Home /News /heatlh /

केवळ Metabolism बुस्ट करून फिगर करा मेन्टेन; 'या' गोष्टींची घ्या काळजी

केवळ Metabolism बुस्ट करून फिगर करा मेन्टेन; 'या' गोष्टींची घ्या काळजी

आपल्या शरिरातील अवयव, श्वास आणि हार्ट बिट यांचे मिळून ‘बेसल मेटाबॉलिक रेट’ (Basal metabolic rate) नुसार आपल्या शरिरात मेटाबॉलिजम स्थिती तपासतो. त्यामुळे त्याचा आपल्या शरिरावर (Boost Metabolism To Stay Slim And Fit) आणि आपल्या फिटनेसवर याचा परिणाम होत असतो.

पुढे वाचा ...
    दिल्ली, 13 सप्टेंबर : कोरोनामुळे (Korona) अनेकांचे मानसिक आणि शारिरीक आरोग्य बिघडले. या काळात अनेक लोकांना आपल्या शरीराची काळजी घेता आली नाही. त्यामुळे आता हळूहळू निर्बंध शिथील होत असताना लोकांनी आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे काही लोक व्यायाम करत आहेत तर काही घरी राहूनच योग्य आहार घेऊन आपला फिटनेस जपत आहे. त्यामुळे आता लोकांना आपल्या डाएट आणि फिटनेसबद्दल काळजी वाटू लागली आहे. अनेकदा एकाच पद्धतीचं जेवण आणि वयानुसार बदलणारा आहार या गोष्टीही फिटनेसवर परिणामकारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेकदा आपल्या शरीराचे वजन कमी होते. कारण आपल्या शरिरात मेटाबॉलिज्‍म (Metabolism) चे प्रमाण कमी असते. जेव्हा आपण दैनंदीन कामकाजात असताना जे काही खातो त्यातून आपल्या शरीराला उर्जा मिळत असते. त्याचमुळे आपल्या शरीरातील अवयव, श्वास आणि हार्ट बिट यांचे मिळून ‘बेसल मेटाबॉलिक रेट’ (Basal metabolic rate) नुसार आपल्या शरिरात मेटाबॉलिजम स्थिती तपासतो. त्यामुळे आपल्या शरीरावर (Boost Metabolism To Stay Slim And Fit) आणि आपल्या फिटनेसवर याचा परिणाम होत असतो. आता त्याला मेन्टेन कसं करावं हे आपण जाणून घेऊयात. Winter Fruits: थंडीची चाहूल लागताच आहारात 'या' फळांचा करा समावेश सकाळी लवकर उठा. जर आपली झोप व्यवस्थित होत असेल आणि तुम्ही लवकर उठत असाल तर शरीरातील मेटाबॉलिजम स्थिर राहते. त्यामुळे व्यक्तीच्या स्वभावातला ताजेतवानेपणाही वाढतो. हेल्दी फुड (Healthy food) आपल्या दैनंदीन आहारातून शरीराला प्रोटीन, फायबर, विटामिन्‍स आणि मिनरल्‍स मिळायला हवं असे अन्नपदार्थ जेवणात यायला हवे. त्यातून सहजपणे कॅलरीज बर्न होतील आणि याचा सकारात्मक प्रभाव हा शरीरावर पडेल. Life Partner : पार्टनरचा मूड खराब असेल वाद घालू नका, फक्त 'या' गोष्टी सांभाळा! भरपूर पाणी प्या. दिवसातून 3 लिटर पाणी प्यायला हवे, हे डॉक्टर आपल्याला नेहमी सांगत असतात. त्यामुळे शरिराला सातत्याने पाण्याची आवश्यकता असते, म्हणून भरपूर पाणी प्या. जेवणाची वेळ ठरवा. दिवसातून साधारणत: आपण दोनदा जेवन करतो. परंतु अनेकवेळा या जेवनाची वेळ निश्चित नसते. त्यामुळे आहाराचे संतूलन बिघडते. त्यामुळे जेवनाची प्रॉपर वेळ बनवून आहार घ्या, त्यामुळे आपला फिटनेस राहील. (Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Fitness, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या