दिल्ली, 11 सप्टेंबर : अनेकांना सिगारेटचे (Smoking) व्यसन सोडवणे कठीण जाते, त्यावेळी ते ई-सिगारेटचा (E-cigarette) वापर करतात. अशावेळी त्यांना वाटतं की आपण या व्यसनातून बाहेर पडू, परंतु निकोटीन असलेल्या ई-सिगारेटच्या सेवनामुळे व्यसन सोडवणे तर दूरच पण त्यामुळे शरीराला हानीकारक आजार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ई-सिगारेटमध्ये इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलीवरी सिस्टम (ENDS) असते. त्यामुळे या सिगारेटमधून धूर निघत नाही. परंतु यातून बाष्पाचे (Vapor) उत्सर्जण (Emitted) होते. ज्यामुळे या सिगारेटला ओढल्यानंतर (Smoking) करण्याचा फिल येतो. पण याचा दुष्परिणाम हा मोठा होत असतो. दैनिक जागरणने दिलेल्या एका बातमीनुसार एका संशोधनात असं स्पष्ट झाले आहे की ई-सिगारेटच्या सेवनामुळे शरिरात रक्ताच्या गाठी तयार होतात. जो शरिरातील धमन्यांमधील रक्ताच्या पुरवठ्याला डॅमेज करतो. त्यामुळे शरिरात रक्ताच्या गाठी तयार होतात. त्यामुळे ह्रदयविकाराचा धोका वाढत जातो. या संशोधनात 18 ते 22 वर्षीय लोकांची मतं जाणून घेण्यात आली होती. जे सिगारेटचे सेवन करत होते. परंतु त्यांना अजून असा कुठल्याही प्रकारचा आजार जडलेला नव्हता. परंतु जेव्हा त्यांनी ई-सिगारेटचे सेवन करायला सुरूवात केली तेव्हा त्यांच्या आरोग्यात काही बदल निरीक्षणाअंती समोर आले आहेत. त्यात प्रामुख्याने ह्रदयविकाराचा धोका हा होता. फक्त गाजर खाणं पुरेसं नाही; डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे पदार्थसुद्धा खायला हवेत संशोधनातील काही निरिक्षणं
- सिगारेट घेतल्यानंतर 15 मिनिटांच्या आत त्यांच्या शरीरात ब्लड क्लॉटचे प्रमाण हे 23 टक्क्यांनी वाढले.
- हार्टचा वेग हा सरासरीपेक्षा 73 बीट्स प्रति मिनट (BPM) पर्यंत वाढला होता.
- रक्तदाब हा सरासरी 108 पेक्षा 117 MMHG पर्यंत पोहचला.
- शरिरातील धमन्या आकसल्या.
- पण जेव्हा हेच संशोधन हे निकोटीन नसलेल्या ई-सिगरेटचा वापर करणाऱ्यांमध्ये केले गेले तेव्हा हा बदल जाणवला नाही.