मराठी बातम्या /बातम्या /heatlh /केळीच्या पानावर जेवण का करावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

केळीच्या पानावर जेवण का करावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

केळीच्या पानांचा वापर आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

केळीच्या पानांचा वापर आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

केळीच्या पानांचा वापर आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

    नवी दिल्ली 14 सप्टेंबर : सध्याच्या काळात खाद्यसंस्कृतीत (Food Culture) मोठे बदल झाल्याचं दिसून येतं. पारंपरिक पदार्थांच्या तुलनेत पाश्चिमात्य किंवा नवनवीन खाद्यपदार्थ प्राधान्यानं सेवन केले जातात. जसा पदार्थांमध्ये बदल झाला आहे, तसाच बदल जेवण तयार करण्याच्या आणि जेवण्याच्या पद्धतीतही झाल्याचं दिसून येतं. अन्नपदार्थ शिजवण्यासाठी आणि जेवण्यासाठी वापरण्यात येणारी पारंपरिक भांडी (Utensils) आता कालबाह्य झाल्याचं दिसून येतं. सध्याच्या काळात स्टीलच्या, तसंच अन्य धातूंच्या भांड्यांचा अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापर वाढला आहे. जेवणासाठी ताटंही स्टीलचीच असतात. प्लास्टिकच्या प्लेट्सही वापरल्या जातात. परंतु, काही भागात अजूनही केळीच्या पानांवर (Banana Leaves) जेवण्याची पद्धत टिकून आहे. त्याचं महत्त्व काही प्रमाणात का होईना, पण अजून टिकून आहे.

    दक्षिण भारतातली (South India) बहुतांश घरं आणि रेस्टॉरंटमध्ये केळीच्या पानावर जेवण वाढलं जातं, हे तुम्ही पाहिलं असेल. केळीच्या पानावर जेवण्याची परंपरा देशाच्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळते. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी केळीच्या पानांचा वापर शुभ मानला जातो. तथापि, सध्याच्या काळात केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत कमी झाली असून, नागरिक या पानांचा उपयोग फॅशन (Fashion) किंवा लक्झरियस वाटावं म्हणून करताना दिसतात. केळीच्या पानांचा वापर आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा या पानांवर आपण गरमागरम अन्न पदार्थ वाढतो, तेव्हा या पानांमध्ये असलेले पोषक आणि अँटीऑक्सिडंट (Antioxidant) घटक अन्नपदार्थात सामावले जातात. त्यामुळे अन्नपदार्थ अधिक आरोग्यदायी होतात. यासह केळीच्या पानांचे अनेक फायदे आहेत.

    तुम्हीही 'या' पद्धतीनं जेवण करत असाल तर व्हाल कर्जबाजारी; 5 गोष्टींची घ्या काळजी

    - अन्नपचनासाठी पूरक

    - खरं तर केळीच्या पानांमध्ये वनस्पती-आधारित संयुगं भरपूर असतात. यामुळे आपलं आरोग्य (Health) चांगलं राहतं आणि अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. यातील अँटीऑक्सिडंट तत्त्वं आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी पूरक ठरतात. केळीच्या पानावर जेवल्यास पचनसंस्थेचे (Digestion System) विकार दूर होण्यास मदत होते.

    - जेवण चविष्ट लागतं

    - केळीच्या पानांवर एक थर असतो. यामुळे अन्न अधिक चविष्ट होतं. जेव्हा गरम अन्नपदार्थ केळीच्या पानावर वाढले जातात, तेव्हा हा थर वितळून अन्नात मिसळला जातो. यामुळं अन्न अधिक चविष्ट लागतं.

    Tea For Health : गार झालेला चहा पुन्हा गरम करून पिऊ नका; होऊ शकतात गंभीर परिणाम

    - अन्न रसायनमुक्त

    - जेव्हा आपण प्लास्टिक, स्टील किंवा अन्य धातूंच्या ताटात जेवतो, तेव्हा त्यातले रासायनिक (Chemical) घटक अन्नात मिसळले जातात. परंतु, जेव्हा आपण केळीच्या पानावर जेवतो, तेव्हा असे रासायनिक घटक अन्नपदार्थात मिसळले जात नाहीत. त्यामुळे आपला आहार सुरक्षित होतो.

    - पर्यावरणपूरक

    - प्लास्टिकच्या प्लेट्समुळे पर्यावरण प्रदूषित होतं. परंतु, केळीच्या पानांचा वापर पर्यावरणपूरक (Eco Friendly) ठरतो आणि पर्यावरण सुरक्षित राहते.

    First published:
    top videos

      Tags: Food, Health Tips