मुंबई, 18 फेब्रुवारी : सोशल मीडियावर किचनमधील अनेक हटके टिप्स व्हायरल होत असतात. यामध्ये विविध प्रकारच्या रेसिपी असो किंवा किचनमध्ये मदत होऊ शकणाऱ्या गोष्टींचा समावेश असतो. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये सोप्या पद्धतीनं लसूण (Garlic) सोलला जाऊ शकतो हे दाखवण्यात आलं आहे. 12 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये लसूण सोप्या पद्धतीनं देखील सोलला जाऊ शकतो हे दाखवण्यात आलं आहे. अतिशय कमी कालावधीत हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावर विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत.
टिकटॉकवरील (Tiktok) हा व्हायरल व्हिडीओ असून ओरिजिनली हा व्हिडीओ टिकटॉकवरील @xwowduck या युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओला 1.5 मिलियन व्यूज मिळाले आहेत. यामध्ये या युजरने आपल्या सासूला याचं श्रेय दिलं असून त्यांच्याकडून आपण ही पद्धत शिकल्याचं म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये, लसणाच्या कांडीला दोन समान भागामध्ये कापून त्यानंतर त्याला थोडं दाबलं असता लसणाच्या पाकळ्या अतिशय सुटसुटीत होताना दिसून येत आहे.
Can someone confirm that this works... pic.twitter.com/9Ni7825YLH
— First We Feast (@firstwefeast) November 10, 2020
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अतिशय सोप्या पद्धतीनं लसूण सोलण्याच्या या क्रियेने लोकं प्रभावित झाले आहेत. ही सोपी पद्धत खरंच उपयोगी असल्याचं म्हणत first we feast या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याचबरोबर एका युजरने खरंच ही पद्धत काम करत असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Easy hack, Garlic peel off, Lifestyle, Mumbai, Viral videos