जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Winter Fruits: थंडीची चाहूल लागताच आहारात 'या' फळांचा करा समावेश

Winter Fruits: थंडीची चाहूल लागताच आहारात 'या' फळांचा करा समावेश

Winter Fruits: थंडीची चाहूल लागताच आहारात 'या' फळांचा करा समावेश

थंडी (Winter) वाढत असल्याने आता त्यापासून बचाव करण्यासाठी आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हिवाळ्यातील थंडी बघता आपल्याला आहारात (Diet) बदल करावे लागणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 12 सप्टेंबर : आता पावसाळा (Rain) संपून हिवाळा लागण्याची चाहूल लागली आहे. हळूहळू थंडी (Winter) वाढत असल्याने आता त्यापासून बचाव करण्यासाठी आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हिवाळ्यातील थंडी बघता आपल्याला आहारात (Diet) बदल करावे लागणार आहेत. त्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा आणि कोणत्या पद्धतीची फळं (Fruits) खावीत, त्यामुळे शरिराला कोणते फायदे आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे आता हिवाळ्यात येणाऱ्या फळांव्यतिरिक्त अजून अशी कोणती फळं आहेत, जी आपल्याला हिवाळ्यात निरोगी ठेऊ शकतील, याची माहिती आपण घेऊयात. भारतात इतर देशांच्या तुलनेत (winter season in india) उन्हाळा हा कमी असतो. परंतु त्याचा सकारात्मक परिणाम असा आहे की त्याचकाळात आपल्याला अनेक प्रकारची फळं खायला मिळतात. त्याचबरोबर हिवाळ्यातही (Seasonal Fruits) अशी काही फळं आपल्याला खायला मिळतात, ज्याचा फायदा हा आपल्या आरोग्याला (winter fruits for health) होत असतो. त्या फळांच्या सेवनामुळे अनेक आजार आणि संक्रमणांना टाळता येऊ शकते. सेक्सपॉवर वाढवण्यासाठी ‘या’ पाच मसाल्यांचे करा सेवन; आयुष्य बदलेल कंसल्टंट डायटेशियन डॉ. रंजना सिंह यांच्या मते, हिवाळ्यात आपल्याला खोकला, सर्दी, कोरडी त्वचा अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागत. त्यामुळे हिवाळ्यातील फळं ही आपल्या रोगप्रतिकारक क्षमतांना वाढवण्याचे काम करते. डॉ. रंजना सिंह यांच्या मते संत्रा हे फळ हिवाळ्यात अतिशय उपयूक्त असे फळ आहे. संत्र्यामुळे शरिरातील इम्यून सिस्टम चांगली होते. त्याचबरोबर पेरू हे फळही अन्नपचन आणि कोलन कॅंसर कमी करण्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. कारण पेरूत Vitamine A फोलेट, पोटॅशियम, फायबर आणि कॉपरचे प्रमाण अधिक असते. त्याचबरोबर द्राक्ष आणि सफरचंद ही हिवाळ्यातच येतात. त्यामुळे या फळांमुळेही आयूष्य आरोग्यदायी राहू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात