मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

फिल्टर वॉटर की उकळलेले पाणी? निरोगी आरोग्यासाठी काय जास्त उपयोगी

फिल्टर वॉटर की उकळलेले पाणी? निरोगी आरोग्यासाठी काय जास्त उपयोगी

दूषित पाणी प्यायल्याने टायफॉइड, कावीळ, कॉलरा यासह अनेक गंभीर आजार सुरू होतात. म्हणूनच आपल्याला स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आज (Which water is safe to drink) जाणून घेऊया.

दूषित पाणी प्यायल्याने टायफॉइड, कावीळ, कॉलरा यासह अनेक गंभीर आजार सुरू होतात. म्हणूनच आपल्याला स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आज (Which water is safe to drink) जाणून घेऊया.

दूषित पाणी प्यायल्याने टायफॉइड, कावीळ, कॉलरा यासह अनेक गंभीर आजार सुरू होतात. म्हणूनच आपल्याला स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आज (Which water is safe to drink) जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 20 ऑगस्ट : पाणी हे जीवन आहे. ही गोष्ट तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत ऐकली असेल. पाण्याशिवाय जीवनाचा विचार करणेही कठीण आहे. मनुष्य, प्राणी आणि वनस्पतींसाठी देखील पाणी खूप महत्वाचे आहे. आपल्या जीवनातील जवळजवळ सर्व क्रिया पाण्यावर अवलंबून असतात. सध्या वाढती लोकसंख्या, पर्यावरण प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभाव यामुळे लोकांना शुद्ध पाणी मिळणे कठीण झाले आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. दूषित पाणी प्यायल्याने टायफॉइड, कावीळ, कॉलरा यासह अनेक गंभीर आजार सुरू होतात. म्हणूनच आपल्याला स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आज (Which water is safe to drink) जाणून घेऊया.

उकळल्यानं पाणी स्वच्छ होतं का?

विविध आजार-रोग टाळण्यासाठी, डॉक्टर लोकांना फिल्टर केलेले पाणी किंवा उकळलेले पाणी पिण्याचा सल्ला देतात. सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी ते उकळणे ही सर्वात जुनी पद्धत आहे. पाणी उकळण्याचा मुख्य उद्देश म्हणजे त्यातील जंतू नष्ट करणे. TOI च्या रिपोर्टनुसार, जेव्हा पाणी उकळले जाते तेव्हा त्यातील सूक्ष्म जीव, विषाणू आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. ते प्यायल्याने आजारांचा धोका कमी होतो. मात्र, उकळलेल्या पाण्यातून शिसे, आर्सेनिक, मॅग्नेशियम आणि नायट्रेट यांसारख्या गोष्टी बाहेर पडतात, ज्या धोकादायक ठरू शकतात. मात्र, हे पाणी नळाच्या पाण्यापेक्षा बरेच स्वच्छ असते, परंतु पूर्णपणे सुरक्षित आहेच असे, मानले जाऊ शकत नाही.

हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत

फिल्टर केलेले पाणी जास्त फायदेशीर आहे का?

उकळलेल्या पाण्यापेक्षा शुद्ध किंवा फिल्टर केलेले पाणी पिणे अधिक सुरक्षित मानले जाते. पाण्यातील सर्व प्रकारचे जीवाणू, विषाणू आणि रसायने वॉटर प्युरिफायरद्वारे काढून टाकली जातात. बाजारात याविषयी अनेक तंत्रज्ञान आहेत, ज्याद्वारे पाणी पूर्णपणे फिल्टर करून ते पिण्यासाठी सुरक्षित केले जाते. ही पद्धत उकळत्या पाण्यापेक्षा अधिक प्रभावी आहे आणि फिल्टर केलेले पाणी पिऊन आपण अनेक रोग टाळू शकता. जर तुमच्याकडे पाणी फिल्टर किंवा शुद्ध करण्याची सोय नसेल, तर अशा परिस्थितीत पाणी उकळून प्यावे.

हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

प्रतिकारशक्ती चांगली असते -

स्वच्छ पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते कारण त्यात सर्व आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. शुद्ध पाणी चयापचय आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी ठरते. तसेच, स्वच्छ पाणी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे फिल्टर केलेले पाणी पिण्याचा प्रयत्न करा. ही सुविधा तुमच्याकडे उपलब्ध नसेल, तर आजारांपासून दूर राहण्यासाठी पाणी उकळून प्यावे.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips