Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनातून बरं झालेल्यांच्या किडनीवर होतायेत गंभीर परिणाम? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

कोरोनातून बरं झालेल्यांच्या किडनीवर होतायेत गंभीर परिणाम? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

आपली किडनी योग्य पद्धतीने काम करत नाहीये किंवा तिची कार्यक्षमता कमी झाली आहे, हे जवळपास 90 टक्के जणांना माहितीच नसतं, असं संशोधकांनी केलेल्या माहितीच्या विश्लेषणानंतर लक्षात आलं.

नवी दिल्ली 11 सप्टेंबर : कोरोना संसर्ग (Coronavirus Infection) झाल्यावर ताप, खोकला वगैरे तात्कालिक त्रास होतात. मात्र त्याचे दीर्घकालीन परिणाम शरीराच्या विविध अवयवांवर होत असल्याचं आतापर्यंतच्या वेगवेगळ्या संशोधनांतून स्पष्ट झालं आहे. या अनुषंगाने अलीकडेच झालेलं नवं संशोधन किडनी अर्थात मूत्रपिंडाशी (Kidney Failure) संबंधित आहे. जर्नल ऑफ दी अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (Journal of the American Society of Nephrology) या जर्नलमध्ये या नव्या संशोधनाबद्दलचा लेख प्रसिद्ध झाला आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये जावं लागलेल्या किंवा कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणं दिसलेल्या रुग्णांनाही किडनीशी संबंधित समस्या जाणवत असल्याचं दिसून आल्याचं या लेखात म्हटलं आहे. कोरोना संसर्ग होऊन त्यातून बऱ्या झालेल्या रुग्णांना या समस्या जाणवत असल्याचं त्यात म्हटलं आहे. या समस्यांवर लवकर उपचार केले गेले नाहीत, तर किडनीचा गंभीर विकार होऊ शकतो, असा इशाराही त्यात देण्यात आला आहे. किडनी निकामी झाली, तर शरीरातल्या अन्य अवयवांवरही विपरीत परिणाम होतो, असं अनेक विशेषज्ञांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या (Washington University) अभ्यासातून असं दिसून आलं आहे, की किडनी निकामी होण्याची समस्या अशा रुग्णांमध्ये वाढत चालल्याचं दिसून येत असून, त्याची लक्षणं मात्र दिसून येत नाहीत. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. बाप्पा पावला! 8 जिल्ह्यांत एकही कोरोना रुग्ण नाही; राज्याचा आकडाही दिलासादायक आपली किडनी योग्य पद्धतीने काम करत नाहीये किंवा तिची कार्यक्षमता कमी झाली आहे, हे जवळपास 90 टक्के जणांना माहितीच नसतं, असं संशोधकांनी केलेल्या माहितीच्या विश्लेषणानंतर लक्षात आलं. कारण त्याबद्दलची लक्षणं दिसून येत नाहीत. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेफ्रॉलॉजी अँड किडनी ट्रान्स्प्लांट विभागाचे संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ. संजीव गुलाटी (Dr Sanjeev Gulati) सांगतात, की किडनीची कार्यक्षमता 70 ते 80 टक्क्यांपर्यंत घटते, तरीही संबंधित व्यक्तीला त्याचा अजिबात सुगावा लागत नाही. त्यामुळे नंतर आजार शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर इलाज करणं अवघड जातं. त्यामुळे हा सायलेंट किलर विकार ठरत आहे, असंही त्यांनी नमूद केलं. कोरोना संसर्गामुळे फुप्फुसाशी (Lungs) संबंधित अनेक समस्या तयार होतात. किडनीवर त्याचा कशा प्रकारे आणि का दुष्परिणाम होतो, हे निश्चितपणे कळण्यासाठी अजून संशोधनाची गरज शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींना लाँग कोविड (Long Covid) होण्याचं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे. लाँग कोविड या प्रकारात कोरोना संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तीला त्यातून बरं झाल्यानंतर एका महिन्यानंतर किंवा अनेक महिन्यांपर्यंत नवनवी लक्षणं दिसत राहतात. कोरोना लसीकरणामुळे मृत्यूचा धोका कमी?, केंद्र सरकारनं दिली माहिती या नव्या अभ्यासाबद्दलचा लेख वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतले झियाद अल एली यांनी लिहिला आहे. ज्यांना कोरोना संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं किंवा ज्यांना अतिदक्षता विभागात दाखल करावं लागलं होतं, त्यांची किडनी फेल होण्याची शक्यता अधिक आहे, असं झियाद अल-एली यांनी लिहिलं आहे.
First published:

Tags: Coronavirus, Health

पुढील बातम्या