मुंबई, 20 ऑगस्ट : जवळपास सगळ्या लोकांना स्वप्ने पडत असतात. झोपताना स्वप्न पाहणे ही एक सामान्य क्रिया आहे. कधी स्वप्ने चांगली असतात, काही स्वप्ने वाईट असतात, तर काही स्वप्ने भीतीदायकही असतात. झोपताना दिसणार्या स्वप्नांचा संबंध आपल्या आयुष्याशी कुठेतरी नक्कीच असतो. स्वप्नशास्त्रानुसार, झोपेत दिसणारी स्वप्ने आपल्यासाठी चांगल्या आणि वाईट गोष्टी दर्शवतात, त्यामुळे त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. स्वप्न विज्ञानात स्वप्नांचे विशेष महत्त्व सांगितले आहे. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मृत किंवा पूर्वज दिसतात. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात मेलेले लोक येणे म्हणजे तुमची त्यांच्याशी असलेली आसक्ती दिसून येते. परंतु, जर ते तुमच्या स्वप्नात वारंवार येत असतील तर त्याचा अर्थ गंभीर असू शकतो. जाणून घेऊया स्वप्नात मृत व्यक्ती आणि पूर्वजांना पाहणे शुभ की अशुभ? मयत व्यक्ती वारंवार स्वप्नात येणे - स्वप्न शास्त्रानुसार मृत व्यक्तीला वारंवार स्वप्नात पाहणे अशुभ लक्षण मानले जाते. त्याचा असा अर्थ होतो की, मृतांना शांती मिळालेली नाही आणि ते शांततेच्या शोधात भटकत आहेत. अशा स्थितीत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांची विधीवत पूजा करावी. याशिवाय घरी रामायण आणि गीता पठण करा. वडिलांना आनंदी पाहणे चांगले लक्षण - दुसरीकडे, जर तुम्ही तुमच्या स्वप्नात मयत वडिलांना आनंदी असल्याचे पाहत असाल तर हे एक चांगले चिन्ह आहे. स्वप्न शास्त्रानुसार पूर्वज तुमच्यावर प्रसन्न असतील तर तुमच्यावर सदैव कृपा राहते. पितरांच्या आशीर्वादाने सर्व अडचणींपासून मुक्ती मिळू शकते. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान मयत लोकांना दुःखी पाहणे अशुभ - याउलट, जर तुम्ही स्वप्नात मयक वडिलांना रागावलेले किंवा दुःखी असल्याचे पाहत असाल तर हे स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार मृत व्यक्तीची काही इच्छा अपूर्ण राहिली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही घरी पंडिताकडून पूजा-विधी करून घ्या. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







