Home /News /heatlh /

Body Exercise for men : पिळदार बॉडीसाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Body Exercise for men : पिळदार बॉडीसाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स

कोरोनामुळे (Corona) देशातील जिम्स (Gym) बंद पडल्याने तरुणांना आणि पुरूषांना फिटनेसची काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे जे शरिरयष्टीने भक्कम असे पुरूष होते, त्यांना आपली बॉडी फिट ठेवण्यासाठी घरगुती पद्धतीनेच व्यायाम करावे लागले. त्यामुळे आता आपली बॉडी फिट ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात अशा काही स्टेप्स आहेत ज्या घरी (bodyweight exercise at home) केल्या तरीही चांगल्या पद्धतीने व्यायाम होऊ शकतो.

पुढे वाचा ...
    दिल्ली, 12 सप्टेंबर : कोरोनामुळे (Corona) देशातील जिम्स (Gym) बंद पडल्याने तरुणांना आणि पुरूषांना फिटनेसची काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे जे शरीरयष्टीने भक्कम असे पुरूष होते, त्यांना आपली बॉडी फिट ठेवण्यासाठी घरगुती पद्धतीनेच व्यायाम करावे लागले. त्यामुळे आता आपली बॉडी फिट ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात अशा काही स्टेप्स आहेत ज्या घरी (bodyweight exercise at home) केल्या तरीही चांगल्या पद्धतीने व्यायाम होऊ शकतो. त्यामुळे आता पुरूषांनी आपली शरीरयष्ठी फिट करण्यासाठी नेमकं काय करायला हवं, कोणत्या स्टेप्स करायला हव्या याबाबत आपण काही गोष्टी जाणून घेऊयात. पुश-अप्स (Push ups) व्यायाम करताना Push ups करणे ही सर्वात कॉमन गोष्ट आहे. ही बॉडी पिळदार करण्यासाठीची एक सर्वोत्तम एक्सरसाइज आहे. आपल्या हातावर शरिराचे ओझे टाकून (बाइसेप्स आणि ट्राइसेप्स) हा व्यायाम केला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने हा व्यायाम केल्यामुळे पुरूषांची मसल्स तयार होतात. पुल-अप्स (pull ups) कंबर, शरिराचा बांधा आणि पोटाच्या पिळदारपणासाठी पुल-अप्स करणे हे अतिशय प्रभावी मानले जाते. यांमुळे आपले खांदे आणि कंबर ही बळकट होते. व्यायाम करताना ही पद्धतही फार सोपी असल्याने परिणामी यामुळे शरिर पिळदार बनते. कोरोनातून बरं झालेल्यांच्या किडनीवर होतायेत गंभीर परिणाम? संशोधनातून माहिती समोर बॉडीवेट स्क्वैट्स (squats) व्यायामात बॉडीवेट स्क्वैट्स हा दंडबैठकाच्या प्रकाराचा एक भाग आहे. त्यामुळे शरीरातील मांड्या आणि पोटऱ्यांवर याचा सकारात्मक प्रभाव पडतो. स्क्वैट्समुळे शरिरातील संतूलन वाढते आणि जखम होण्याचा धोकाही कमी असतो. बॉक्स जंप (box jump) यात व्यायाम करताना पुरूष हे आपल्या मजबूत पायांना एका वेगळ्या लेवलवर नेण्यासाठी बॉक्स जंप एक्सरसाइज करतात. यामुळे शरीराचे अतिरिक्त वजन कमी होते. परंतु ही बॉडीवेट एक्सरसाइज करताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता असते. कारण यात इजा होण्याचा धोका असतो. (Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Financial benefits, Health, Health Tips, Types of exercise

    पुढील बातम्या