मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Hair care : घरीही तयार करता येतात नॅचरल हेअर कलर्स; जाणून घ्या पद्धत

Hair care : घरीही तयार करता येतात नॅचरल हेअर कलर्स; जाणून घ्या पद्धत

Homemade hair colour

Homemade hair colour

केसांचं नुकसान होण्यापासून बचाव करायचा असेल आणि त्यांचं आरोग्य चांगलं ठेवून तुम्हाला केसांना नवा लूक द्यायचा असेल, तर तुम्ही नॅचरल हेअर कलर्सची मदत घेऊ शकता. नॅचरल हेअर कलर्स आपण घरी सहजपणे तयार करू शकतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 ऑक्टोबर :  पांढरे केस लपवण्यासाठी किंवा केसांना नवा लूक देण्यासाठी अनेकांना हेअर कलर करायला आवडतं. यासाठी एक तर पार्लरमध्ये जावं लागतं किंवा बाजारात उपलब्ध हेअर कलर आणून काही जण घरीच केसांना कलर करतात; मात्र बाजारात उपलब्ध असलेले हेअर कलर्स केसांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. त्यामध्ये वापरण्यात आलेलं केमिकल हे त्यामागचं मुख्य कारण असतं.

अशा परिस्थितीत केसांचं नुकसान होण्यापासून बचाव करायचा असेल आणि त्यांचं आरोग्य चांगलं ठेवून तुम्हाला केसांना नवा लूक द्यायचा असेल, तर तुम्ही नॅचरल हेअर कलर्सची मदत घेऊ शकता. नॅचरल हेअर कलर्स आपण घरी सहजपणे तयार करू शकतो. त्यांची खासियत म्हणजे ते केसांना नवा लूक तर देतातच; पण केसांच्या वाढीसाठीही त्यांचा उपयोग होतो. तुम्ही घरी वेगवेगळ्या रंगाचे नॅचरल हेअर कलर्स कसे बनवू शकता, ते जाणून घेऊ या.

होममेड हेअर कलर बनविण्याची पद्धत

पहिली पद्धत

एका वाटीत 1 कप हीना पावडर (मेंदी), 1 कप इंडिगो पावडर मिक्स करा आणि त्यात एक अंडं घालून पेस्ट बनवा. आता त्यात एक चमचा हेअर कंडिशनर घालून ते फेटून घ्या. हे मिश्रण घट्ट असेल तर गरजेनुसार तुम्ही त्यात दही किंवा पाणी घालू शकता. आता ब्रशच्या साह्याने ते केसांना नीट लावा आणि 3 ते 4 तास राहू द्या. नंतर पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. असे केल्यास तुमच्या केसांना नवीन लूक मिळेल.

हेही वाचा - Skin Care : त्वचेच्या तक्रारी दूर करण्यासाठी मुलतानी माती हा उत्तम उपाय; लगेच ट्राय करून बघा

दुसरी पद्धत

एका वाटीत 2 ते 3 चमचे आवळा पावडर आणि 2 चमचे खोबरेल तेल एकत्र करा. केसांना कलर करण्यासाठी खोबरेल तेल गरम केल्यानंतर त्यात आवळा पावडर घातल्यास ते उत्तम राहील. अशा रीतीने तुमचा नॅचरल हेअर कलर तयार होतो. आता ते मिश्रण केसांवर 8 ते 10 तास राहू द्या. त्यानंतर पाण्याने केस धुऊन घ्या. अशा प्रकारे तुमच्या केसांना नैसर्गिक काळा रंग मिळेल आणि केस मजबूत होतील.

तिसरी पद्धत

एका वाटीत एक कप पाणी घेऊन त्यात अर्धा कप कोरडी मेंदी आणि 2 ते 3 तमालपत्रं घालून रात्रभर ठेवा. सकाळी ते मिश्रण उकळून घ्या आणि थंड झाल्यावर गाळून घ्या. आता शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या आणि ओल्या केसांवर हे मिश्रण 1 तास लावून ठेवा. नंतर पुन्हा एकदा पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. आता तुमचे केस नॅचरल ब्लॅक आणि चमकदार दिसतील.

First published:

Tags: Beauty tips, Lifestyle, Woman hair