दिल्ली, 10 सप्टेंबर : आयुर्वेदात (Ayurveda) आहाराच्या बाबतीत काही विशिष्ट नियमं आणि पद्धती सांगिरल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर फळांच्या (Fruits) सेवनाचे आणि त्याला खाण्याचे फायदे सांगितले गेले आहेत. (Vitamines) आणि मिनरल्स मिळवण्यासाठी दिवसातून एकदा किंवा दोनदा फळांचे सेवन करायला हवे. त्यामुळे शरिराला अनेक प्रकारची पोषकतत्वे मिळतात. फळांचे सेवन हे लठ्ठपणा घालवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. आयूर्वेदाच्या अनुसार फळांचा योग्यवेळी आहार केल्याने त्याचा अधिक फायदा होतो. जर सुर्यास्तानंतर फळं खात असाल तर तुम्हाला त्याचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे फलाहार हा सुर्यास्ताच्या आधीच व्हायला हवा.
बॅक्टीरीयाचा धोका
सुर्यास्ताच्या आधी फलाहार केला तर अन्नपचनाला अधिक वेळ मिळतो. त्याने शरिराची पचनक्षमता वाढते. त्यामुळे दिवसा फळं खाल्याने आपल्याला अनेक प्रकारच्या रोगांना टाळता येतात. जर तुम्ही सुर्यास्तानंतर फळं खात असाल तर त्यावेळी फळांमध्ये नमी वाढते.
गर्भवती महिलांना का पडतात टेन्शन वाढवणारी स्वप्नं?
खाण्याच्या पद्धतीत बदल
बॅक्टीरीया आपल्या शरिरात गेल्यानंतर त्याचे नुकसान आपल्याला आजारी झाल्यानंतर भोगावे लागते. सुर्यास्तानंतरचे भोजन हे जेवनाच्या प्राकृतिक पद्धतीत बदल घडवतो. त्यामुळे आपण आपल्या आहारात सुर्यास्तानंतर फलाहार होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. आता सध्या बाजारात येणाऱ्या फळांच्या गुणवत्तेचाही विषय निर्माण होत आहे. अनेक फळं ही नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली नसतात. त्यामुळे आपल्या आरोग्याला धोका पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे खाण्यासाठी फळांची निवड करतानाही ग्राहकांना फळांच्या गुणवत्ता तपासावी लागत आहे. त्यामुळे फळं कधी खावं आणि फळं ही कोणत्या पद्धतीने पिकवलेली असावी, या गोष्टींचाही विचाक करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle