WHO ने आता वायू प्रदूषणाची तुलना धूम्रपानाशी केली आहे. वाईट हवेत श्वास घेणं म्हणजे दररोज सिगरेट ओढण्याएवढं वाईट आहे. जागतिक आरोग्य संघटनेने Air Pollution संदर्भात नवीन कठोर मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. WHO चा दावा आहे की यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचू शकतात.
WHO ने 22 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटलं आहे की वायू प्रदूषण आता मानवी जीवनासाठी सर्वात मोठा पर्यावरणीय धोका आहे.
नवीन मार्गदर्शक तत्त्वं ओझोन, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साईडसह इतर ग्रीन हाउन वायू हवेत सोडण्याबाबत लागू होतात.
या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केल्यास लाखो जीव वाचवण्याचे लक्ष्य आम्ही ठेवलं आहे, असं WHO ने म्हटलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने याआधी 2005 मध्ये हवेच्या गुणवत्तेची मार्गदर्शक तत्त्वं जारी केली होती, ज्याचा जगभरातील पर्यावरणीय धोरणांवर लक्षणीय परिणाम झाला होता.
मात्र, संस्थेचं म्हणणं आहे की, गेल्या 16 वर्षांमध्ये आम्हाला असं जाणवलं की वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होतो.
सीओपी 26 ग्लोबल क्लायमेट समिटच्या अगोदर जारी केलेल्या निवेदनात जागतिक आरोग्य संघटनेने (world health organisation) म्हटलं आहे की, गोळा केलेले पुरावे केवळ विशिष्ट देश किंवा प्रदेशांमध्येच नव्हे तर जागतिक स्तरावर प्रमुख वायू प्रदूषण कमी करण्यासाठी कारवाई करण्यासाठी पुरेसे आहेत.