मराठी बातम्या /बातम्या /heatlh /मृत्यूपूर्वीच स्टीफन हॉकिंग यांनी दिला होता इशारा! दुर्लक्ष केल्याने दिल्लीत श्वास घेणं मुश्कील

मृत्यूपूर्वीच स्टीफन हॉकिंग यांनी दिला होता इशारा! दुर्लक्ष केल्याने दिल्लीत श्वास घेणं मुश्कील

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : जगातील प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ प्रोफेसर स्टीफन हॉकिंग (Stephen Hawking)यांनी त्यांच्या मृत्यूच्या सुमारे दोन वर्षांपूर्वी एका महत्त्वाच्या मुलाखतीत म्हटले होते की, गेल्या काही दशकांमध्ये आपण पर्यावरणाबद्दल कमी लोभी असायला हवे होते. गेल्या काही दशकांत आपण खूप मूर्खपणाच्या गोष्टी केल्या आहेत, ज्या करायला नको होत्या. इंडिपेंडंट वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, लॅरी किंगला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितले होते. 2016 मध्ये ओरा टीव्हीवर त्यांची मुलाखत प्रसारित झाली होती. 8 जानेवारी 1942 रोजी जन्मलेले प्रोफेसर हॉकिंग यांचे 14 मार्च 2018 रोजी निधन झाले.

प्रोफेसरने 2016 मध्ये सांगितले होते की, मी 6 वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 मध्येच जगाला प्रदूषण आणि गर्दीबाबत इशारा दिला होता. तेव्हापासून परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. आमच्या शेवटच्या संभाषणापासून आतापर्यंत जगाची लोकसंख्या अर्धा अब्जांनी वाढली आहे आणि ती कुठेही आटोक्यात येताना दिसत नाही.

2100 पर्यंत जगाची लोकसंख्या 8 अब्जावर जाणार

ते म्हणाले होते की जर लोकसंख्या याच वेगाने वाढत राहिली तर 2100 सालापर्यंत जगात 8 अब्जांपेक्षा जास्त लोक असतील. गेल्या पाच वर्षांत वायू प्रदूषणात 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगातील 80 टक्क्यांहून अधिक शहरी भागातील हवा प्रदूषणामुळे श्वास घेण्यायोग्य नाही. पुढे ते म्हणतात, वाढते प्रदूषण आणि वाढत्या कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनामुळे जागतिक तापमानवाढ धोकादायक पातळीपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला खूप उशीर झालेला असेल. 2016 मध्ये एका कार्यक्रमात त्यांनी या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या.

Air Pollution : हवा प्रदूषणामुळे दरवर्षी होत आहेत 70 लाख मृत्यू; WHO ने जारी केल्या नव्या गाइडलाइन्स

युद्धात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबद्दल चिंतीत Artificial intelligence

प्रोफेसर हॉकिंग यांना भविष्यातील युद्धात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबतही चिंता होती. ते म्हणाले होते की एआय शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेत सरकार सहभागी होताना दिसत आहे. ते AI आधारित विमाने आणि शस्त्रे तयार करत आहेत. या प्रकल्पांचा थेट फायदा मानवाला होऊ शकत होता. यांना मेडिकल सारख्या क्षेत्रात वापरले जाऊ शकत होते. मात्र, सध्या याचा वापर वेगळ्याच गोष्टींसाठी होताना दिसत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात विचारपूर्वक विकास केला पाहिजे. ते म्हणाले की जर यंत्रे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या त्या पातळीपर्यंत पोहोचतील तिथं ते स्वत:च स्वतःसारखी यंत्रे तयार करू लागतील. त्यावेळी मनुष्यजातील धोका निर्माण होऊ शकतो.

प्रोफेसर हॉकिंग यांनी निसर्गाच्या अस्तित्वावरही चर्चा केली. स्टारमस कॉन्फरन्समध्ये त्यांनी ज्ञात विश्वाचा नकाशा बनवण्याची आपली योजना सांगितली होती. रेडिएशनच्या पॅटर्नचा अभ्यास करून नकाशा तयार करण्यात योजना होती. ते म्हणाले होते की या कामातून काळ्या ऊर्जेचे स्वरूप प्रकट होईल, जे विश्वाच्या वेगाने विस्तारण्याचे कारण आहे.

Air Pollution : हवा प्रदूषणामुळे घशात जळजळ, डोकेदुखीच्या समस्या वाढल्या; हे उपाय ठरतील गुणकारी

हॉकिंग यांनीही देवाचे अस्तित्व नाकारले

खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना नास्तिक मानले जाते. त्यांनी त्यांच्या शेवटच्या पुस्तकात स्पष्टपणे लिहिले आहे की देव कुठेही अस्तित्वात नाही. कोणीही जग निर्माण केले नाही आणि कोणीही आपले भाग्य लिहित नाही. आपल्या शेवटच्या पुस्तकात त्यांनी अशा अनेक प्रश्नांवर भाष्य केले आहे जे आपल्या विचाराच्या हजारो वर्षे पुढे आहेत. त्यांच्या पुस्तकात त्यांनी अनेक ब्रह्मांड, एलियन इंटेलिजन्स, स्पेस कॉलोनायझेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर मत मांडले आहे.

जगातल्या या 12 शहरांनी Air Pollution वर मिळवलं नियंत्रण; जाणून घ्या कसं?

त्यांनी पुढे लिहिले की शतकानुशतके असा विश्वास आहे की त्यांच्यासारख्या शारीरिकदृष्ट्या दुर्बल लोकांना देवाचा शाप आहे. पण माझा त्यावर विश्वास नाही. त्यांच्या पुस्तकाचे नाव आहे - इज देअर गॉड? त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे की, या शतकाच्या अखेरीस आपण भगवंताचे मन समजण्यास सुरुवात करू.

First published:

Tags: Air pollution, Delhi, Pollution