eमुंबई, 19 फेब्रुवारी: दुधाला (Milk) आपल्या आरोग्यदायी जीवनामध्ये खूप महत्व आहे. दूध शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आपण लहानपणापासूनच आपल्या आजी आणि आईकडून दुधाचे महत्व (milk benefits) ऐकत आलो आहोत. दूधाला परिपूर्ण भोजन देखील मानले जाते. दूधापासून आपल्या शरीराला प्रोटीन आणि कॅल्शियम मिळते. दूधामध्ये असलेल्या मिनरल्स आणि व्हिटॅमिनमुळे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपली हाडं मजबूत करण्यासाठी दूधाचे सेवन करणे खूप गरजेचे आहे.
दरम्यान आपल्या चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे आपले आरोग्य बिघडू शकते असे तज्ज्ञ सांगतात. आपल्याला नाश्ता करताना किंवा जेवताना कोणतेही पदार्थ एकत्र खाण्याची सवय असते. पण अनेक पदार्थ असे एकत्र खाणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. असेच दुधाच्या बाबतीत सुद्धा आहे. दूध पिताना थोडी सावधानता बाळगणे गरजेचे आहेत. कारण असे काही पदार्थ आहेत जे दूध प्यायल्यानंतर खाल्ल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. कोण-कोणते पदार्थ दूध प्यायल्यानंतर खाऊ नये याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
दूधासोबत हे पदार्थ खाणं टाळा -
1. मसालेदार पदार्थ (Spicy Snacks)
प्रत्येकालाच चमचमीत आणि तिखट खाणं आवडतं. पण आपण दूध प्यायले असेल आणि त्यानंतर तिखट पदार्थ खाण्याचा विचार करत असाल तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला गॅस आणि अपचनाची समस्या उद्भवू शकते.

तिखट पदार्थांबरोबर दूधसेवन करू नये
(हे वाचा-महाभयंकर आहे कोरोनाची दुसरी लाट; 46 देशांमध्ये माजवला हाहाकार)
2. ब्रेड बटर (Bread Butter)
नाश्त्यामध्ये ब्रेड बटर खाणं सर्वांनाच आवडते. अनेक लोकं दूधासोबत ब्रेड बटर खातात. तुम्हाला दूध आणि ब्रेड बटर एकत्र खायला खूपच चवदार लागत असेल पण याचे एकत्र सेवन करणे खूप हानिकारक होऊ शकते. यामुळे तुम्हाला उलट्या देखील होऊ शकतात.

होय! ब्रेड-बटरबरोबर दूध पिणे आरोग्यास चांगले नाही
3. संत्रं (Oranges)
संत्रं खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी मिळते. दूध आणि संत्रं एकत्र खाल्लं नाही पाहिजे. दूधामध्ये असलेले कॅल्शियम फळांमध्ये असलेल्या एन्झाइम्स शोषून घेतात. त्यामुळे शरीराला त्याचे पोषण मिळू शकत नाही. दूध आणि सत्रे खाल्ल्यामुळे तुम्हाला गॅसची समस्या उद्भवू शकते.

संत्रं आणि दूध हे समीकरण आरोग्यासाठी चांगले नाही
(हे वाचा-लसूण सोलण्याची ही पद्धत पहिली का? सोशल मीडियावर तुफान VIRAL)
4. मुळा (Radish)
दूध प्यायल्यानंतर मूळा किंवा त्यापासून तयार केलेले पदार्थ खाऊ नये. दूध प्यायल्यानंतर मूळा खाणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. कारण असे केल्यामुळे तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या होऊ शकतात.

मुळा आणि दुधाचे सेवन एकत्र करू नका
दूध आरोग्यासाठी फायद्याचे असले तरीही या पदार्थांबरोबर कधीच दुधाचे सेवन करू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.