नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर : दिवाळीच्या आगमनाने भारतातील अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता खालावली आहे. कोरोना महामारीचा सामना करण्यासोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेणंही अधिक महत्त्वाचं झालं आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे आधीच अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूशी संबंधित समस्यांमध्ये भर पडली आहे. दिवाळीच्या आगमनापूर्वीच राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात प्रदूषणाने थैमान घातले होते, मात्र दिवाळीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी परिस्थिती आणखी गंभीर झाली. दिवाळीच्या आगमनापूर्वी, दिल्लीचा AQI म्हणजेच हवा गुणवत्ता निर्देशांक 'अतिशय खराब' होता. मात्र, आता तो धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. राज्यात मुंबईसह अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची स्थिती (Health Tips During Air Pollution) बिकट आहे.
Jagran.com च्या बातमीनुसार, वायू प्रदूषणामुळे आपल्या शरीराच्या अवयवांना आणि अनेक कार्यांना हानी पोहोचू शकते. हवा प्रदूषणामुळे COPD म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजमध्ये वाढ, ब्रोन्कियल अस्थमा, ऍलर्जी, थकवा, चिंता, डोकेदुखी, डोळे, घसा आणि नाकात जळजळ अशा अडचणी निर्माण होतात. यामुळे मज्जातंतूंना म्हणजे मज्जासंस्था आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालींचेही नुकसान होऊ शकते.
अशा समस्या टाळण्यासाठी, सुरक्षित आणि निरोगी राहण्यासाठी काही सोप्या टिप्स -
फटाक्यांना बाय-बाय करा
फटाके वाजवू नका किंवा दुसऱ्या दिवशी निर्माण होणारा कचराही जाळू नका. त्यातून अनेक प्रकारचे विषारी वायू बाहेर पडतात, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. तांबे, कॅडमियम, सल्फर, अॅल्युमिनियम आणि बेरियम फटाक्यांमध्ये आढळतात. याशिवाय चमक निर्माण करण्यासाठी दोलायमान रंग सोडले जातात. त्यांच्यापासून असे कण आणि वायू (जसे नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साइड) बाहेर पडतात, जे तासनतास वातावरणात फिरत राहतात. ते आपल्या डोळ्यांसाठी घातक असतात आणि आपल्या फुफ्फुसांना इजा पोहचवतात. श्वास घेण्यास त्रास होतो, गुदमरल्यासारखे वाटते.
घरात वेंटिलेशन काळजी घ्या
घरात हवा खेळती राहील, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. घरात फटाक्यांचा धूर जमा होणे घातक असते तो बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागेल. धुराच्या या स्थिर हवेत श्वास घेणं अस्वस्थ आणि गुदमरणारे आहे. धूर घालवण्यासाठी तुम्ही सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडल्याची खात्री करा. हवा खेळती राहत असेल तर तुमच्या घराचे वातावरण निरोगी राहते.
हे वाचा - फटाके बंदीच्या नियमांना दिल्लीकरांनी दाखवली केराची टोपली; हवा प्रदूषणानं गाठली सर्वोच्च पातळी
मेणबत्ती पर्याय
अशा वेळी घरामध्ये सामान्य मेणबत्त्यांऐवजी मधमाशाच्या पोळ्यापासून बनवलेल्या मेणाच्या मेणबत्त्या वापराव्या. हे मेन हानिकारक धुके कमी करून तुमचे घर उजळेल. हे हवेतील विषारी संयुगे देखील निष्प्रभावी करेल. हवा शुद्ध करण्याचा आणि घरातील प्रदूषित हवा रोखण्याचा एक सोपा मार्ग आहे.
घरातील रोपे देखील फायदेशीर आहेत
काही घरगुती झाडे घरातील हवा ताजी, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवतात. ते अमोनिया, फॉर्मल्डिहाइड आणि बेंझिनपासून मुक्त होण्यासाठी देखील खूप प्रभावी आहेत. म्हणून, या वनस्पतींच्या रूपात आपल्याला नैसर्गिक, सुंदर आणि निरोगी एअर फिल्टर्स मिळतात.
हे वाचा - 17 वर्षीय मुलीवर 17 जणांकडून सामूहिक बलात्कार; अनेक दिवस घरात डांबून सुरू होता भयावह प्रकार
मास्कची गरज
जर तुम्हाला प्रदूषण आणि कोरोना विषाणूपासून वाचायचे असेल तर घराबाहेर पडण्यापूर्वी नक्कीच चांगल्या दर्जाचा मास्क लावा. N95, N99 किंवा N100 मास्क निवडा, जे हवेतील सूक्ष्म कण फिल्टर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Air pollution, Health Tips