लसूण - मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार, तीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत. त्यांच्या वापरामुळे कोणतेही नुकसान होत नाही, परंतु जळजळ किंवा वेदना होऊ शकतात. तीळ काढण्यासाठी लसणाचा वापर करता येतो. लसणामध्ये मोठ्या प्रमाणात एन्झाईम्स असतात जे तीळ निर्माण करणाऱ्या पेशी नष्ट करू शकतात. चांगल्या परिणामांसाठी लसणाचा नियमित वापर करावा लागतो. मात्र, यामुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते.
एरंडेल तेल आणि बेकिंग सोडा - एरंडेल तेल आणि बेकिंग सोडा एकत्रितपणे तीळ काढण्याचे काम करू शकतात. बेकिंग सोडा तीळ कोरडे करतो आणि एरंडेल तेल त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. तेल आणि सोडा एकत्र करून पेस्ट बनवा आणि त्याचा नियमित वापर करा.
आयोडीन - आयोडीनच्या नियमित वापराने तीळ काढता येतात. आयोडीन त्वचेला कोरडे करू शकते, म्हणून पेट्रोलियम जेलीचा वापर तीळच्या आसपासच्या भागात केला जाऊ शकतो. आयोडीन विषारी आहे त्यामुळे ते वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे.
लिंबाचा रस - लिंबाचा रस दिवसातून अनेक वेळा लावल्याने तिळांवर ब्लीचचे काम करू शकते. काही दिवस वापरल्यानंतर तिळांचा रंग फिकट होईल आणि ते हलके दिसेल.
बटाटा - बटाटा नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो. तीळ पूर्णपणे काढून टाकण्याचे काम करत नाही. परंतु, तिळासाठी ब्लीचिंग एजंट म्हणून रंग उजळण्यास मदत करू शकतो.
जवस तेल - जवसाच्या तेलामध्ये असे संयुगे असतात, जे तीळ घालवण्याचे काम करू शकतात. तिळाशिवाय इतर काळे डाग घालवण्यासाठीही याचा वापर करता येतो.
केळीचे साल - केळीच्या सालीमध्ये विशिष्ट एन्झाईम्स आणि ऍसिड असतात जे तीळ काढून टाकण्यास मदत करतात. केळीची साल मॉइश्चरायझर म्हणून काम करते आणि त्वचेला कोरडेपणापासून वाचवते.
मध - मधामध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे तीळ आणि चामखीळ काढून टाकण्यासाठी काम करतात. मधाचा वापर केल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार देखील होऊ शकते.