपल्या आहारात पोषकतत्वांनी भरपूर असे अन्नपदार्थ असणं आवश्यक आहे (Food for eye health). आहाराचा डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. व्हिटॅमिन्सयुक्त आहार American Optometric Association ने केलेल्या एका संशोधनानुसार डोळ्यांची निगा राखण्यासाठी आपल्या आहारात Vitamin A, E आणि Vitamin C असणं आवश्यक आहे. यामुळे आपल्या डोळ्यांचे आयुष्य वाढण्यास मदत होते. त्यात प्रामुख्याने नट्स, आंबट फळे आणि मासे यांचा समावेश आपल्या दैनंदिन आहारात असायला हवा. हे वाचा -  गर्भवती महिलांना का पडतात टेन्शन वाढवणारी स्वप्नं? पाणी तज्ज्ञांच्या मते, आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर डिहायड्रेशन होऊन याचा नकारात्मक प्रभाव आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे दिवसभरात सातत्याने पाणी पिणं आवश्यक आहे. जेणेकरून त्याचा सकारात्मक बदल हा आपल्या डोळ्यांच्या दृष्टीवर होईल. हे वाचा - Fruits: सूर्यास्तानंतर खाऊ नका 'ही' फळं; नाही तर होतील 'हे' गंभीर आजार हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये Vitamins आणि Minerals हे भरपूर प्रमाणात असतात. जे शरीराच्या संपूर्ण स्वास्थासाठी फायदेशीर ठरते. The Academy of Nutrition and Dietetics च्या मते हिरव्या पालेभाज्यांमध्ये बीटा-कॅरोटीन, Vitamins, lutein आणि zeaxanthin असतात. जे डोळ्यांना हानीकारक किरणे आणि रेडीएशनपासून डोळ्यांचा बचाव करते.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Eyes damage, Health, Health Tips, Lifestyle, Serious diseases

    पुढील बातम्या