जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Period Pimple : पीरिअड्ससोबत पिंपल्सही का येतात? कारणासोबत यांना गायब करण्याचा फॉर्म्युलाही पाहा

Period Pimple : पीरिअड्ससोबत पिंपल्सही का येतात? कारणासोबत यांना गायब करण्याचा फॉर्म्युलाही पाहा

Period Pimple : पीरिअड्ससोबत पिंपल्सही का येतात? कारणासोबत यांना गायब करण्याचा फॉर्म्युलाही पाहा

अनेक स्त्रिया त्यांच्या मासिक पाळीत क्रॅम्प्स, मूड स्विंग्स, पोटदुखी इत्यादींनी त्रस्त असतात. काही महिलांना मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पिंपल्समुळे जास्त त्रास होतो. मात्र काही गीष्टींची काळजी घेऊन तुम्ही हे पिंपल्स येणे थांबवू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 ऑक्टोबर : अनेक स्त्रिया त्यांच्या मासिक पाळीत क्रॅम्प्स, मूड स्विंग्स, पोटदुखी इत्यादींनी त्रस्त असतात. काही महिलांना मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पिंपल्समुळे जास्त त्रास होतो. याचे कारण म्हणजे हार्मोनल बदल आणि तुमच्या खाण्याच्या सवयी. या गोष्टी पिंपल्सना अधिक ट्रिगर करतात. मात्र काही गीष्टींची काळजी घेऊन तुम्ही हे पिंपल्स येणे थांबवू शकता. हेल्थलाइनच्या मते, हे मुरुम मासिक पाळी सुरू होण्याच्या 7 ते 10 दिवस आधी बाहेर पडू लागतात आणि मासिक पाळी सुरू होताच अदृश्य होतात. तुमच्या सवयींमध्ये थोडेसे बदल करून आणि काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही ही समस्या बर्‍याच प्रमाणात नियंत्रित करू शकता. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीत पिंपल्स का येतात आणि ते टाळण्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता याबद्दल माहिती देणार आहोत.

जास्त आलेले तीळ चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवतात, त्यांना घालवण्यासाठी हे घरगुती उपाय वापरा

मासिक पाळी सुरू होण्यापूर्वीच पिंपल्स का येतात? पीरियड सायकल दरम्यान हार्मोन्समध्ये चढ-उतार होतात. मासिक पाळी सुरू होण्याच्या अगदी आधी, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे सेबेशियस ग्रंथी अधिक सेबम स्राव करते आणि हे मुरुमांसाठी ट्रिगर म्हणून कार्य करते.

News18लोकमत
News18लोकमत

हा एक तेलकट घटक आहे जो आपल्या त्वचेला वंगण घालतो आणि याच्या जास्त उत्पादनामुळे छिद्र बंद होऊ शकतात. याशिवाय, हा हार्मोन त्वचेमध्ये जळजळ आणि पिंपल्समध्ये बॅक्टेरियाच्या निर्मितीस प्रोत्साहन देतो. जेव्हा तुमची मासिक पाळी सुरू होणार असते तेव्हा असे घडते. पीरियड पिंपल्सपासून अशा प्रकारे आराम मिळवा वेदना कमी करण्यासाठी, आपण 10 ते 15 मिनिटे उबदार कॉम्प्रेस करा. तुम्ही हे दिवसातून 3 ते 4 वेळा करू शकता. कोल्ड कॉम्प्रेस करून तुम्ही सूज आणि वेदनापासून आराम मिळवू शकता. दिवसातून दोनदा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा. आपण बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी टी ट्री ऑइल वापरू शकता. या दिवसात सौंदर्य प्रसाधने, सनस्क्रीन इत्यादी वापरू नका.

Hair care : घरीही तयार करता येतात नॅचरल हेअर कलर्स; जाणून घ्या पद्धत

या गोष्टी लक्षात ठेवा हेल्मेट, कॉलर, स्कार्फ इत्यादींसारख्या गोष्टींपासून पिंपल्सचे संरक्षण करा, ज्यामुळे ते फुटू शकतात. साखर, मैदा, प्रक्रिया केलेले अन्न खाण्यापिण्यापासून दूर राहा. गर्भनिरोधक गोळ्यांच्या दुष्परिणामांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात