बोगाटा: बोगाटा हे कोलंबिया मधील सगळ्यात गजबजलेलं शहर आहे. ते 1974 पासून रस्त्यावरील गाड्यांवर मर्यादा आणण्याचं काम करत आहे. आता या शहरात फक्त सायकलींसाठी 220 मैल लांब लेन तयार करण्यात आली आहे. बोगाटामध्ये आठवड्यातून एक दिवस 75 मैल रस्त्यावर वाहने चालत नाहीत. हे काम त्यांनी 1974 पासून सुरू केले आहे. 2013 मध्ये स्थानिक सरकारने आणखी एक यंत्रणा लागू केली. काही तासांसाठी इथं गाड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या काळात नंबर प्लेटच्या आधारे सम किंवा विषम नंबरच्या गाड्या रस्त्यावर धावतात.
ब्रसेल्स: ब्रुसेल्समध्ये मध्यवस्तीत खूप कमी ऑफिसेस आहेत. इथे एक शॉपिंग सेंटर सुद्धा आहे. या ठिकाणी कार येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा रस्ता युरोपमधील दुसरा मोठा रस्ता आहे. तसंच सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिलं जातं. सप्टेंबर महिन्यात संपूर्ण शहरात गाड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या शहरात डिझेल गाड्यांवर बंदी आहे.