मुंबई 06 ऑक्टोबर : बऱ्याचदा असं होतं की आपण आजारी पडलो की आपल्याला माहित असलेली औषधं आपण घेतो आणि डॉक्टरकडे जाणं टाळतो. तसेच आपण सरास आपल्या जवळच्या मेडीकलमध्ये जातो आणि तेथून आपल्याला माहित असलेली औषधं घेतो. परंतू तुम्हाला महितीय डॉक्टरांच्या सल्याशिवाय घेतलेले औषधं किती धोकादायक ठरु शकतात? परंतु लोक या गोष्टींबाबत फारसे गंभीर नाहीत. आपण घेतलेल्या गोळ्या किंवा औषधाची फक्त एक्सपायरी डेट तपासतो आणि ती घेतो आपण आतापर्यंत इतकंच जागरुक आहोत. परंतू तुम्हाला माहितीय का की आणखी एक अशी गोष्ट आहे जी खाण्यापूर्वी तपासणे खूप महत्वाचे आहे. हे वाचा : जखमेवर बँडेज पट्टी लावताना अशी घ्या काळजी, अन्यथा संसर्ग पसरू शकतो ही गोष्ट म्हणजे गोळ्यांच्या पाकीटावरील लाल रंगाची रेष. आपण बऱ्याच पॅकिटांवर ही लाल रेष पाहिली असेल, परंतू ही लाल रेष कशासाठी असते याबद्दल फारच कमी लोकांना ठावूक असेल. अनेकांना ही लाल रेष पाहून वाटतं की ते अगदी सामान्य आहे किंवा कंपनीची डिझाइन असावी. परंतू तसं नाही. प्रत्यक्षात, त्या ओळीत खूप महत्वाचे कार्य आहे, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. एक्सपायरी डेटप्रमाणेच हा बार तुम्हाला औषधाविषयीच्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगतो. लाल पट्टी काय दर्शवते?
Medicines with the Red Line on their strips should be consumed only with the doctor's prescription. pic.twitter.com/5J2Tu2jDBB
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) April 18, 2016
भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने 2016 मध्ये ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांनी लाल पट्टीचा अर्थ काय आहे हे तपशीलवार सांगितले होते. ज्या औषधांच्या पॅकेटवर लाल पट्टी असते ती डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेऊ नयेत. या औषधांमध्ये एंटिबायोटिक्स आहेत. ज्यामुळे त्या केव्हाही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. हे वाचा : तुम्ही प्लास्टिकचा भात तर खात नाही ना? ‘या’ ट्रीकने ओळखा तांदूळ बनावट की खरा अनेक वेळा आपण दुकानदाराकडूनच औषध मागवतो. अशा परिस्थितीत, तुम्ही त्यावरील पट्टी पाहून ते औषध कसे खावे हे तपासू शकता. मात्र, स्वत: किंवा दुकानदाराच्या सांगण्यावरून कोणतेही औषध घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हा ही चांगलं आहे, तसेच या लाल रेषाच्या गोळ्यांसाठी तर ते आवश्यकच आहे.